zee natya gaurav award 2023, vandana gupte, vandana gupte news SAKAL
मनोरंजन

Vandana Gupte: नाट्यगौरव पुरस्कारात वंदना गुप्ते यांना 'जीवनगौरव' देताना पहिल्यांदाच घडली 'ही' गोष्ट

झी नाट्यगौरव २०२३ च्या 'जीवनगौरव पुरस्काराच्या' मानकरी ठरल्या 'वंदना गुप्ते'

Devendra Jadhav

Vandana Gupte News: यंदाच्या ‘झी नाट्य गौरव पुरस्कार सोहळा २०२३’ पुरस्कार सोहळा खुप खास असणार आहे. या सोहळ्यामध्ये मराठी नाट्यसृष्टीतील नामवंत कलावंत करणार रसिकांचं मनोरंजन करणार आहेत.

यंदाच्या झी नाट्य गौरव पुरस्कार सोहळ्यात जीवनगौरव पुरस्कार कोणाला मिळणार याकडे सर्वांचं लक्ष होतं. अखेर त्याचा उलगडा झालाय.

मराठी नाट्यसृष्टीतील अभिनेत्री वंदना गुप्ते यांना यंदाचा झी नाट्य गौरव जीवनगौरव पुरस्कार मिळालाय.

(marathi actress vandana gupte got zee natya gaurav lafetime achivement award)

हेही वाचा: सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत

२५ डिसेंबर १९७० रोजी, वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी, द गोवा हिंदू असोसिएशनच्या, मंगला संझगिरी दिग्दर्शित ‘पद्मश्री धुंडीराज’ ह्या नाटकातून वंदना गुप्ते पहिल्यांदा रंगमंचावर दाखल झाल्या. तिथपासून ते ‘.. आणि वंदना गुप्ते’, ह्यांचा इथपर्यंतचा प्रवास खूप कष्टांचा होता.

झी नाट्य गौरव जीवनगौरव पुरस्कार निमीत्ताने मराठी रंगभूमीवरच्या सर्वात तरुण अभिनेत्रीला जीवनगौरव पुरस्कार मिळण्याची ही कदाचित पहिलीच वेळ असेल.pha

तसेच या सोहोळ्यात प्रेक्षकांना मराठी नाट्यसृष्टीत आघाडीचा नट शैलेंद्र दातार, उमेश जगताप आणि सुबोध भावे ‘अश्रूंची झाली फुले' ह्या नाटकातील प्रवेश सादर करणार आहे

तसेच तब्बल २५ वर्षानंतर संतोष पवार 'यदा कदाचित' ह्या नाटकाचा प्रवेश कमलाकर सातपुते, आशिष पवार, शलाका पवार आणि संजय खापरे सारखे कलाकार साकारणार आहेत,

याशिवाय विनोदाचा हुकमी एक्का आणि गेली २५ वर्ष रंगभूमीवर धुमाकूळ घालत असलेले नाटक "सही रे सही" नाटकाचा प्रवेश भरत जाधव सादर करणार आहे.

‘चारचौघी’ या गाजत असलेल्या हाऊसफुल्ल नाटकांमधील नाट्यप्रवेश संवेदनशील अभिनेत्री मुक्ता बर्वे साकारणार असून ह्या नाट्यप्रवेशाच्या माध्यमातून मुक्ता बर्वे ह्या वंदना गुप्ते यांना मानवंदना देणार आहे.

सोबत प्रशांत दामले आणि कविता मेढेकर यांच्या ‘मन्या आणि मनीची’ धमाल अनुभवता येणार आहे. यंदाच्या झी नाट्यगौरव पुरस्कार सोहळ्याचे लेखन संकर्षण कऱ्हाडे केलंय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पोलिस भरतीचे वेळापत्रक ठरलं! राज्यात १५,६३१ पोलिसांची भरती; वयोमर्यादा संपलेल्या ‘या’ उमेदवारांना एक संधी; अर्जासाठी ४५० ते ३५० रुपये शुल्क

Donald Trump: ट्रम्प यांच्या शपथविधीपूर्वीचे अपशकुन अन् दुर्याेधनाच्या जन्माची वेळ; भारतावरचं सर्वात मोठं संकट?

Rain-Maharashtra Latest Live News Update: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकातील उड्डाणपूलाचे उद्घाटन चर्चेत

CM Devendra Fadnavis : डेटा, एआय व क्वांटम कॉम्प्युटिंगमुळे उत्तम मनुष्यबळ निर्माण होणार

Selu News : पुरात वाहून गेलेल्या एकाचा मृतदेह सापडला; दुसऱ्याचा शोध सुरू

SCROLL FOR NEXT