Pushpa Movie
Pushpa Movie  
मनोरंजन

'पुष्पा'वर बंदी घाला; गृहमंत्र्यांकडे पत्राद्वारे मागणी

स्वाती वेमूल

अल्लू अर्जुनची (Allu Arjun) मुख्य भूमिका असलेला 'पुष्पा' (Pushpa) हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालतोय. सोशल मीडियावरही याच चित्रपटातील दृश्ये, गाणी आणि संवादांची जोरदार चर्चा आहे. अशातच या चित्रपटासमोर आता एक नवीन अडचण निर्माण झाली आहे. शिवार फाऊंडेशनचे संस्थापक सुभाष साळवे यांनी चित्रपटावर बंदी घालण्यासाठी महाराष्ट्राचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांना पत्र लिहिलं आहे. 'पुष्पा या चित्रपटात पोलीस वर्दीचा वापर करून जनतेचा पोलीस प्रशासनवरील विश्वास उठेल असं दृश्य दाखवण्यात आलं आहे. त्यामुळे पोलीस बांधवांना आणि पोलीस समर्थकांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत,' अशी तक्रार त्यांनी पत्राद्वारे केली आहे.

'चित्रपट निर्माता व अभिनेता यांच्यावर कायदेशीर कारवाई करून गुन्हे दाखल करण्यात यावं आणि चित्रपटावर बंदी घालण्यात यावी. असं चित्रीकरण थांबायला पाहिजे यासाठी महाराष्ट्र गृहमंत्र्यांनी पाऊल उचलावं, जेणेकरून कुठलाही अभिनेता व निर्माता पोलीस प्रशासन, खाकीचा अवमान करण्याच हिंमत करणार नाही,' अशी मागणी सुभाष साळवे यांनी गृहमंत्र्यांकडे केली आहे.

पुष्पा हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करतोय. या चित्रपटाला प्रेक्षक-समीक्षकांकडून संमिश्र प्रतिसाद मिळतोय. प्रसिद्ध अभिनेत्री समंथा रुथ प्रभूच्या करिअरमधील पहिला आयटम साँग या चित्रपटात आहे. या चित्रपटाचा दुसरा भागसुद्धा लवकरच प्रदर्शित होणार आहे. लाल चंदनच्या तस्करीवर आधारित या चित्रपटाची कथा आहे. ‘पुष्पा’ हा चित्रपट तेलुगू, तमिळ, हिंदी, कन्नड आणि मल्याळम या भाषांमध्ये प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात अल्लू अर्जुन 'रफ अँड टफ' लूकमध्ये पहायला मिळतोय.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RSS: आता ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही 'नकली आरएसएस' म्हणतील; नड्डांच्या फुलटॉसवर, ठाकरेंचा षट्कार

PM मोदींच्या द्वेषयुक्त भाषणाच्या आरोपावर काय कारवाई केली? न्यायालयाचा पोलिसांना सवाल! ५ जूनपर्यंत मागवला अहवाल

भाजपला RSS ची गरज आहे का? जेपी नड्डांनी एका वाक्यात संपवला विषय, BJP मध्ये अंतर्गत राजकारण पेटणार

RCB vs CSK : पावसामुळे 5-5 किंवा 10-10 ओव्हरचा सामना झाला तर कसे असेल RCBचे गणित? जाणून घ्या समीकरण

Mallikarjun Kharge : ''राज्यात 'मविआ'ला कमीत कमी ४६ जागा मिळतील'' खर्गेंचा दावा; इंडिया आघाडीची पत्रकार परिषद

SCROLL FOR NEXT