Maheep Kapoor Shocking revealation husband sanjay kapoor cheated her in twenty five years of marriage Google
मनोरंजन

अभिनेता संजय कपूरच्या पत्नीचा त्याच्या विवाहबाह्य संबंधांविषयी मोठा खुलासा

Fabulous Lives Of Bollywood Wives या कार्यक्रमाच्या नवीन सिझनमध्ये महिप कपूर हा धक्कादायक खुलासा करताना दिसणार आहे.

प्रणाली मोरे

Fabulous Lives Of Bollywood Wives चा नवीन सिझन लवकरच ओटीटीवर सुरु होत आहे. या शो ची गेल्या काही दिवसापासून चर्चा होती. महीप कपूर(Maheep Kapoor),नीलम कोठारी, भावना पांडे आणि सीमा सचदेव यांच्या ग्लॅमरस आयुष्याची झलक दाखवणाऱ्या या शोचा पहिला सिझन चांगलाच हीट झाला. पहिल्या सीझनमध्ये चारही स्टार पत्नींनी खूप खळबळजनक खुलासे केले होते. दुसऱ्या सीझनमध्ये देखील असेच धक्कादायक खुलासे होणार असल्याची चर्चा आहे. दुसऱ्या सीझनच्या एका भागात महीप कपूरने पती संजय कपूरशी(Sanjay Kapoor) संबंधित एक खुलासा केला आहे,जो सगळ्यांचे होश उडवणार आहे. दुसरा सीझन नेटफ्लिक्सवर आज २ सप्टेंबर रोजी सुरु होणार आहे.(Maheep Kapoor Shocking revealation husband sanjay kapoor cheated her in twenty five years of marriage)

अभिनेता संजय कपूरची पत्नी महीप कपूरने सांगितलं की, लग्नाला २५ वर्ष झाली पण त्यादरम्यान संजयन आपल्याला धोका दिला आहे. हैराण करणारी एक गोष्ट शेअर करत महीप कपूर म्हणाली की आपण हे इथे याविषयी सांगणार आहोत हे संजयला माहीत नाही. महीप कपूरने एका वेबसाईटशी यासंदर्भात बातचीत केली आहे. महीप कपूरला जेव्हा विचारलं गेलं की,'संजय कपूर आणि तिच्या नात्यातील ही अत्यंत वैयक्तिक गोष्ट शो मध्ये सांगण्याआधी तिनं पती किंवा कुटुंबाला सांगितले होते का? तेव्हा काय म्हणाली महीप कपूर एकदा वाचाच.

महीप कपूर म्हणाली,''असं काही नव्हतं की मला ते सांगताना खूप विचार करावा लागला वगैरे. हे सहज बोललं गेलं. आम्ही फक्त बोलत होतो आणि मी ती गोष्ट बोलून गेले. आम्ही या शो मध्ये आमच्या वैयक्तिक आयुष्याविषयी सांगण्याचा प्रयत्न केला आहे. मला आशा आहे की,शो पाहणाऱ्या महिला मला समजून घेतील. कारण नेहमीच बाहेरुन सगळं चकाचक,छान दिसणारं सगळं चांगलच असतं असं नाही. प्रत्येकाला त्याच्या आयुष्यात उतार-चढावचा सामना करावा लागतो. असं नाही की आमच्या आयुष्यात सगळंच छान असतं. आमच्याही आयुष्यात अडचणी असतात हे तुम्हाला या शोमुळे कळेल. त्यामुळे याविषयी बोलणं गरजेचं होतं''.

महीप कपूर म्हणाली की,संजय कपूरनं आपल्या वैवाहिक आयुष्यात धोका दिला हे शो मध्ये सांगण्याआधी आपण अभिनेत्याला सांगितले नव्हते. ती म्हणाली,''संजयला काहीच माहित नाही. त्यालाही हा शो पाहिल्यावरच कळेल''.

संजय कपूर अभिनेता अनिल कपूरचा धाकटा भाऊ असून,त्यानं बॉलीवूडच्या बऱ्याच सिनेमात काम करून अभिनेता म्हणून आपलं नशीब आजमावल आहे. संजय कपूरनं १९९७ मध्ये महीप कपूरशी लग्न केलं होतं. दोघांचा संसार जवळपास २५ वर्षांचा झाला आहे. महीप कपूर आणि संजय कपूरची मुलगी शनाया कपूर लवकरच बॉलीवूड मध्ये पदार्पण करत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Men Hockey Asia Cup: भारत पुन्हा आशियाचा बादशाह! आशिया कप फायनलमध्ये कोरियाचा पराभव, चषकावर चौथ्यांदा ताबा मिळवला

Lalbaugcha Raja Visarjan: सर्व अडथळे पार करून ३३ तासांच्या मार्गक्रमणानंतर लालबागच्या राजाचे विसर्जन संपन्न

Mohol News : सोलापूर-पुणे महामार्गावर अज्ञात पुरुषाचा कुजलेला मृतदेह सापडला, मोहोळ पोलिसांचा तपास सुरू

Ganpati Visarjan 2025 : देगलूरनगरीत ढोल, ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप; पुढच्या वर्षी लवकर या... या घोषणेने शहर दुमदुमले...!

उत्सवप्रिय सोलापुरात पहिल्यांदाच डीजेमुक्त मिरवणुका! पोलिस आयुक्तांचे मायक्रो प्लॉनिंग, सोलापूर कृती समितीसह सर्व सोलापूरकरांचा पुढाकार

SCROLL FOR NEXT