Manoj Bajpayee With wife Shabana Esakal
मनोरंजन

Manoj Bajpayee: कुटुंबाला स्वतःचा सिनेमा दाखवून पस्तावलेला मनोज बाजपेयी...पत्नीनं रागानं थिएटरमध्येच..

सध्या मनोज बाजपेयी 'सिर्फ एक बंदा काफी है' या सिनेमामुळे चर्चेत आहे..नुकतंच एका मुलाखतीत त्यानं आपल्या बायकोचा एक हैराण करणारा किस्सा सांगितला आहे.

प्रणाली मोरे

Manoj Bajpayee: बॉलीवूड अभिनेता मनोज बाजपेयीच्या अभिनयाचे लाखो दिवाने आहेत. मनोज बाजपेयीनं आपल्या करिअरमध्ये अनेक सिनेमातून काम केले आहे आणि आपल्या अभिनयानं सगळ्यांना चकित करून सोडलं आहे.

मनोजनं अधिक करून आपल्या करिअरमध्ये खलनायकी पात्र जास्त रंगवली आहेत. आणि त्याच्या या सर्व व्यक्तिरेखांसाठी जोरदार प्रशंसाही झाली पण त्याच्या बायकोला या भूमिका फार काही पटल्या नाहीत किंवा आवडल्या नाहीत. (Manoj Bajpayee wife shabana felt insulted watching films guided actor said this)

मनोजनं या गोष्टीचा खुलासा करत म्हटलं आहे की जेव्हा एकदा तो आपल्या पत्नीसोबत त्याचा स्वतःचा सिनेमा पहायला गेला होता तेव्हा त्याला तिच्याकडनं खूपच ओरडा पडला होता. मनोज बाजपेयीनं एका मुलाखतीत याचा खुलासा करत म्हटलं होतं की त्याच्या बायकोला त्याचा एक सिनेमा मुळीच आवडला नव्हता. आणि तिनं यावरनं मनोजला खूप सुनावलं होतं.

जेव्हा मनोज आपल्या पत्नीसोबत स्वतःचा सिनेमा पहायला गेला तेव्हा तिला सिनेमातील मनोजची भूमिका आवडली नव्हती. तिला त्याचा खूप राग आला होता. आणि तिला मनोज आपला नवरा असल्याची खूप लाज वाटू लागली होती. आणि तिनं थेट मनोजला हे तोंडावर बोलून दाखवलं होतं.

मनोज बाजपेयीची पत्नी शबाना(नेहा)नं म्हटलं की,''आपल्याला पैशाची एवढी देखील गरज नाही. त्याला असे सिनेमे करायला नकोत ज्यामुळे कुटुंबाला त्याच्या या कामामुळे लाज वाटेल. तो एक चांगला अभिनेता आहे आणि त्याला चांगल्या भूमिका अधिक शोभतात. त्यामुळे त्याला असं काही करायची गरज नाही जे पाहताना खूप वाईट वाटेल''.

सध्या मनोज बाजपेयीचा 'सिर्फ एक बंदा काफी है' यावेळी चर्चेत आहे. या सिनेमाला चाहते अधिक पसंत देखील करत आहेत. सिनेमात मनोज बाजपेयीच्या अभिनयाची जोरदार प्रशंसा होताना दिसत आहे आणि बोललं जात आहे की सिनेमाच्या टायटलप्रमाणेच मनोज बाजपेयीनं आपल्या खांद्यावर अख्खा सिनेमा उचलून धरला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Delhi Alert: 60 किलोमीटरच्या वेगाने दिल्लीच्या दिशेने येतेय वादळ! 'नोएडा'सह लगतची शहरं अंधारात

Ganeshotsav: गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना मोठी भेट! मुंबईतून पुन्हा धावणार ‘मोदी एक्स्प्रेस’; बुकिंग कधीपासून? पाहा संपूर्ण वेळापत्रक

Nepal Floods: हिमालय धोक्यात? नेपाळच्या महापुराने वाढवली भारताची चिंता! नेमकं काय घडतंय?

Bank Holiday: रक्षाबंधनला बँका बंद की सुरू? पाहा RBI काय सांगते

IND vs SL: फॉलोऑन देऊनही फसला प्लॅन! भारताच्या हातातून विजय निसटला, दिनूशा एकटा नडला; कोलंबो कसोटी 'ड्रॉ'

SCROLL FOR NEXT