Laal Singh Chaddha Flop still aamir khan not in favour of ott release, Hopes box office numbers. Google
मनोरंजन

लाल सिंग चड्ढा फ्लॉप पण आमिर म्हणतो,'अजूनही हरलो नाही', घेतला मोठा निर्णय...

सध्या बॉक्सऑफिसवर फ्लॉप ठरलेल्या लाल सिंग चड्ढासाठी नेटफ्लिक्स ओटीटी प्लॅटफॉर्मेनेही आपली दारं बंद केल्याची बातमी आहे.

प्रणाली मोरे

Laal Singh Chaddha: मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानचा लाल सिंग चड्ढा बॉक्सऑफिसवर अतिशय वाईटरित्या अपयशी ठरला आहे. सिनेमाची जी अवस्था झाली आहे तशी कुणी कल्पनाही केली नसेल. सिनेमा फ्लॉप ठरला पण आमिर खान(Aamir Khan) त्याच्या ओटीटी रिलीजविषयी घेतलेला निर्णय बदलणार आहे का? चला जाणून घ्या सविस्तर.(Laal Singh Chaddha Flop still aamir khan not in favour of ott release Hopes box office numbers.)

आमिर खानने लाल सिंग चड्ढा रिलीजच्या आधीच सांगितलं होतं की हा सिनेमा रिलीज झाल्यानंतर ६ महिन्यानी ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज केला जाईल. आता जेव्हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर चालत नाही तेव्हा आमिर खान ओटीटी रिलीजचा निर्णय बदलणार का? तर उत्तर आहे 'नाही'. मीडियाला मिळालेल्या वृत्तानुसार दावा केला जात आहे की आमिर खान आता देखील आपल्या आधीच्या निर्णयावर ठाम आहे. तो ६ महिन्याआधी लाल सिंग चड्ढाला ओटीटीवर रिलीज करणार नाही. एका प्रतिष्ठित वृत्तपत्रानं मिळालेल्या माहितीच्या आधारावर दावा केला आहे की,आमिर खान सिनेमाच्या ओटीटी रिलीजसाठी ६ महिन्याचीच वाट पाहणार आहे. त्याला अजूनही वाटत आहे की प्रेक्षकांनी सिनेमागृहात यावं आणि सिनेमा पहावा.

लाल सिंग चड्ढाने बॉक्सऑफिसवर धीम्या गतीनं ५५ करोडची कमाई केली आहे. 'मेला' सिनेमानंतर आमिरचा सर्वात सुपरफ्लॉप सिनेमा म्हणजे 'लाल सिंग चड्ढा' असं बोललं जात आहे. या आठवड्यात आमिर खानच्या सिनेमाची टक्कर असेल ती साऊथस्टार विजय देवरकोंडाच्या 'लाइगर'शी. विजय देवरकोंडाचा 'लाइगर' सिनेमा 'लाल सिंग चड्ढा'साठी अडचणी निर्माण करू शकतो असा अंदाज आहे. आमिरच्या सिनेमाला तसाही प्रेक्षकवर्ग मिळताना दिसत नाही,त्यामुळे 'लाइगर'च्या रिलीजनंतर बॉकसऑफिसवर तग धरुन राहणं 'लाल सिंग चड्ढा'साठी कठीण होऊन बसणार आहे. तेव्हा देखील आमिर आपल्या सिनेमाला ६ महिन्यानंतर ओटीटीवर रिलीज करायचं या निर्णयावर ठाम राहतो की नाही हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

आमिर खानचे सिनेमे हे चीनमध्ये देखील रिलीज केले जातात. तिथे आमिरचे चाहते म्हणे भरपूर आहेत. भारतात लाल सिंग चड्ढा इतक्या वाईट प्रकारे आपटला त्यानंतर आमिर चीनमध्ये सिनेमा रिलीज करणार का याविषयी देखील अद्याप संभ्रम आहे. सुरुवातील बातमी होती की आमिर खानचा लाल सिंग चड्ढा हा नेटफ्लिक्स ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज केला जाणार. ९० करोडला म्हणे डील फायनल देखील झाली होती. पण बॉक्सऑफिसवर सिनेमाची अवस्था पाहता डील कॅन्सल झाल्याचं कळत आहे. आता मुद्दा हा आहे की आमिरच्या लाल सिंग चड्ढाला कोणतीच ओटीटी प्लॅटफॉर्म असलेली कंपनी खरेदी करायला बघत नाही आहे. आता प्रश्न उरतो की जिथे आताच प्रेक्षकांनी लाल सिंग चड्ढाकडे पाठ फिरवली,तिथे ६ महिन्यानंतर ओटीटीवर कोण हा सिनेमा पाहणार?

लाल सिंग चड्ढाच्या माध्यमातून आमिर खाननं तब्बल ४ वर्षांनी मोठ्या पडद्यावर कमबॅक केलं होतं. सिनेमात आमिरसोबत करिना कपूरही महत्त्वाच्या भूमिकेत आहे. अद्वैत चंदन दिग्दर्शित हा सिनेमा हॉलीवूडच्या सुपरहिट फॉरेस्ट गम्प सिनेमाचा रीमेक आहे. थिएटरकडे प्रेक्षकांनी सिनेमा पहायला यायला पाठ फिरवली असली तरी सिनेमाला समिक्षकांनी मात्र गौरविलं होतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs NZ: भारताने नागपूरचं मैदान मारलं! न्यूझीलंडविरुद्ध पहिल्या T20I सामन्यात दणदणीत विजय, ग्लेन फिलिप्सची फिफ्टी व्यर्थ

IND vs NZ: अभिषेक शर्माने का पूर्ण केली उपकर्णधार अक्षर पटेलची ओव्हर? पहिल्या T20I असं काय घडलं, जाणून घ्या

Bus-Tanker accident : राष्ट्रीय महामार्गावर बस अन् टँकरचा भीषण अपघात; चार जणांचा मृत्यू, २० जखमी

IND vs NZ, 1st T20I: १४ षटकार अन् २१ चौकार... भारतीय संघाने न्यूझीलंडविरुद्ध उभारली विक्रमी धावसंख्या! जाणून घ्या कोणते विक्रम रचले

Baramati Elections : बारामतीत उमेदवार यादी जाहीर; जिल्हा परिषद निवडणुकीत राजकीय गणिते बदलली

SCROLL FOR NEXT