Shah Rukh Khan sakal
मनोरंजन

KRK On Shah Rukh Khan: शाहरुख गाठ माझ्याशी हाय! रेड चिलीजकडून कायदेशीर नोटीस मिळताच अभिनेता संतापला..

Vaishali Patil

KRK On Shah Rukh Khan Jawan: बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खानच्या 'जवान' या चित्रपटाच्या चर्चा सुरु आहे. शाहरुखच्या पठाण चित्रपटाच्या अफाट यशानंतर आता शाहरुखच्या आगामी जवान या चित्रपटाबद्दलही अपेक्षा वाढल्या आहेत. जवान हा चित्रपट काही महिन्यांत रिलीज होणार आहे.

चित्रपट प्रदर्शित होण्याआधीच कमाल आर खान म्हणजेच केआरके यांने या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. केआरके बद्दल बोलायच झालं तर तो नेहमीच त्याच्या ट्विटमुळे चर्चेत असतो. तो अनेक कलाकारांवर टिका देखील करत असतो. त्यामुळे तो अडचणीत देखील सापडतो. असचं काहीस आता त्याने शाहरुखच्या जवान चित्रपटाबद्दल बोललं आहे.

आता पुन्हा एकदा त्याने ट्विट करून एका अभिनेत्यावर निशाणा साधला आहे. यावेळी शाहरुख खान त्याचे टार्गेट केलं आहे. केआरकेने शाहरुख खानच्या आगामी 'जवान' या चित्रपटाविषयी ट्विट केले असून, त्याचा जवान हा चित्रपट फ्लॉप झाल्याशिवाय गप बसणार नाही अशी शपथ त्याने घेतली आहे.

केआरकेने शाहरुखच्या जवान आपल्या ट्विटमध्ये त्याने लिहिले होते, "मी #DrKRK आज शपथ घेतो की, जवान चित्रपट सुपरफ्लॉप केल्यानंतरच मी गप्प बसणार नाही. जर मी हा चित्रपट फ्लॉप करू शकलो नाही तर मी लंडनमध्ये कायमचा स्थायिक होईन. शाहरुखला माझ्या कडून शुभेच्छा. "

याशिवाय त्याने आणखी एका ट्विटमध्ये लिहिले- "आज मी म्हणू शकतो की शाहरुख खानचा जवान हा चित्रपट ब्लॉकडस्टर ठरेल. लोक हा चित्रपट पाहायला जाणार नाही."

त्याचवेळी केआरकेने असंही सांगितले की तो एका व्हिडिओच्या माध्यमातून याबद्दल बोलेल आणि चित्रपटाची संपूर्ण स्टोरी सांगेल. आता शाहरुख खानच्या रेड चिलीज एंटरटेनमेंटने यावर प्रतिक्रिया दिली असून केआरकेविरोधात कायदेशीर नोटीस जारी केली आहे.

केआरकेच्या ट्विटची लिंक शेअर करून त्याला ही URL हटवण्याचा इशारा देणारी कायदेशीर नोटीसच आभिनेत्याला पाठवली आहे. आता यावर केआरकेनेही प्रतिक्रिया दिली आहे.

शाहरुख खानच्या प्रॉडक्शन हाऊसने जारी केलेल्या नोटीसवर प्रतिक्रिया देताना केआरकेनं ट्विट शेयर केलं. त्यात तो लिहितो की, आज सकाळी शाहरुख खानच्या कंपनी रेड चिलीज एंटरटेनमेंटने मला कायदेशीर नोटीस पाठवली आणि जवान वर केलेले ट्विट डिलीट करण्यास सांगितलं.

पण मला हे मान्य नाही. याउलट, आज मी पूर्ण कथेसह एक व्हिडिओ देखील रिलीज करणार आहे. हा चित्रपट उद्ध्वस्त करण्यासाठी तो 100 टक्के कटिबद्ध आहे. यासाठी मी तुरुंगात जाण्यासही तयार असल्याच त्याने यात म्हटलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dagdusheth Ganpati: भक्तांच्या श्रद्धेला मानाचा मुकुट; दगडूशेठ गणपती संस्थानाला ‘अ’ वर्ग पर्यटन क्षेत्राचा दर्जा!

PBKS vs RCB: बंगळुरूने मिळवलं IPL 2026 प्लेऑफचं तिकीट; पंजाबचा सलग ६ व्या पराभवामुळे CSK, RR चा झाला फायदा

Dhule-Solapur Highway: रजापूर उड्डाण पुलाखाली सिमेंट मिक्सर अडकला; दोन तास वाहतूक ठप्प

Severe Water Crisis: आडूळ परिसरात भीषण पाणीटंचाई; मोसंबी, डाळिंब, आंबा बागा सुकल्या, शेतकऱ्यांवर फळबागा तोडण्याची वेळ

DC vs RR: राजस्थानने जडेजाला Playing XI मधून बाहेर का काढलं? कर्णधारानं सांगितलं कारण; दिल्लीकडून Tripurana Vijay ला पदार्णाची संधी

SCROLL FOR NEXT