Did 'Liger' box office failure force director Puri Jagannadh to vacate Mumbai home?
Did 'Liger' box office failure force director Puri Jagannadh to vacate Mumbai home? Google
मनोरंजन

'लाइगर'चा दिग्दर्शक पुरी जगन्नाथ अडचणीत, सोडावं लागलं मुंबईतलं आलिशान घर

प्रणाली मोरे

Liger: पुरी जगन्नाथ(Puri Jagannath) दिग्दर्शित आणि विजय देवरकोंडा(Vijay deverakonda) अभिनित 'लाइगर' सिनेमानं मोजून दोन-तीन दिवसांत बॉक्सऑफिसवर मान टाकल्याचं चित्र आपल्या सर्वांसमोर आहेच. पण 'लाइगर'च्या या अपयशाचा सर्वात जास्त परिणाम हा दिग्दर्शक पुरी जगन्नाथवर झाल्याचं दिसून येत आहे. खरंतर,'लाइगर' नंतर पुरी जगन्नाथ मुंबईत राहूनच त्याच्या नवीन प्रोजेक्टवर काम करणार होता. पण आता बातमी समोर येत आहे की पूरी जगन्नाथनं मुंबईतील त्याचं आलिशान भाड्याचं घर लागलीच खाली करुन हैदराबादला आपल्या मुळ गावी परत जाण्याचा निर्णय घेतला आहे. ('Liger' director Puri Jagannadh to vacate Mumbai home?Reason?)

आता या बातमीत किती तथ्य हे देव जाणो आणि स्वतः पुरी जगन्नाथ. पण वाऱ्यासारखी बातमी मात्र पसरली आहे की पूरी जगन्नाथ मुंबईत ज्या आलिशान घरात राहत होता त्याचं महिन्याचं भाडं फक्त १० लाख इतकं होतं. तो राहत असलेला फ्लॅट हा सी-फेसिंग होता यावरनं त्याची किंमत काय असेल हे क्षणात कळतं, म्हणजे भाडंही तसं वजनदार असणार हे लक्षात यायला क्षणाचाही वेळ लागणार नाही. बरं, १० लाख हे निव्वळ भाडं होतं,याव्यतिरिक्त इतर मेन्टेनन्स चार्जेस आणि बाकीच्या गोष्टी वेगळ्याच. त्याही तशाच जड वजनाच्या असणार हे आलंच. आणि पुरी जगन्नाथला सध्याच्या परिस्थितीत तरी हा एवढा खर्च डोईजड वाटला असणार हे निश्चित. आणि त्यामुळेच त्यानं शहाणपणा करत आपल्या घरची,स्वतःच्या हक्काच्या घराची वाट पकडली असणार अशी चर्चा सर्वत्र होताना दिसत आहे.

बातमी आहे की, जसा लाइगर बॉक्सऑफिसवर दणकून आपटला तसा पुरी जगन्नाथनं ते आलिशान घर सोडण्याचा निर्णय घेतला. तो पुन्हा हैदराबाद येथील आपल्या घरी परतला. 'लाइगर' सिनेमात विजय देवरकोंडा आणि अनन्या पांडे महत्त्वाच्या भूमिकेत होते. प्रमोशन दणक्यात होऊनही सिनेमा मात्र चांगलाच तोंडावर पडला. विजय देवरकोंडा हे साऊथचं मोठं नाव सिनेमाशी जोडूनही काहीच फरक पडला नाही.

सिनेमाविरोधात झालेला नकारात्मक प्रचार, विजयची काही मुक्ताफळं आणि त्यामुळे सुरू झालेला सिनेमा विरोधातला बॉयकॉट ट्रेन्ड ही सगळी सिनेमाच्या फ्लॉप होण्याची कारणं बोलली जात आहेत,पण काही बॉलीवूडच्या निर्माता-दिग्दर्शकांना मात्र ही कारणं पटत नाहीत,असं त्यांनी बोलूनही दाखवलं आहे. बरं प्रेक्षकांनी पाठ फिरवली तरी समिक्षकांनी नावाजलं असंही सिनेमाच्या बाबतीत काही झालेलं नाही. म्हणजे मुळातच कलाकृतीतच कुठेतरी काहीतरी चुकलं असं म्हणायचं.

लाइगर सिनेमा बॉक्सऑफिसवर फ्लॉप गेल्यानंतर सिनेमाच्या टीमनं म्हणजे निर्माता,दिग्दर्शक,कलाकार यांनी मिळून पैसे काढले आणि डिस्ट्रीब्युटर्स,एक्झिबिटर्सचे नुकसान भरुन दिले. पुरी जगन्नाथच्या आगामी 'जन-गन-मन' सिनेमाचं काम लाइगर फ्लॉप झाल्यानंतर काही दिवसांसाठी पुढे ढकलण्यात आल्याचं बोललं जात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT: फाफची दमदार सुरुवात अन् कार्तिकचा फिनिशिंग टच... मधली फळी गडगडली तरी बेंगळुरूची विजयाची हॅट्रिक

Raj Thackeray : ''त्यांना मुख्यमंत्रीपद हवं होतं म्हणून ते मोदींवर टीका करतायत'' कणकवलीतून राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Sharad Pawar : 'होय, शरद पवार अतृप्त आत्मा....'; किरण मानेंनी कारकीर्दच मांडली

ISL 2024: मुंबई सिटी ठरले चॅम्पियन! अंतिम सामन्यात मोहन बगानला चारली पराभवाची धूळ

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT