Kriti Sanon gets Golden Visa from UAE  esakal
मनोरंजन

Kriti Sanon Gets Golden Visa : क्रितीला मिळाला 'गोल्डन व्हिसा'! युएईकडून खास गौरव, अभिनेत्रीची पोस्ट चर्चेत, 'आता...'

बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री क्रिती सेननची वेगळी बातमी समोर आली आहे.

युगंधर ताजणे, सकाळ ऑनलाईन टीम

Kriti Sanon gets Golden Visa from UAE : बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री क्रिती सेननची वेगळी बातमी समोर आली आहे. आपल्या हटक्या स्टाईल आणि अभिनयासाठी ओळखल्या जाणाऱ्या क्रितीला युएईकडून खास गिफ्ट मिळालं आहे. त्याची सोशल मीडियावर चर्चा आहे. क्रिती ही सध्या तिच्या ‘तेरी बातों में ऐसा उलझा जीया’ नावाच्या चित्रपटामुळे चर्चेत आहे.

क्रितीचा ‘तेरी बातों में ऐसा उलझा जीया’ चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यात ती प्रसिद्ध अभिनेता शाहिद कपूरसोबत दिसणार आहे. व्हॅलेंटाईन डे च्या निमित्तानं हा चित्रपट प्रदर्शित होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. ही एक रोमँटिक फिल्म असून त्याच्या व्हायरल झालेल्या ट्रेलरला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले आहे. Kriti Sanon Actress Gets Golden Visa From UAE

या सगळ्यात क्रितीच्या बाबत एक आनंदाची बातमी समोर आली आहे. ती बातमी आहे तिला गोल्डन व्हिसा मिळाल्याची. युएइ सरकारकडून हा सन्मान दिला गेल्याचे बोलले जात आहे. यानंतर क्रितीनं दिलेली प्रतिक्रिया लक्ष वेधून घेताना दिसत आहे. ती तिच्या पोस्टमध्ये म्हणते की, माझ्यासाठी हा खूप मोठा गौरव आहे.

क्रितीला इसीएचचे डिजिटल सीइओ इक्बाल मार्कोनी यांनी गोल्डन व्हिसा दिला आहे. यानंतर क्रितीनं युएई सरकारचे विशेष आभार मानले आहे. हा सन्मान मिळणं मोठी गौरवाची बाब आहे. माझ्या मनात दुबईचे एक वेगळे स्थान आहे. तिथली सुंदरता आणि संस्कृती खूप काही शिकवून जाणारी आहे. आता मी त्याचा भाग होते याचा खूप आनंद असल्याची भावना क्रितीनं व्यक्त केली आहे.

यापूर्वी या कलाकारांना मिळाला आहे गोल्डन व्हिसा...

गोल्डन व्हिसा मिळणारी क्रिती ही काही पहिलीच भारतीय सेलिब्रेटी नाही. यापूर्वी बॉलीवूडमधील अनेक सेलिब्रेटींना हा बहुमान मिळाला आहे. त्यात शाहरुख खान, संजय दत्त, सानिया मिर्झा, बोनी कपूर, वरुण धवन, मौनी रॉय, उर्वशी रौतेला, सुनील शेट्टी, नेहा कक्कर, रणवीर सिंह, कमल हासन, मोहनलाल, दलकीर सलमान, फराह खान, सोनू सुद आणि अमाला पॉल यांच्या नावाचा समावेश आहे.

गोल्डन व्हिसाचे फायदे काय असतात?

साधारण २०१९ पासून युएईकडून अशा प्रकारचे गोल्डन व्हिसा देण्याचे काम सुरु झाले. ज्यांच्याकडे हा गोल्डन व्हिसा असतो त्यांना दुबईमध्ये बराच काळ वास्तव्य करता येते. त्यांना त्या देशातच कायमस्वरुपी वास्तव्य करायचे असल्यास त्याचीही मुभा आहे. युएईनं त्यांच्या अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी अशा प्रकारचा उपक्रम हाती घेतला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gutkha Ban: आता गुटखा विक्रेत्यांची खैर नाही! फक्त बंदी नाही, थेट मकोका...; महाराष्ट्र सरकारचा मोठा धडाका

Who is Rajan Patil : अजित पवारांचा डाव उधळणारा पठ्ठ्या! अनगरच्या रणांगणातून राजकीय ठिणगी पेटवणारे राजन पाटील कोण?

Viral Video: मलायका अरोराचा हटके स्टंट! स्पर्धकाच्या डोक्यावर ठेवला गॅस, अन् बनवला चहा, व्हिडिओ चर्चेत

Rahul Gandhi: ''राहुल गांधी निवडणूक आयोगाला बदनाम करत आहेत'', देशातल्या 272 दिग्गजांनी लिहिलं खुलं पत्र

Maharashtra CET Exam: विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी! आता CET परीक्षा वर्षातून तीनदा होणार, वाचा नवीन नियम

SCROLL FOR NEXT