Shantanu Moghe, Shantanu Moghe news, Shantanu Moghe family, safarchand natak, priya marathe SAKAL
मनोरंजन

Shantanu Moghe: 'शो मस्ट गो ऑन'! पाय फ्रॅक्चर तरीही शंतनूने प्रयोग थांबवला नाही... बायकोने केला खुलासा

शंतनू मोघे विषयी एक कलाकार म्हणून नक्कीच तुम्हाला त्याचा अभिमान वाटेल

Devendra Jadhav

Shantanu Moghe - Priya Marathe News: संभाजी मालिकेत छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका अजरामर करून रसिकांच्या मनात स्वतःचं स्थान निर्माण केलेला अभिनेता म्हणजे शंतनू मोघे.

शंतनू मोघे विषयी एक खास बातमी समोर आलीय जी वाचून कलाकार म्हणून नक्कीच तुम्हाला त्याचा अभिमान वाटेल. शंतनूची बायको प्रिया मराठेने सोशल मीडियावर या खास गोष्टीचा खुलासा केलाय.

(marathi actor Shantanu Moghe safarchand play continued while leg fractured wife priya marathe revealed incident)

झालंय असं कि.. सफरचंद नाटकाचा प्रयोग नुकताच बोरिवलीमध्ये पार पडला. या प्रयोगाआधी एका महानाट्याच्या रिहर्सल दरम्यान शंतनूच्या पायाला गंभीर दुखापत झाली.

डॉक्टरांनी हेयरलाईन फ्रॅक्चर झाल्याचं सांगितलं. त्याच अवस्थेत शंतनूने महानाट्याचे प्रयोग केले. हे प्रयोग झाल्यावर शंतनू मुंबईत आला. मुंबईत त्याच्या सफरचंद नाटकाचे प्रयोग होते.

शंतनूच्या पायाला दुखापत झाली होती. ऐन वेळी प्रयोग रद्द झाला असता तर नुकसान होणं हे निश्चित होतं. याही परिस्थितीत शंतनूने नाटकाचा प्रयोग करण्याचा निर्णय घेतला.

प्रयोग सुरु होण्यापूर्वी नाटकाचे निर्माते आणि सूत्रधार यांनी प्रेक्षकांना या गोष्टीची कल्पना दिली. शंतनू वॉकर घेऊन प्रयोग करेल असं सांगण्यात आलं.

प्रेक्षकांनी या निर्णयाचं स्वागत केलं. दिग्दर्शकांनी शंतनुच्या केवळ दोन मुव्हमेंट्समध्ये बदल केले आणि ठरलेला प्रयोग व्यवस्थित पार पडला.

नाटक झाल्यावर जेव्हा कर्टन कॉलला सर्व कलाकारांची ओळख झाली तेव्हा शंतनूची स्टेजवर एंट्री होताच उपस्थित प्रेक्षकांनी उभं राहून शंतनूला दाद दिली आणि टाळ्यांचा कडकडाट केला.

शंतनू सुद्धा नाटकवेड्या प्रेक्षकांचं प्रेम बघून भारावून गेला.

या सर्व घटनेविषयी शंतनूची बायको आणि अभिनेत्री प्रिया मराठेने तिच्या भावना व्यक्त केल्यात. प्रिया म्हणाली..

Real hero! Hatts off वगैरे अलंकार फार छोटे वाटत आहेत.. हे तूच करू जाणे.. तुला आणि तुझ्यातल्या कलाकाराला सलाम! ज्यांना कल्पना नाही त्यांना सांगू इच्छिते..

पाय fracture झालेला असताना, वॉकर घेऊन, ठरलेला प्रयोग अतिशय उत्तम प्रकारे करून शांतनू नी खरंच अभूतपूर्व उदाहरण आपल्या समोर ठेवलं आहे..कमाल! आता तुला हाडाचा कलाकार म्हणता येईल..

अशाप्रकारे शंतनू मोघेवर कौतुकाचा वर्षाव होतोय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

8th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! 8व्या वेतन आयोगाबाबत मोठी अपडेट; खात्यात येणार लाखो रुपये?

Caste Validity Certificate Online : जातवैधता प्रमाणपत्र मिळणार ऑनलाईन; अर्जापासून सुनावणीपर्यंत सर्व प्रक्रिया होणार डिजिटल

'आमच्या काळजाचा तुकडा झाली' मृणाल कुलकर्णींचं सुनेवर आहे जीवापाड प्रेम, म्हणाल्या...'कितीही थकून घरी आली तर ती...'

Latest Marathi News Live Update : पुण्यात ‘कमिशनर हटवा, पुणे वाचवा’चे फ्लेक्स

Shaktipeeth Highway Farmers Protest : 'मरायच्या आधी कार्य घालायला आलाय का?'; शक्तिपीठ महामार्गाच्या मोजणीला शेतकऱ्यांचा कडाडून विरोध, पोलिस बंदोबस्तातही मोजणी रोखली

SCROLL FOR NEXT