Megha Ghadge on Gautami Patil  Esakal
मनोरंजन

Megha Ghadge: "सर्व मर्यादा ओलांडल्या", मेघा घाडगे पुन्हा गौतमीवर बरसल्या

Vaishali Patil

Megha Ghadge on Gautami Patil: सबसे कातील गौतमी पाटील अशी ओळख असलेल्या गौतमीही गेल्या काही दिवसांपासून वेगवेगळ्या कारणांमुळं चर्चेत असते. अश्लील हावभाव केल्यानं ती चर्चेत आली. तिचे हे व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाले. त्यानंतर प्रकरण तापलं आणि लावणी कलावंतासह राजकारणातूनही तिच्यावर जोरदार टीका करण्यात आली. त्यातच लावणी कलाकार अभिनेत्री मेघा घाडगे यांनीही तिच्यावर सडकून टिका केली होती. त्यांनी फेसबुक पोस्टद्वारे तिच्यावर टिका केली.

आता पुन्हा मेघा घाडगे यांनी गौतमीवर निशाणा साधला. सध्या त्या “अहो पाव्हनं …” या नव्या लावणीचा म्युझिक व्हिडीओमुळे चर्चेत आहे. त्यांच्या या नव्या लावणीचा म्युझिक व्हिडीओ प्रदर्शित झाला. यानिमित्त बोलतांना त्यांनी गौतमीवर पुन्हा टिका केली.

“सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. सरकारने लावणीचे सेन्सॉर बंद केल्याने हे सर्व घडत आहे. लावणी सेन्सॉर झाल्यास हा प्रकार बंद होईल. पण ते होत नाही. गेल्या पाच-सहा वर्षांपासून लावणीचे सेन्सॉर बंद आहे. ते पुन्हा सुरू करण्यात यावं यासाठी आम्ही परत सुरु करण्यासाठी मागे लागलो आहेत.. सेन्सॉर नसल्याने असले आयटम साँग खुलेआम सुरू झाले आहेत. ते का सुरू होते तेच कळत नाही."

"आयटम साँग, घागरा चोली परिधान करत नाचणे असे अनेक प्रकार मुंबईत सुरू झाले. पुण्याच्या त्या भागातही हे प्रकार बेधडक आणि सर्रास घडत आहेत. ते थांबवणं कठीण आहे. लोक जे चित्रपटात पाहत आहेत तेच ते आता समोर दिसतं आहेत. या सर्व गोष्टी एका तिकिटावर त्यांना बघायला मिळतात. बार डान्सबार बंद झाले, त्यामुळे या गोष्टी खुलेआम सुरू झाल्या आहेत. बालगंधर्व म्हणजे बोलण्याची अवस्थाच नाही."

गौतमीचं नावं न घेता त्यांनी तिच्यावर टिका करत त्या म्हणाल्या, "सध्या चार दिवसांची चांदनी आहे. लोकांना डीजे लावून नाचायला, दारू पिऊन मजा करायला लावलं जातं . लहान मुले-मुली समोर असतात, त्यांच्यासमोर अश्लील नृत्य केली जातात. त्यांना त्यांच्या पिढीचीही अजिबात पर्वा नाही".

पुढे त्या म्हणाल्या, "या गोष्टींचा परिणाम पुढच्या पिढीवर होणार आहे. हे वेळीच थांबवायला हवं, याचा नंतर पश्चाताप होईल. मुलींना आथा थेट येतेस का असे विचारले जाते. मुली तोंडातून पैसे घेतात असे अनेक प्रकार घडत आहे. जे सरकार चालवतात किंवा जे काही गट आहेत ते याबद्दल खूप बोलतात. यावर बंदी घालण्यात येणार असल्याचेही बोललं जातं मात्र असं काहीही घडत नाही, असे मेघा घाडगे म्हणाल्या."

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahavitaran PRO Suspended : कोल्हापूर महावितरणचे जनसंपर्क अधिकारी तडकाफडकी निलंबीत, स्मार्ट मिटर कॅमेरा प्रकरण भोवलं; प्रशासकीय विभागात खळबळ

रोहित शर्माचा BCCI च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चेचा प्रयत्न अन्...! आगरकरच्या अल्टिमेटमनंतर हालचाल; लॉर्ड्सवर नेमकं काय होणार?

Latest Marathi News Live Update : अर्नाळाच्या समुद्रात बुडालेल्या २ मुलांपैकी एकाचा २४ तासानंतर मृतदेह मिळाला; आणखी एकाचा शोध सुरु

Apple Discount Offer : फ्रीमध्ये मिळतायत AirPods Pro अन् Apple Pencil; 'या' ग्राहकांसाठी ॲपलची स्पेशल ऑफर

Karnataka Covid Cases : महाराष्ट्राशेजारील कर्नाटकात कोरोना रुग्णांमध्ये 10 दिवसात मोठी वाढ; नव्या रुग्णांची नोंद झाल्याने वाढली चिंता, नेमकी काय आहे स्थिती?

SCROLL FOR NEXT