Malaika Arora talks about her life decisions and ex-husband Arbaaz Khan  Esakal
मनोरंजन

Malaika Arora Birthday: 'खान' आडनाव काढणं मलायकाच्या आयूष्यातील सर्वात मोठी चुक?

आज मलायका अरोराचा वाढदिवस आहे

सकाळ डिजिटल टीम

Malaika Arora Birthday: आज मलायका अरोराचा वाढदिवस. बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा ही तिच्या व्यावसायिक आयुष्यापेक्षा तिच्या वयक्तिक आयूष्यामुळे जास्त चर्चेत असते. ती सतत काही ना काही कारणाने सर्वाचे लक्ष तिच्याकडे वेधुन घेते. मलायकाने वयाची पन्नाशी गाठली आहे. मलायका ही अजूनही खुप तरुण दिसते. त्यासाठी ती तितकी मेहनतही घेते.

तिला बॉलिवुडवची फिटनेस फ्रिक यामुळेच म्हटलं जाते. कधी अर्जुन कपूरला डेट केल्यामुळे तर कधी तिच्या कपड्यामुळे तर कधी तिच्या चालण्यामुळे ती नेहमीच ट्रोलही होत असते. मात्र तिच्यावर या ट्रोलिंगचा काहीही परिणाम होत नाही असंही ती स्पष्टच म्हणते. नुकतच तिने तिच्यावर होत असलेल्या ट्रोलिंगसाठी 'मूव्हिंग इन विथ मलायका' हा शो देखील सुरु केला होता.

मलायका अरबाज खानपासून घटस्फोट घेतल्यानंतर जरा जास्तच चर्चेत आली. तिने आयुष्यात अनेक नवीन गोष्टी केल्या. ती कधीच तिच्या नात्याबद्दल मीडियासमोर बोलत नाहीत, पण आता मलायकाने एका इव्हेंटमध्ये याबद्दल मोकळेपणाने भाष्य केले आहे. खान कुटुंबापासून विभक्त झाल्यानंतर तिचे आयुष्य कसे बदलले ते सांगितले आहे.

मलायका अरोरा 1998 मध्ये लग्नानंतर 2017 मध्ये अरबाज खानपासून वेगळे झाली. निर्णय दोघांचा होता त्यामुळे फारसा गोंधळ झाला नाही. सर्व काही शांततेत झालं. आता इंडिया टुडे कॉन्क्लेव्ह 2023 मध्ये मलाइकाला विचारण्यात आले की तिच्या यशाचे श्रेय खान कुटुंबाला दिले जात आहे. यात किती तथ्य आहे.

याला उत्तर देताना ती म्हणाली, 'त्या आडनावाने मला माझ्या आयुष्यात खूप मदत केली आहे पण माझ्या मागे एखादे प्रसिद्ध आडनाव आहे या वस्तुस्थितीसोबत मी जगू शकेन असं मला वाटत नाही. मला वाटत नाही की मला माझ्या आयुष्यात एवढेच करायचं होते. त्याने माझ्यासाठी बरेच दरवाजे उघडले पण मला वाटते की शेवटी मला माझ्या खान आडनावाशिवाय काम करावे लागेल आणि ते मी करत आहे.'

मलायका अरोरा म्हणाली, 'माझ्याकडे बरेच लोक होते ज्यांनी मला सांगितले की मी खान आडनाव सोडणे ही सर्वात मोठी चूक करत आहे. अनेकजण मला सांगत होते की, तुला आडनावाचं महत्त्व माहीत नाही. मला माझे एक्स सासरे आणि एक्स कुटुंबाबद्दल खूप आदर आहे, त्यांनी माझ्यावर खूप प्रेम केले आहे.'

'मला एक मूलगा आहे आणि मी त्या कुटुंबाचा एक भाग आहे, पण फक्त मला माझ्यासाठी माझ्या स्वतःच्या पायावर उभं राहण्याची गरज आहे .ते फक्त आडनावाबद्दल नाही तर ते माझ्यासाठी, माझं सासरचं आडनाव सोडणं आणि माझ्या माहेरचं आडनाव परत आल्यानं मला याची जाणीव झाली की मी आयुष्यात काहीही करू शकते.'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 3rd Test: तुमचा अभिमान! शुभमन गिल पराभवानंतर काय म्हणाला? सामना नेमका कुठे फिरला हे सांगितलं, जसप्रीतबाबत...

Video: सर्वच सीमा ओलांडल्या! फेमस होण्यासाठी बाईकवर जोडप्याचं नको ते कृत्य, लोकांनी व्हिडिओ बनवून व्हायरल केला

IND vs ENG 3rd Test: मोहम्मद सिराज दुर्दैवी पद्धतीने बाद झाला, रवींद्र जडेजा हतबल दिसला; इंग्लंड तिथेच जिंकला Video

Mhada Lottery: मुंबईकरांना म्हाडाकडून आनंदवार्ता! ५ हजारहून अधिक घरांची लॉटरी जाहीर; 'असा' करा अर्ज

ENG vs IND, 3rd Test: जडेजा लढला, पण इंग्लंडने लॉर्ड्स कसोटी जिंकली! १९३ धावा करतानाही भारताची उडाली भंबेरी

SCROLL FOR NEXT