Laal Singh Chaddha boxoffice day 9, aamir khan film flop 100 crore loss Google
मनोरंजन

Laal Singh Chaddha: 9 व्या दिवशी आमिरने गमावले १०० करोड,मग कमावले किती?वाचा

आमिर खानचा ड्रीम प्रोजेक्ट लाल सिंग चड्ढाचा बॉक्सऑफिसवरचा स्ट्रगल अद्यापही सुरू आहे.

प्रणाली मोरे

Laal Singh Chaddha Boxoffice Collection: आमिर खानचा(Aamir Khan) ड्रीम प्रोजेक्ट लाल सिंग चड्ढाचा बॉक्सऑफिसवरचा स्ट्रगल काही संपत नाहीय. चार वर्षांनंतर मोठ्या पडद्यावर एन्ट्री करणाऱ्या आमिरनं स्वप्नातही विचार केला नसेल की त्याच्या सिनेमाचे असे हाल होतील. सिनेमाच्या रिलीज आधीच बॉयकॉट ट्रेन्ड सुरू झाला आणि होत्याचं नव्हतं झालं. आता लाल सिंग चड्ढा देखील यावर्षातल्या फ्लॉप सिनेमांमध्ये सामिल होण्याच्या मार्गावर आहे. इतकंच नाही तर लाल सिंग चड्ढा आमिरचा आतापर्यंतच्या सगळ्यात खराब परफॉर्मन्स असलेला सिनेमा म्हणूनही चर्चेत येऊ लागला आहे.(Laal Singh Chaddha boxoffice day 9, aamir khan film flop 100 crore loss)

आठवड्याभराच या सिनेमानं फक्त ५० करोडची कमाई केली आहे. यादम्यान सिनेमाचे काही शो कॅन्सल झाले आणि अजूनही काही होत आहेत. थिएटरात लाल सिंग चड्ढा पहायला प्रेक्षक फिरकत नसल्याचं चित्र सध्या दिसत आहे. आमिर खानचं एक सुंदर स्वप्न तुटलं आहे, तो स्वतःही आता काहीच करु शकत नाही. या सिनेमाजवळ बॉक्सऑफिसवर कमाई करण्यासाठी आता काहीच दिवस उरले आहे. यानंतर विजय देवरकोंडाचा 'लाइगर' रिलीज होणार आहे. बोललं जात आहे की 'लाइगर' सिनेमाच 'लाल सिंग चड्ढा'चा बॉक्सऑफिसवर दी एन्ड करेल.

लाल सिंगच्या बॉक्सऑफिस कलेक्शन विषयी बोलायचं झालं तर सिनेमा रिलीज झाल्यापासून नवव्या दिवशीच लाल सिंग चड्ढामधील हवा निघून गेली. वृत्तानुसार, तिकीट काऊंटवरच्या शांततेमुळे या सिनेमानं 9 व्या दिवशी फक्त १ ते १.२५ करोड इतकीच कमाई केल्याचं समोर आलं आहे. दर दिवशी या सिनेमाच्या कमाईत उतारच होताना दिसत आहे. शो साठी प्रेक्षकच फिरकत नसल्याने थिएटर मालकांनी स्क्रीन्स दुसऱ्या सिनेमांना देणं सुरु केलं आहे.

'लाल सिंग चड्ढा' फ्लॉप झाल्यामुळे आमिर खानचे जवळपास १०० करोडचे नुकसान झाले आहे. एवढंच नाही तर असं देखील कळत आहे की शाहरुख खानच्या डिझास्टर ठरलेल्या 'झीरो' सिनेमाची जागा आता 'लाल सिंग चड्ढा'नं घेतली आहे. २०१८ मध्ये रिलीज झालेला झीरो बॉक्सऑफिसवर तोंडावर आपटला होता. आता लाल सिंग चड्ढाची ती अवस्था दिसून येत आहे. बॉलीवूडच्या तिन्ही खान्सनी डिझास्टर सिनेमांच्या यादीत आपलं नाव एव्हाना सामिल केलं आहे.

टॉप ५ डिझास्टर सिनेमांमध्ये 'लाल सिंग चड्ढा' सामिल झाला आहे. या यादीत 'झीरो' सिनेमाचं नाव अग्रस्थानी आहे. याव्यतिरिक्त '83', 'बॉम्बे वेलवेट','धाकड' असे सिनेमेही या यादीत समाविष्ट आहेत. लाल सिंग चड्ढा सोबत 'रक्षाबंधन' रिलीज झाला,पण अक्षयच्या या सिनेमाची अवस्थाही काही फार चांगली नाही. आमिरच्या 'लाल सिंग चड्ढा'पेक्षा अक्षयच्या 'रक्षाबंधन'ची अवस्था अधिक वाईट असल्याचं कळत आहे.

आता विजय देवरकोंडाने 'लाल सिंग चड्ढा'चं समर्थन केल्यावर त्याच्या 'लाइगर'ला देखील ट्वीटरवर बॉयकॉट केलं जात आहेय विजयने एका मुलाखतीत लाल सिंगला समर्थन देताना म्हटलं होतं की, 'लाल सिंग चड्ढाला' बॉयकॉट केलं तर त्याचा परिणाम आमिरवर जितका होणार नाही तितका त्या सिनेमासाठी काम करणाऱ्या २ ते ३ हजार लोकांच्या रोजगारावर होईल. यामध्ये इतर लोक भरडले जातील. पण विजयच्या या बोलण्याचा चुकीचा अर्थ काढत आता त्यालाही टार्गेट केलं जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अहमदाबाद सारखी घटना, विमान धावपट्टीवर असतानाच लागलेली आग, उड्डाणानंतर लगेच कोसळलं; धक्कादायक VIDEO समोर

ऐतिहासिक निकाल! 'अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार'; नराधमाला ‘मृत्यूपर्यंत जन्मठेप’; वाशीम न्यायालयाचा निकाल..

Latest Marathi News Live Update : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कोल्हापूर दौऱ्यावर, विमानतळावर आगमण

Guru Nanak Jayanti 2025: गुरु नानक जयंतीनिमित्त आपल्या प्रियजनांना पाठवा मंगल शुभेच्छा!

Alcohol Effects on Brain: दारूचा एक घोटही ठरतो मेंदूसाठी मोठा फटका! न्यूरोलॉजिस्ट्सने दिला गंभीर इशारा

SCROLL FOR NEXT