Marathi actor PUSHKAR SHROTRI House Steals Gold Ornaments and Cash worth 10 Lakh Rupees House Help arrested SAKAL
मनोरंजन

Pushkar Shrotri: पुष्कर श्रोत्रीच्या घरुन १० लाखांचा ऐवज चोरीला, कामवालीनेच मारला डल्ला

पुष्कर श्रोत्रीच्या घरी चोरी झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आलीय

Devendra Jadhav

Pushkar Shrotri News: मराठी अभिनेता पुष्कर श्रोत्रीच्या घरी चोरी झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आलीय. पुष्करच्या घरुन 10 लाख किमतीचे सोन्याचे दागिने चोरीला गेले आहेत.

याशिवाय पुष्करच्या घरातून लाखांपेक्षा जास्त रोकड आणि तब्बल ६० हजार रुपयाचं परदेशी चलन सुद्धा चोरीला गेलंय. पुष्करने याप्रकरणी उषा गांगुर्डे आणि भानुदास गांगुर्डे या दोन जणांविरुद्ध फसवणूक आणि विश्वास भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

FIR नुसार, पुष्कर विलेपार्ले इस्टला राहतो. पुष्कर श्रोत्रीकडे घरकामासाठी आणि वडिलांची काळजी घेण्यासाठी तीन हेल्पर होते. त्यापैकी एक उषा गांगुर्डे (41) या गेली अनेक वर्ष पुष्करकडे कामाला होत्या.

ही घटना घडल्यावर 22 ऑक्टोबरला पुष्करची पत्नी प्रांजलला उषा गांगुर्डे हिच्यावर संशय आला. त्यांनी पोलिसांशी संपर्क साधला आणि तपासादरम्यान तिने पैसे चोरल्याचे कबूल केले. उषा यांनी पती भानुदास गांगुर्डे यांच्या मदतीने हे पैसे चोरल्याची कबुली दिली. (Latest Entertainment News)

याशिवाय एका वृत्तसंस्थेने दिलेल्या रिपोर्टनुसार, 24 ऑक्टोबर जेव्हा पुष्करची पत्नी प्रांजल शोत्रीने कपाटातून सोन्याचे दागिने काढले आणि तिला काहीतरी गडबड असल्याचं लक्षात आलं.

तिने दागिने सोनाराकडे नेले असता दागिने नकली असल्याचं तिच्या लक्षात आलं. म्हणुन तिने कामवाली बाई उषा गांगुर्डेंच्या दिशेने संशय व्यक्त केला. (Latest Marathi News)

पुढे तपासादरम्यान, उषा गांगुर्डे यांनी खरे दागिने चोरून त्याऐवजी तेच बनावट दागिने कपाटात ठेवल्याचं उघड झालं.

त्यामुळे पुष्कर श्रोत्री यांनी २६ ऑक्टोबर रोजी विलेपार्ले पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहितेच्या कलम ३४, ३८१, ४०६ आणि ४२० अंतर्गत उषा आणि तिच्या पतीविरुद्ध गुन्हा दाखल केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs NZ: Virat Kohli त्याचे सामनावीर ट्रॉफी कुठे ठेवतो? न्यूझीलंडविरुद्ध पुरस्कार जिंकल्यानंतर सांगून टाकलं

WPL 2026, DC vs GG: १ बॉल अन् ५ धावा... गुजरात जायंट्सने मिळवला थरारक विजय, जेमिमाच्या दिल्लीचा सलग दुसरा पराभव

२०१४पासून अदानीकरण! हे बघून भीती वाटली नाही तर निवडणूक न लढलेली बरी; राज ठाकरेंनी दाखवले VIDEO

Bigg Boss Marathi 6: ९० दिवस, १७ स्पर्धक; पाहा 'बिग बॉस मराठी ६' च्या घरातील स्पर्धकांची यादी

अजित पवारांना लाथ मारून हाकला किंवा माफी मागा, गाडीभर पुरावे कोर्टात द्या; भ्रष्टाचारावरून ठाकरे बंधूंनी फडणवीसांना घेरलं

SCROLL FOR NEXT