Rainbow marathi movie
Rainbow marathi movie  esakal
मनोरंजन

Rainbow : क्रांती रेडकरचं दिग्दर्शन, सोनाली- उर्मिलाची भूमिका! थेट लंडनमध्ये शुटींग

युगंधर ताजणे

Marathi Movie News: काही महिन्यांपूर्वी 'प्लॅनेट मराठी' आणि ‘हाय आयक्यू’ यांच्या सहयोगाने 'मँगोरेंज प्रॉडक्शन’ निर्मित 'रेनबो' या चित्रपटाची घोषणा करण्यात आली होती. नुकतेच या चित्रपटाचे लंडनमध्ये चित्रीकरण सुरु झाले (Entertainment News) असून लवकरच हा चित्रपट रंगांची उधळण घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येईल. या चित्रपटात शरद केळकर, सोनाली कुलकर्णी, उर्मिला कोठारे आणि ऋषी सक्सेना यांच्या प्रमुख भूमिका आहते. 'रेनबो' म्हणजे अनेक रंगांचे प्रतीक आणि त्यामुळेच या चित्रपटात देखील आपल्याला विविध रंग (Social media news) पाहायला मिळणार आहेत. आजच्या काळात नात्यांमध्ये येणाऱ्या विविध रंगांचा प्रवास यात पाहायला मिळणार आहे. मराठी चित्रपटसृष्टीतील (Marathi Movie) नावाजलेल्या कलाकारांचा मिळून हा 'रेनबो' तयार होत असल्याने हे सर्व रंग एकत्र पाहण्यासाठी प्रेक्षक देखील उत्सुक आहेत.

दिग्दर्शिका क्रांती रेडकर म्हणते, " 'रेनबो' हे नावच कलरफुल आहे. या नावातच (Marathi Actress) सारे रंग भरलेले आहेत. नात्यातील हाच सप्तरंगी प्रवास या चित्रपटाच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. या चित्रपटाच्यानिमित्ताने अक्षय बर्दापूरकर यांच्या 'प्लॅनेट मराठी' चा भाग होण्याची संधी मला मिळाली. इतक्या दिवसांची प्रतीक्षा अखेर संपली असून आता चित्रीकरणाचा श्रीगणेशा झाला आहे.''

या चित्रपटाविषयी ‘प्लॅनेट मराठी ओटीटी’चे प्रमुख, संस्थापक अक्षय बर्दापूरकर म्हणतात, "क्रांती रेडकर ही अतिशय उत्तम अभिनेत्री तर आहेच याशिवाय तिचे दिग्दर्शन देखील कमाल आहे. 'रेनबो' हा असा चित्रपट आहे, जो नात्यातील काही संवेदनशील गोष्टी समोर आणणार आहे. या चित्रपटाची कथा मनाला भावणारी आहे. लवकरच हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येईल.''

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Inheritance Tax: "निझामाच्या काळातही हे झालं नाही, आता लोकशाही..."; खर्गेंचं 'वारसा कर'च्या आरोपांना उत्तर

Latest Marathi News Live Update : मुसळधार पावसामुळे आठ ते दहा घरांचे नुकसान

Loksabha election 2024 : ''जेव्हा माझी पंतप्रधान पदासाठी घोषणा झाली तेव्हा मी रायगडावर आलो अन्...'' मोदींनी साताऱ्यात सांगितली आठवण

Revanth Reddy: शहांचा 'तो' व्हिडिओ शेअर करणं भोवलं! तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना चौकशीसाठी दिल्लीला बोलावलं

IPL 2024, KKR vs DC Live Score: ऋषभ पंतने जिंकला टॉस! पृथ्वी शॉ-स्टार्कचं पुनरागमन, जाणून घ्या दोन्ही संघांची प्लेइंग-11

SCROLL FOR NEXT