gaurav more, sujay vikhe patil, dr sujay vikhe patil dance video, Maharashtrachi Hasyajatra, shirdi SAKAL
मनोरंजन

Maharashtrachi Hasyajatra फेम गौरव मोरे सोबत सुजय विखे पाटलांचा शिर्डीतील भन्नाट डान्सचा Video बघाच

गौरव मोरेचं प्रचंड फॅन फॉलोईंग आहे

Devendra Jadhav

Gaurav More News: 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' हा लोकप्रिय कार्यक्रम म्हणून सुरुवातीपासून चर्चेत आहे. या कार्यक्रमातील सर्वच कलाकारांनी प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलंय. या कार्यक्रमातील गौरव मोरेचं प्रचंड फॅन फॉलोईंग आहे.

गौरव मोरेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. यात गौरव भाजप खासदार डॉ. सुजय विखे पाटलांसोबत भन्नाट डान्स करताना दिसतोय.

(Maharashtrachi Hasyajatra fame gaurav more dance with bjp mp sujay vikhe patil on the song of my name is lakhan at shirdi)

शिर्डीत नुकत्याच पार पडलेल्या महापशुधन एक्स्पोच्या निमित्ताने शेतकरी बांधवांसाठी मनोरंजनाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते..

यादरम्यान भाजपचे खासदार सुजय विखे यांनी हास्यजत्रा फेम गौरव मोरे आणि गायक सुदेश भोसले यांच्यासोबत 'वन-टू- का फोर माय नेम इस लखन' गाण्यावर जबरदस्त डान्स केला.

या डान्सचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय.. सुजय विखे यांनी गाण्याच्या तालावर मनमुराद डान्स केल्याचं या व्हिडीओत दिसतंय..

तर उपस्थितांनी देखील एकच जल्लोष करत विखे यांच्या डान्सला दाद दिलीये.. गौरव मोरे आणि सुजय विखे यांच्या डान्सची जुगलबंदी सर्वांना आवडली आहे.

याशिवाय गौरव मोरे शिर्डी महोत्सवातील सुदेश भोसले यांच्यासोबतचा व्हिडिओ शेयर केलाय. "शिर्डी महोत्सव २०२३…, ज्यांना बघुन आपण मोठे झालो.

आपल जेवढ वय आहे तेवढा अनुभव असलेले सुदेश सरांसोबत मंच शेयर करायला मिळण हे मी माझ भाग्यच समजतो. I love you sirrrr and thank you for yesterday night, i never forget" अशी पोस्ट लिहून गौरवने त्याच्या भावना शेयर केल्यात.

'फिल्टरपाड्याचा बच्चन' म्हणून गौरव मोरेची ओळख आहे. गौरवची केस उडवण्याची खास स्टाईल, त्याच्या एंट्रीला येणारं खास म्युझिक अशा सर्व गोष्टी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना ठाऊक आहेत.

सचिन मोटे, सचिन गोस्वामी या निर्मात्या - दिग्दर्शकांनी गौरवला हास्यजत्रेत संधी दिली. आणि गौरवने त्या संधीच सोन केलं. याचाच परिणाम आज जगभरातील प्रेक्षक गौरववर खूप प्रेम करतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lonar Lake Level: कमळजा मातेच्या मुखवट्याला पाण्याचा स्पर्श; लोणार सरोवरातील जलपातळी आणखी धोक्याच्या टप्प्यावर!

Latest Marathi News Live Update : सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा कारवाईचा बडगा

IPO Market : सरकारी मिनीरत्न कंपनीत गुंतवणुकीची संधी! आजपासून IPO खुला; आधी जाणून घ्या ही महत्त्वाची माहिती

Sushma Andhare : नगरसेवकांची पदे लिलावातच काढा; उमेदवारांना दिल्या धमक्या, अंधारे यांची भाजपवर टीका

Vote Counting Center Declare : पुण्यातील मतमोजणी केंद्रे जाहीर! तुमच्या भागातील मतमोजणी कोणत्या ठिकाणी होणार वाचा सविस्तर

SCROLL FOR NEXT