Koffee With Karan season 7 episode 2 trailer: Sara Ali Khan hint about Vijay Devrakonda Google
मनोरंजन

Koffee with Karan 7: साराची कबूली, म्हणाली,'हो,विजय देवराकोंडा माझा...'

'कॉफी विथ करण 7' च्या दुसऱ्या भागात सारा अली खान आणि जान्हवी कपूर धमाल करताना अन् अनेक सीक्रेट्स शेअर करताना दिसतील.

प्रणाली मोरे

करण जोहरचा(Karan Johar) 'कॉफी विथ करण'(Koffee with karan 7) च्या सातव्या सिझनला दणक्यात सुरुवात झाली. पहिल्याच भागात रणवीर सिंग आणि आलिया भट्टनं पर्सनल लाईफविषयी सांगताना बेडरुम सीक्रेट्स शेअर केले त्यामुळे तर भन्नाट प्रतिसाद शो ला मिळालेला दिसला. आता या शो च्या दुसऱ्या टीझरनं लेक्ष वेधलं आहे. करण जोहरनं स्वतः त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर या Koffee with Karan 7 च्या दुसऱ्या भागाचा टिझर शेअर केला आहे. या भागात सारा अली खान(Sara Ali khan) आणि जान्हवी कपूर(Janhavi Kapoor) आलेल्या दिसत आहेत.(Koffee With Karan season 7 episode 2 trailer: Sara Ali Khan give hint about Vijay Devrakonda)

टीझरमध्ये करण साराला विचारतो,''सध्या तिचं क्रश कोण आहे?''. तेव्हा पटकन ती साऊथ सुपरस्टार आणि आता बॉलीवूडमध्ये देखील 'लाइगर' सिनेमातून एन्ट्री करणाऱ्या विजय देवराकोंडाचे नाव घेताना दिसत आहे. जान्हवी त्यावेळी तिची मस्करी करताना स्वतःचं हसू लपवू शकत नाही. तेव्हा लगेच करण मध्येच जान्हवी विजयसोबत अनेकदा स्पॉट केली गेलीय असं म्हणतो. तेव्हा सारा तिला विचारते,''हे जान्हवी खरं सांग तो तुला आवडतो का?''

जान्हवी कपूर तेव्हा देखील शॉक होते जेव्हा सारा तिच्या एक्स बॉयफ्रेडवर भर कार्यक्रमात टीका करते. कारण जेव्हा करण साराला विचारतो,''तुझ्या एक्सविषयी सांग''. तेव्हा ती पटकन म्हणते,''तो सर्वांचा एक्स आहे''. अर्थात हे सारा कार्तिक आर्यनविषयी बोलत आहे हे एव्हाना सगळ्यांनाच कळालं असेल. करणनेच काही दिवसांपूर्वी खुलासा केला होता की सारा आणि कार्तिक एकमेकांना डेट करत होते.

हे सगळं खरंतर तेव्हा सुरु झालं जेव्हा सारा तिच्या वडिलांसोबत म्हणजे सैफ अली खान सोबत करणच्या 'कॉफी विथ करण' च्या शो मध्ये आली होती. तेव्हा तिनं सर्वांसमोर खुलासा केला होता की कार्तिक आर्यन तिचा क्रश आहे. नंतर ते दोघे 'लव्ह आज कल २' सिनेमात एकत्र दिसले. आणि त्यानंतर त्यांनी एकमेकांना डेट करायला सुरुवात केली.

करण एका मुलाखतीत म्हणाला होता,''मी कृती सननला शो मध्ये आल्यावर म्हणालो होतो,तुला कुणी आवडत असेल,कुणाविषयी मनात काही असेल तर नाव सांग. हा शो,ही जागा अशी आहे की इथे जे बोलून जाल ते नंतर खरं होतं. कारण कतरिना इथेच बोलली होती तिची जोडी विकी कौशल सोबत छान दिसेल. ते ऐकल्यावर याच शो मध्ये विकी आनंदाने खाली पडला होता,त्यानंतर जे झालं ते माहितच आहे. दोघांनी लग्न केलं. आलिया जेवढे सिझन आली तेव्हा तिने रणबीरचं नाव घेतलं आणि आता तिचं देखील त्याच्यासोबत लग्न झालं. सारानं कार्तिकवर क्रश असल्याचं सांगितलं आणि काही दिवसांत ते एकमेकांना डेट करायला लागले. त्यामुळे या शो मध्ये येऊन बोललेली सेलिब्रिटींची इच्छा पूर्ण झालेली आहे. खूप नाती इथेच जुळली आहेत''.

कॉफी विथ करणच्या सातव्या सिझनचा पहिला भाग गेल्या आठवड्यात प्रदर्शित झाला होता. आता सारा-जान्हवीचा पुढचा भाग १४ जुलै रोजी स्ट्रिम केला जाणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

12 वर्षांच्या निष्ठेचा सन्मान! जातेगावचे कैलास उगले ठरले मानाचे वारकरी; आषाढी एकादशीला मुख्यमंत्र्यांसोबत शासकीय महापूजेचा मिळाला मान

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विठ्ठल मंदिरात दाखल, महापूजेला सुरुवात

MK Stalin Reaction : ठाकरे बंधूंच्या मेळाव्यावर आता CM स्टॅलिन यांचीही आली प्रतिक्रिया; केलंय मोठं विधान!

IND vs ENG 2nd Test: भारताची ऐतिहासिक विजयाच्या दिशेने कूच! Akash Deep चा भेदक मारा, इंग्लंडची उडवली झोप

Mumbai Airport Wildlife Smuggling : खळबळजनक! मुंबई विमानतळावर प्रवाशाच्या बॅगेत तब्बल ४५ प्राणी सापडले

SCROLL FOR NEXT