Malaika Arora trolled for her look at Miss India 2022  Google
मनोरंजन

Miss India 2022: मलायकाच्या ड्रेसचा कहर,अंतर्वस्त्र दिसली अन् ट्रोल झाली

'मिस इंडिया 2022' च्या सोहळ्यात मलायकाच्या गळ्यात सलमानच्या ब्रेसलेटसारखा नेकलेस दिसला म्हणूनही नेटकऱ्यांनी तिच्यावर प्रश्नांचा भडिमार केलेला आहे.

प्रणाली मोरे

बॉलीवूड दिवा मलायका अरोरा (Malaika Arora) नेहमीच आपल्या स्टाईल आणि फॅशनमुळे सर्वांचे लक्ष वेधून घेताना दिसते. ज्या कार्यक्रमात ती हजेरी लावते तिथे तिच्या उपस्थितीमुळे चारचॉंद लागतात हे निश्चित. यंदाच्या मिस इंडिया २०२२(Miss India 2022) सोहळ्याला देखील ती हजर राहिली होती. या सोहळ्यातील तिच्या लूक आणि सिझलिंग अंदाज अनेकांना भावला आहे तर बऱ्याच जणांना खटकला आहे. सोशल मीडियावर मलायकाचे फोटो आणि व्हिडीओवर भलतीच चर्चा रंगलेली दिसतेय. पण यामागे एक खास कारण आहे,चला जाणून घेऊया त्याविषयी.(Malaika Arora trolled for her look at Miss India 2022)

आपल्या सर्वांनाच मलायकाच्या मिस इंडिया २०२२(Miss India 2022) सोहळ्यातील लूकची इतकी चर्चा का रंगली आहे याविषयी जाणून घ्यायचं असणार. ती नेहमीच आपल्या ग्लॅमरस आणि सिझलिंग अंदाजानं चर्चेचा विषय ठरते. मिस इंडिया कार्यक्रमात मलायकाच्या गळ्यातील नेकलेसला पाहून लोकांना मात्र सलमान खानच्या हातातील त्या प्रसिद्ध ब्रेसलेटची आठवण झाली आहे. मलायकानं आपल्या गळ्यात ग्रीन कलरच्या स्टोनचा नेकलेस परिधान केला आहे,जो तंतोतंत सलमान खानच्या ब्रेसलेट सारखा दिसत आहे,ज्या ब्रेसलेटला दबंग खान नेहमीच हातात घालून असतो.

मलायकाच्या नेकलेसला पाहून नेटकरी तिनं गळ्यात सलमानचा ब्रेसलेट तर घातला नाही न? असा प्रश्न विचारताना दिसत आहेत. एका नेटकऱ्यानं लिहिलं आहे-'सलमान खानचं ब्रेसलेट गळ्यात घातलं आहेस वाटतं'. तर दुसऱ्या एका नेटकऱ्यानं लिहिलं आहे की-'हे सलमान खानचं ब्रेसलेट हिच्या गळ्यात काय करतंय? चुकून घेऊन आली होती का खान कुटुंबाच्या घरातून निघताना?'.

Malaika Arora trolled for her look at Miss India 2022

मलायकाच्या ब्रेसलेटविषयी तर आपण बोललो. आता जरा बोलूया अभिनेत्रीच्या ड्रेस आणि लूक विषयी. 'मिस इंडिया २०२२' कार्यक्रमात मलायका अरोराने सोनेरी रंगाचा ट्रान्स्परंट ड्रेस परिधान केला होता. चक्क या ड्रेसमधून तिची अंतर्वस्त्र देखील दिसत आहेत. आणि त्यांचा रंग ड्रेसपेक्षा पूर्ण मिसमॅच असल्याकारणानं ते आणखी विचित्र दिसत आहे. काही जणांनी तिच्या अंतर्वस्त्रा वरुनही तिला ट्रोल केलं आहे.

मलायकानं मिस इंडिया सोहळ्यात सोनेरी रंगाच्या ड्रेससोबत केलेला मेकअप खूप Subtle ठेवला होता. तिच्या स्टायलिश हेअर स्टाईलने मात्र तिच्या लूकचा चार्म वाढवला होता हे खरं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT