Aai Kuthe Kay Karte, Aai Kuthe Kay Karte episode update, Aai Kuthe Kay Karte todays episode SAKAL
मनोरंजन

Aai Kuthe Kay Karte: अनिरुद्ध वीणाला केक भरवायला गेला पण वीणाने असं सुनावलं की तोंडावर पडला

आई कुठे काय करते मालिकेच्या आजच्या भागात अनिरुद्ध हा वीणाला केक भरवणार असतो

Devendra Jadhav

Aai Kuthe Kay Karte Serial Updates:आई कुठे काय करते मालिकेच्या आजच्या भागात अनिरुद्ध हा वीणाला केक भरवणार असतो. तो तिला वेलकम होम असं म्हणतो.

अनिरुद्धच्या या कृतीने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसतो. अनिरुद्ध वीणाला केलं भरवणार की काय याकडे सर्वांचं लक्ष असतं. वीणा सुद्धा अनिरुद्धकडे आश्चर्याने पाहत राहते.

(marathi serial aai kuthe kay karte today 16 may episode update)

पुढे वीणा अनिरुद्धच्या हातून केक घेते आणि म्हणते. आजचा दिवस फक्त ईशा आणि अनिशचा आहे. त्यामुळे जिथे जे गरजेचं असेल ना तेच करावं माणसाने. असं म्हणत ती अनिरुद्धचा चांगलाच समाचार घेते.

वीणाने अनिरुद्धला दिलेलं हे उत्तर ऐकून आशुतोषला हसू आवरत नाही. अनिरुद्धचा मात्र यामुळे मोठा अपेक्षाभंग होतो. पण तो सुद्धा हसत वेळ मारून नेतो.

पुढे आशुतोष आणि वीणा बाहेर एकमेकांशी गप्पा मारत उभे असतात. अनिरुद्ध मला बिझनेस पार्टनर म्हणून आवडला.

त्याने आजवर कधीही त्याच्या पर्सनल लाइफचा माझ्याजवळ उल्लेख केला नाहीये, असं वीणा आशुतोषला म्हणते. आशुतोष काहीसा साशंक असतो.

इतक्यात अनिरुद्ध तिथे येतो. अनिरुद्धच तिथे येणं वीणाला अजिबात आवडत नाही. ती अनिरुद्धला आशुतोष समोर सुनावते. नंतर ती शांत होतो.

ईशा आणि अनिशचा साखरपुडा होतो. सगळे आपापल्या घरी येतात. वीणा सुद्धा आशुतोषच्या घरी येते. तेव्हा जुन्या आठवणींनी ती भावूक होते. लहानपणी माझ्या आईबाबांचा अपघात झाला.

माझ्याजवळ सगळं होतं, छान कपडे, मित्रमैत्रिणी तरीही हे सगळं माझ्याच नशिबात का? असं म्हणत विणाच्या डोळ्यात पाणी येतं.

सुलेखाताई तिला समजावतात आणि स्वतःला दोष देऊ नको म्हणून सांगतात. त्या वीणाल घरी राहायचा आग्रह करतात. पण वीणा काही नक्की नाही म्हणून सांगते. पण शेवटी ती आशुतोष आणि सुलेखाताईंचं ऐकते.

पुढे वीणा अरुंधतीला तिच्या भूतकाळाबद्दल विचारत. तू २५ वर्ष अनिरुद्ध सोबत संसार केलास. तुला 3 मुलं आहेत तरीही तू आशुतोष सोबत दुसरं लग्न केलंस.

मला तुझी लव्हस्टोरी ऐकायची आहे? याविषयावर नंतर बोलू असं म्हणत अरुंधती तिथून निघून जाते.

आता वीणा अन् अनिरुद्धची बिझनेस पार्टनरशिप पुढे कोणतं वळण घेणार याचा उलगडा आई कुठे काय करते मालिकेच्या नवीन भागात होईल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT