Laal Singh Chaddha filed case in calcutta High Court,seeking ban on film. Google
मनोरंजन

Laal Singh Chaddha वर होतोय बंगालमधील शांती भंग केल्याचा आरोप, नवं टेन्शन..

आमिरचा लाल सिंग चड्ढा रिलीज आधीपासूनच वादात सापडला आहे. आता बंगालमध्ये सिनेमावर बंदी आणण्यासाठी जनहित याचिका कोलकाता हायकोर्टात दाखल करण्यात आली आहे.

प्रणाली मोरे

Laal Singh Chaddha: आमिर खानच्या(Aamir KhanP) 'लाल सिंग चड्ढा' मागचे वाद(Controversy) काही संपायचं नाव घेईनात. लाल सिंग चड्ढा संबंधित आता आणखी एक नवा वाद समोर आला आहे. कोलकाताच्या हायकोर्टात लाल सिंग चड्ढा विरोधात केस दाखल करण्यात आली आहे. ज्यामध्ये सिनेमावर बंदी आणण्याची मागणी केली जात आहे.(Laal Singh Chaddha filed case in calcutta High Court,seeking ban on film.)

लाल सिंग चड्ढा रिलीज झाल्यापासूनच बॉक्सऑफिसवर स्ट्रगल करताना दिसत आहे. आता कोलकाता कोर्टात दाखल झालेल्या जनहित याचिकेत बंगालमध्ये सिनेमावर बंदी आणण्याची मागणी केली जात आहे. याव्यतिरिक्त याचिकेत मागणी करण्यात आली आहे की जर सिनेमावर बंदी आणली नाही तर थिएटरच्या बाहेर पोलिसांचा कडक बंदोबस्त असू द्या.

याचिकेत दावा केला गेला आहे की सिनेमात जे दाखवलं गेलं आहे त्यामुळे बंगालमधील शांती व्यवस्था बिघडू शकते. या याचिके संदर्भातील सुनावणी मंगळवारी २३ ऑगस्ट,२०२२ रोजी मुख्य न्यायाधीश प्रकाश श्रीवास्तव यांच्या कोर्टात होणार आहे.

उपलब्ध झालेल्या माहितीच्या आधारे कळत आहे की,वकील नाजिया इलाही खान यांनी 'लाल सिंग चड्ढा' विरोधात एक जनहित याचिका दाखल केली आहे. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे बंगाल मध्ये जे सध्या वातावरण आहे,जे धार्मिक मुद्द्यांना घेऊन खूप अस्थिर आहे. सिनेमात आर्मी संबंधित भाग योग्य रित्या दाखवला गेलेला नाही,ज्याची चुकीची छाप पडू शकते. त्यामुळे याचिकेत लाल सिंग चड्ढावर बंगालमध्ये बंदी आणण्याची मागणी केली गेली.

आमिर खानचा 'लाल सिंग चड्ढा' सिनेमाविषयी लोकांच्या मनात खूप राग आहे. सिनेमा रिलीजआधीच ट्वीटरवर बॉयकॉट लाल सिंग चड्ढाचा ट्रेन्ड सुरु झाला होता. आणि तो अद्यापही सुरू आहे. सिनेमाला समिक्षकांनी गौरविल्यानंतरही प्रेक्षक मात्र सिनेमा पहायला फिरकत नसल्याचं दिसत आहे. लोकांनी पूर्णताः सिनेमाला रीजेक्ट केलं आहे.

'लाल सिंग चड्ढा' आमिर खानचा खरंतर ड्रीम प्रोजेक्ट होता. कोणीच विचार केला नव्हता की लाल सिंग चड्ढाची अवस्था बॉक्सऑफीसवर इतकी वाईट होईल. आता बातमी आहे की बॉक्सऑफिस राहिलं बाजूला,या सिनेमाला ओटीटी रिलीजसाठी देखील कोणी कंपनी विकत घ्यायला तयार होत नसताना दिसतेय. अशात आता पुन्हा बंगालमध्ये सिनेमावर बंदी आणण्याची मागणी म्हणजे आमिरसाठी आणखी नवं टेन्शन म्हणावं लागेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sushil Kedia Tweet: देवेंद्रजी आणि अमितजी मला वाचवा! माझ्याविरोधात मोठी मोहीम...; सुशील केडियांची संरक्षणासाठी धाव

IND vs ENG 2nd Test: २४ वर्षांच्या पोराचे शतक! जेमी स्मिथ-हॅरी ब्रूक्सच्या खेळीने इंग्लंडचा पलटवार; गौतम गंभीरचा फसला प्लॅन

Ulhasnagar Crime : दारू पार्टीतील किरकोळ वादातून मित्राकडून मित्राचा खून; आरोपी शकील शेखला बेड्या

Dombivali News : आमदार राजेश मोरे यांनी पलावा पुलाचे उद्घाटन केले आणि पूल बंद झाला

Who is Sushil Kedia: राज ठाकरेंना चॅलेंज देणारा सुशील केडिया कोण आहे? कसे कमावले कोट्यवधी रुपये?

SCROLL FOR NEXT