Vishakha Subhedar post on trollled Esakal
मनोरंजन

Vishakha Subhedar: "मी नाचल्याने भुकंप होईल असं म्हणता?" विशाखा सुभेदारचं ट्रोलर्सला सडेतोड उत्तर

Vaishali Patil

Vishakha Subhedar Video: महाराष्ट्राची हास्यजत्रा मधील सुप्रसिद्ध अभिनेत्री म्हणून विशाखा सुभेदार हिच्याकडे पाहिले जाते. विशाखा सुभेदार यांनी अनेक भूमिकांमधून आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवलं आहे. विशाखा आणि विनोद हे समीकरण झालं आहे.

गेली कित्येक वर्ष 'फू बाई फू', 'हास्य जत्रा' अशा कार्यक्रमातून तिनं आपलं मनोरंजन केलं आहे. तर कधी नाटक आणि चित्रपटातून ती आपल्या अभिनयाची चुणूक दाखवत असते. आपल्याला हसवणारी अभिनेत्री म्हणजे विशाखा सुभेदार अशी एक ओळखचं तिची झाली आहे.

मात्र विशाखा ही तिच्या विनोदी शैलीबरोबरच तिच्या उत्तम नृत्यांसाठीही ओळखली जाते. ती सोशल मीडियावर तिचे अनेक व्हिडिओ आणि फोटो शेयर करत असते. तिचे फोटो चाहत्यांना पसंतही पडतात तर काही नेटकरी तिला तिच्या वजनामुळे ट्रोल देखील करतात.

अशातच आता पुन्हा विशाखाने तिचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेयर केला आहे. या व्हिडिओत ती मराठी गाण्यावर डान्स करताना दिसतेय. मात्र या व्हिडिओतील तिच्या डान्स पेक्षा तिच्या पोस्टच्या कॅप्शने सर्वांचे लक्ष वेधले आहे.

विशाखाने तिच्या कॅप्शनमध्ये लिहिले की, "मी लाडाची....! आत्ता धरती मातेच काय होईल? भूकंप होईल ह्या सगळ्या कंमेंट ठेवा... तुमच्यापाशी..!

हो..आहे वजनदार पण मला पण enjoy करु द्या कीं तुमचं रंजन करत आलेच आहे कीं मी.. मज्जेत राहू द्या आणि तुम्ही पण मज्जेत रहा.!"

असं हटके कॅप्शन देत विशाखाने तिला वजनावरुन ट्रोल करणाऱ्यांची बोलतीच बंद केली आहे. तिला नेहमीच तिच्या शरीरयष्टीवरुन ट्रोल केलं जाते. तिच्या जाडेपणाची खिल्ली उडवली जाते. तिच्या पोस्टच्या कॅप्शनमध्ये तिला बऱ्याचदा अशा कमेंट असतात. त्यामुळे या व्हिडिओला अशा कमेंट करणाऱ्यांना तिनं आधीच सणसणीत उत्तर दिलं आहे.

सध्या तिची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तिच्या चाहत्यांनी तिच्या डान्सचं तर अनेकांनी तिच्या कॅप्शनचं कौतुक केलं आहे.

एकानं लिहिलयं की, एक नंबर डियर...कॅप्शनची खरच काहीच गरज नाही. आणि जे तब्येतीबद्दल बोलतात त्यांना या पैकी एक जरी अदा,डान्स, expression जमतात का?हा प्रश्न स्वतःला विचारावा. मग जज करा, नावे ठेवा म्हणावं.

तर दुसऱ्याने लिहिलयं की, दिदी असं वाटलं की तुम्हीच गाणं गायले आहे... तुमचा dance, expression आणि ऊर्मिला दीचा आवाज Perfect match झालं आहे...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satej Patil Shivaji Patil : गोकुळच्या रणधुमाळीत सतेज पाटील, शिवाजीराव पाटलांच्या घरी; महायुतीत नाराजीचा ‘वेध’ घेतल्याची चर्चा

Ichalkaranji Politics : इचलकरंजीचं राजकारण तापणार! प्रकाश आवाडे थेट लोकसभेच्या रिंगणात? खासदार माने गटाची वाढली धडधड, 'त्या' वक्तव्यानं वाढवलं टेन्शन

US H1B Visa: अमेरिकेचा H1B झटका! १ लाख ३ हजार डॉलर अतिरिक्त शुल्कामुळे नोकऱ्या परदेशात जाण्याची भीती

Marathi News Live Updates : ई-चलनाविरोधातील आमरण उपोषण तात्पुरते स्थगित; दोन आठवड्यांत निर्णय न झाल्यास पुन्हा आंदोलनाचा इशारा

Birth Death Registration Rules : जन्म-मृत्यू नोंदीला दोन वर्षे विलंब, तर न्यायालयाचे दार ठोठावे लागणार; केंद्राचे नवे कडक नियम लागू, गैरप्रकार रोखण्यासाठी पाऊल

SCROLL FOR NEXT