Liger Trailer News
Liger Trailer News  esakal
मनोरंजन

Liger Trailer: लायगरच्या ट्रेलरसाठी एकच शब्द, 'कडक'

युगंधर ताजणे

Liger Trailer: क्रॉस बीड आहे माझा मुलगा लायगरची आई त्याच्याविषयी सांगते. तेव्हाच लायगर हा साधा सुधा नसून भलताच तिखट आहे याची प्रेक्षकांना जाणीव होते. आता लायगरचा ट्रेलर व्हायरल झाला आहे. विजय देवरकोंडाची प्रमुख भूमिका असलेला लायगर हा गेल्या काही वर्षांपासून चर्चेत असणारा चित्रपट आहे. (Tollywood Actors News) त्याच्यात अनन्या पांडे मुख्य अभिनेत्री म्हणून दिसणार आहे. आज सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या ट्रेलरला नेटकऱ्यांचा तुफान प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले आहे. ट्रेलरमध्ये विजय देवरकोंडाचा (New Trailer News) वेगळाच अवतार पाहायला मिळतो आहे. ट्रेलरमधूनच विजयचा लायगर कसा असणार याची प्रचिती आल्याशिवाय राहत नाही. वेगवान कथानक, (Vijay Deverakonda new movie) क्राईम, थ्रिलर या प्रकारातील या चित्रपटानं अवघ्या काही तासांत लाखो व्ह्युज मिळवले आहेत.

सगळ्यात पहिल्यांदा लायगरचा ट्रेलर हा जाहिरपणे हैद्राबादमध्ये प्रदर्शित (Entertainment News) करण्यात आला होता. त्यावेळी मोठ्या इव्हेंटचे आयोजनही करण्यात आले होते. धर्मा प्रॉडक्शनच्यावतीनं या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे. ट्रेलरविषयी बोलायचे झाल्यास, त्याची सुरुवात लायगरच्या आक्रमक इंट्रीतून होते. त्याची आई म्हणते, ना तो लायन आहे ना तो टायगर आहे, त्या दोन्हींचे क्रॉस ब्रीड लायगर आहे. त्यानंतर विजयचा दणदणाट सुरु होतो. ते वेगानं आपल्या शत्रुंवर तुटून पडताना दिसतो. यासगळयात त्याचा संघर्ष दाखवण्यात आला आहे. अनन्याच्या हटक्या स्टाईलनं देखील लक्ष वेधून घेतले आहे.

लायगरचे दिग्दर्शन जगन्नाथ पुरी यांनी केलं आहे. लायगरमधून विजय देवरकोंडा हा बॉलीवूडमध्ये पदार्पण करतो आहे. तर अनन्या तेलुगू चित्रपटांकडे जाताना दिसत आहे. लायगरमधील विजयचे वेगवेगळे लूक्स समोर आले होते. त्यालाही त्याच्या चाहत्यांचा मोठा प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले आहे. आता चाहत्यांना विजयच्या लायगरची कमालीची उत्सुकता आहे. हा चित्रपट 25 ऑगस्टला थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. हैद्राबादमध्ये तर सुदर्शन थिएटरमध्ये लायगरचा ट्रेलर व्हायरल करण्यात आला होता.

दाक्षिणात्य चित्रपट विश्वामध्ये विजय देवरकोंडाचा चाहतावर्ग मोठा आहे. त्याच्या अर्जुन रेड्डी, डियर कॉम्रेड, गीता गोविंदम या चित्रपटांना मोठा प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले आहे. सध्याच्या घडीला आघाडीच्या अभिनेत्यांमध्ये त्याचे नाव घेतले जाते. लायगर हा हिंदी शिवाय आणखी चार भाषांमध्ये देखील प्रदर्शित होणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Politics: विधानसभेपूर्वी महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा भूकंप होणार? बंडखोर ठाकरे-पवारांकडे परतणार?

Election Commission : ''सिस्टीममध्ये कुठलीही चूक होऊ शकत नाही'', मतमोजणीच्या तयारीबद्दल मुख्य आयुक्त राजीव कुमार म्हणाले...

Priyanka Chopra Beauty Tips: चमकदार त्वचेसाठी देसी गर्लने शेअर केली बॉडी स्क्रब बनवण्याची सोपी पद्धत

Bengluru Viral Video : बंगळुरूमध्ये कोकोनट अटॅकरची दहशत ; भरदिवसा गाडी फोडली, व्हायरल होतोय व्हिडीओ

मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपीचा कळंबा कारागृहात खून; नेमकं काय घडलं? मृतदेह स्वीकारण्यास पत्नीचा का नकार?

SCROLL FOR NEXT