mandana's kamiri revealed her secret at lock up show
mandana's kamiri revealed her secret at lock up show esakal
मनोरंजन

लॉक अप शो दरम्यान उलगडले मंदानाचे रहस्य... रहस्य ऐकून आले अश्रू ......

सकाळ ऑनलाईन टीम

लॉक अप शो अनेकजण आवडीने पाहतात.सध्या चर्चेत असलेली मंदाना करीमी ही इरानियन मॉडेल असून तीने बिग बॉस ९ मधेही प्रवेश मिळवला होता. 'भाग जॉनी' या हिंदी सिनेमातील अभिनयाने तिने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले होते.एवढेच नव्हे तर २०१५ मधे तिला दुसऱ्या रनर अप चा मान मिळाला होता.अलीकडे तिने लॉक अप शो मधे तिचं असं काही रहस्य जगासमोर उघड केलंय ज्यामुळे ती सर्वत्र चर्चेत आली आहे.दररोज बघण्यात येणाऱ्या 'लॉक अप शो' च्या रविवारच्या 'जजमेम्ट एपिसोड डे' मधे मंदानाने अनेकांना रडवून सोडले.प्रेक्षकांना आणि या शो ची होस्ट अभिनेत्री कंगना राणावतला देखील तिचे अश्रू थांबवता आले नाही असा तो प्रसंग होता. नेमकं काय रहस्य मंदानाने उघड केले असावे ज्यामुळे अनेकांना त्यांचे अश्रू अनावर झालेत.खरं तर शो मधून स्वतःला बाद होण्यापासून थांबवण्यासाठी मंदाना करीमीने तिचे जगापासून लपवलेले सत्य शो मधून जगासमोर उघड केले.

अभिनेत्री मंदाना करीमीने 'लॉक अप शो' मधून बाहेर पडण्यापासून स्वतःला वाचवण्यासाठी एक गुपित उघड करणे निवडले.ज्यामधे तिने एकदा एका चित्रपट निर्मात्याशी तिचे प्रेमसंबंध कसे होते हे उघड केले.प्रेमसंबंधातून ती गर्भवती झाली पण तिच्या अपेक्षेप्रमाणे गोष्टी घडल्या नाहीत.घटस्फोटानंतर एका चित्रपट निर्मात्यासोबत तिचे गुप्त संबंध कसे होते याबद्दल सांगताना ती म्हणाली,"स्त्रियांच्या हक्कांबद्दल बोलणाऱ्या एका नामवंत दिग्दर्शकाशी माझे नाते होते. तो अनेक लोकांसाठी एक आदर्श आहे.आम्ही गर्भधारणेची योजना आखली होती…आणि जेव्हा ते घडले तेव्हा तो…,एवढे म्हणत तिचे अश्रू अनावर झालेत.मंदाना करीमीचे रहस्य ऐकून 'लॉकअप' मधील होस्ट कंगना राणावतसह उपस्थित सगळे अश्रू ढाळायला लागले.कंगना मंदानाचे अश्रू पुसताना अस्वस्थ झाली होती.

२०१८ मधे हिंदुस्थान टाइम्सशी बोलताना एका मुलाखतीत तिने तिच्या भूकाळात घडलेल्या काही गोष्टींची आठवण काढत अत्यंत स्कारात्मक संदेश दिला.ती म्हणाली,"२०१७ मधे माझे उद्योगपति गौरव गुप्तासोबत लग्न झाले होते.लग्नाच्या पाच महिन्यानंतर आम्ही एकमेकांपासून वेगळे झालोत.त्यानंतर मी त्याच्यावर आणि त्याच्या कुटुंबाविरुद्ध घरगुती हिंसाचाराचा गुन्हाही दाखल केला होता.या सगळ्याचा माझ्या वयक्तिक आयुष्यात फार खोलवर परिणाम झाला होता.या सगळ्या गोंधळामुळे घरातून बाहेर पडायची इच्छाच होत नव्हती.पण नशिबाने मला मिळालेला मित्रपरिवार फार चांगला होता. त्यांनी मला धैर्य दिलं.त्यामुळे तुम्हाला जिथे सर्व काही संपल्या सारखं वाटतं तिथून पुढे नव्याने कशी सुरुवात करता येईल ते बघा,पुन्हा स्वप्न पहा."

लॉक अप हा कंगना राणावतद्वारे होस्ट केला जाणारा एक रिऍलिटी शो आहे ज्यामधे मंदानाचेच नाही तर अनेकांचे जगाला न माहित असणारे रहस्य उघड झाले आहेत.या शो मध्ये करण कुंद्रा आठवड्याला एकदा ‘जेलर’ म्हणून दिसतो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pat Cummins SRH vs RR : डेथ ओव्हरमध्ये कमिन्सचा टेरर! रजवाड्यांची कडवी झुंज मोडून काढत हैदराबादचा नवाबी थाटात विजय

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

SRH vs RR IPL 2024 : शेवटच्या चेंडूवर भूवीने हैदराबादला मिळवून दिला विजय

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

SCROLL FOR NEXT