Lata Mangeshkar Sakal
मनोरंजन

Lata Mangeshkar : लता मंगेशकरांचा उपचारांना प्रतिसाद; डॉक्टरांची माहिती

8 जानेवारी रोजी कोरोनाची लागण झाल्यानंतर त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

निनाद कुलकर्णी

मुंबई : स्वर कोकिळा लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे वृत्त सकाळी समोर आले होते. दरम्यान, लतादीदी उपचारांना प्रतिसाद देत आहेत, अशी माहिती त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी दिली आहे. लता मंगेशकर यांच्यावर मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपाचार सुरू आहेत. (Lata Mangeshkar Health Update)

8 जानेवारी रोजी त्यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात (Breach Candy Hospital) दाखल करण्यात आले होते. तेव्हापासून लता दीदी आयसीयूमध्ये आहेत. मध्यंतरी लता मंगेशकर यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली होती त्यानंतर त्यांचे व्हेंटिलेटर काढण्यात आले होते. मात्र, आज सकाळी अचानक दीदींची प्रकृती चिंताजनक झाली त्यानंतर त्यांना पुन्हा व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. मात्र, आता त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी दीदींवर रूग्णालयाच्या अतिदक्षता विभागात उपचार सुरू असून त्या उपचारांना योग्य प्रतिसाद देत असल्याचे सांगितले आहे. (Lata Mangeshkar Health Update ) दरम्यान, मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) हे देखील दुपारच्या सुमारास ब्रीच कँडी रूग्णालयात दाखल झाले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Police Crackdown: पुण्यात ‘चार बेस, चार टॉप’ तरीही ध्वनिप्रदूषणाचा दणदणाट; ११०० मंडळांच्या ध्वनीची नोंद, नियमभंगावर कारवाई

Nashik Dindori crime news: लखमापूरमध्ये ७० वर्षीय मंदाकिनी सोनवणे यांची हातपाय बांधून शेततळ्यात निर्घृण हत्या; गावकऱ्यांकडून सखोल चौकशी व न्यायाची मागणी

दिल्ली इमारत दुर्घटनेत दोघांचा मृत्यू, पाच जणांची प्रकृती गंभीर; नेमकी कशी घडली घटना? कारण आलं समोर

Weekly Horoscope 7 to 13 september : या आठवड्यात पाच राशींचं नशीब पालटणार; कुणाला घ्यावी लागेल काळजी? वाचा...

Pune Highway Robbery: शिरूरमध्ये एसटी बस अडवून चालक-वाहकाला मारहाण; ₹८,९६० लुटले, चौघे जेरबंद, स्कॉर्पिओ जप्त

SCROLL FOR NEXT