Tejaswini Lonari & KIran Mane
Tejaswini Lonari & KIran Mane Instagam
मनोरंजन

Kiran Mane: 'बिग बाॅसच्या घरात आपण बोललो ते करून दाखवलं..', तेजस्विनी लोणारीसाठी किरण मानेंची पोस्ट चर्चेत

प्रणाली मोरे

Kiran Mane: बिग बॉस मराठी ४ हा सिझन संपून बरेच दिवस झाले. शो चा विजेता जरी अक्षय केळकर ठरला असला तरी या शो मुळे अनेक स्पर्धकांच्या झोळीत मात्र चांगले चांगले प्रोजेक्ट्स पडले आहेत. यात प्रामुख्यानं किरण माने, अपूर्वा नेमळेकर आणि तेजस्विनी लोणारी अग्रस्थानी आहेत.

किरण माने आणि अपू्र्वा नेमळेकर एकत्र काम करणार आहेत हे जगजाहिर झालं असताना आता बिग बॉस फेम तेजस्विनी लोणारी सोबतचा फोटो पोस्ट करत किरण माने यांनी त्यांच्या नवीन प्रोजेक्टची माहिती दिली आहे.

चला जाणून घेऊया किरण मानेंनी नेमकं आपल्या पोस्टमध्ये काय काय लिहिलंय.(KIran Mane Post for bigg boss marathi 4 fame tejaswini lonari new project)

बिग बॉस मराठीच्या घरात मैत्री,भांडणं,प्रेम,हसू,रडू असे अनेक भाव पहायला मिळाले. इथे जीवाला जीव देणारे मित्र काहींना सापडले तर इथे झालेले वाद अनेकजण घराबाहेरही कुरवाळताना दिसत आहेत.

याच घरात किरण माने आणि तेजस्विनी लोणारी यांची चांगली गट्टी जमली. तेजस्विनीला दुखापत झाल्यामुळे तिला अचानक घराबाहेर पडालं लागलं. अन्यथा संभाव्य फायनलिस्टमध्ये तिचं नाव पक्कं होतं असं अनेकांना वाटत होतं,यात किरण मानेही एक होते.

याच घरात किरण माने आणि तेजस्विनीनं घराबाहेर पडल्यावर एकत्र काम करण्याचं वचन एकमेकांना दिलं होतं ते आता पूर्ण होतंय. यासंदर्भात पोस्ट करताना किरण मानेंनी लांबलचक नोट तेजस्विनीसाठी लिहिली आहे.

किरण माने म्हणालेयत,तेजू !!!

'बिगबाॅस'मध्ये असताना स्पर्धक लै स्वप्नं रंगवतात... बाहेर गेल्यावर आपण भेटू.. एकत्र काम करू.. असं करू, तसं करू... प्रत्यक्षात मात्र ते होत नाय. पण आपलं तसं नाय भिडू.. किरण माने आणि तेजस्विनी लोणारी हे दोघं जगावेगळे आहेत. 'आत एक बाहेर वेगळं' हे आपलं काम नाय. आपलं जे हाय ते हाय !

आपली मैत्री त्यावेळीबी 'खरीखुरी' होती, आजबी हाय आणि उद्याबी असणार.. दुर्दैवानं तुला दुखापत झाली, नायतर आपण ठरवल्याप्रमाणं 'ग्रॅंड फिनाले'ला घरातल्या सोफ्यावर माझ्याशेजारी शंभर टक्के तू असतीस... बिगबाॅसच्या घरात आपण बोललो ते करून दाखवलं आणि बाहेर पण दाखवणार !!

फायनली एकत्र काम करतोय यार... सुरूवात तर झाली...अजून लैS काय काय येणार हाय..

"सितारों से आगे जहाँ और भी हैं..."

आता नेमकं किरण माने आणि तेजस्विनी कोणता सिनेमा करतायत की नाटक की मालिका हे अद्याप कळलेलं नाही. पण किरण मानेंच्या या पोस्टमुळे त्यांच्या चाहत्यांमध्ये मात्र उत्सुकता पहायला मिळत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rohit Sharma T20 WC 24 : टी 20 वर्ल्डकप तोंडावर आलाय अन् रोहित पुन्हा फेल गेला... माजी खेळाडूनं व्यक्त केली चिंता

नववधूने तब्येत ठीक नसल्याचं सांगत अंगाला स्पर्श करु दिला नाही, दहाव्या दिवशी दाखवले रंग!

Akshaya Tritiya 2024 : अक्षय्य तृतीयेला उडणार सोने खरेदीला झुंबड, पण सोनं खरं की भेसळयुक्त असं करा चेक!

Lok Sabha Election : नाशिकमधून मोठी बातमी! शांतिगिरी महाराजांचा अर्ज बाद पण...; दिंडोरीमधूनही 5 अर्ज बाद

Adhyayan Suman : बेरोजगारी आणि आलेलं नैराश्य; हिरामंडीतील अभिनेता म्हणाला,"व्यसनाच्या आहारी जाणार होतो पण..."

SCROLL FOR NEXT