Anuradha Poster
Anuradha Poster 
मनोरंजन

भर चौकात अनुराधाचं 'तसलं' पोस्टर, महिला आयोगाचा आक्षेप

सकाळ डिजिटल टीम

सोशल मीडियावर (social media) गेल्या काही दिवसांपासून एका मालिकेच्या प्रमोशनसाठी वेगवेगळ्या प्रकारचे फंडे वापरले जात होते. त्यामध्ये ज्या अभिनेत्रींनी त्या मालिकेमध्ये काम केले आहे त्यांनी सोशल मीडियावरुन लिपस्टिक बॅन (Lipstick ban) असं एक अभियान सुरु केलं होतं. सुरुवातीला प्रेक्षकांना ही गोष्ट काही समजलीच नाही. दरवेळी एक अभिनेत्री होय मी लिपस्टिक बॅन करते आहे. अशा प्रकारचा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट (video viral on social media) करत असल्याचे दिसून आले होते. अखेर तो काही सामाजिक उपक्रम नसून एका सीरिजसाठी केलेलं प्रमोशन असल्याची बातमी समोर आली. मात्र अजूनही त्या सीरिजविषयीची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये निर्माण व्हावी यासाठी वेगवेगळ्या प्रकारचं कॅम्पेनिंग करण्यात येत आहे.

अनुराधा (Anuradha Web serise) या वेबसीरीजचे मोठमोठे पोस्टर वेगवेगळ्या शहरांमध्ये लावण्यात आले आहेत. पुण्यातही या मालिकेच्या पोस्टरनं चाहत्यांचे लक्ष वेधून घेतलं आहे. मात्र भलत्याच बोल्ड स्वरुपात असणाऱ्या या पोस्टरनं महिला आयोगाची नाराजी ओढावून घेतली आहे. त्यांनी या पोस्टरवर आक्षेप घेत ते तातडीनं हटविण्याचे आदेश दिले आहे. गेल्या काही दिवसापासून या वेब सिरीजचे पोस्टर पुण्याचा रस्त्यावर लावण्यात आले होते .. या पोस्टर मध्ये अभिनेत्रीच्या हातामध्ये सिगारेट (cigarate) दाखवण्यात आली होती .... या बाबत राज्य महिला आयोगानं या पोस्टरवर आक्षेप घेतला आहे. त्यानंतर अनुराधा वेब सिरीजच्या निर्मात्यांनी हे पोस्टर काढून टाकले आहेत.

अनुराधा या मालिकेमध्ये तेजस्विनी पंडित(Tejaswini Pandit) आणि सोनाली खरे(Sonali Khare) या दोन अभिनेत्रींनी यापूर्वी सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट केला होता. ज्याचं कॅप्शन होतं 'बॅन लिपस्टिक. ज्या व्हिडीओत ''आम्ही लिपस्टिकचं समर्थन करीत नाही,बॅन लिपस्टिक'' असं म्हटलं होतं. तेजस्विनीनं ''बॅन लिपस्टिक हे प्रमोशन आम्ही आमच्या नवीन येणा-या वेब शो साठी करतोय. या वेब शो मध्ये मी आणि सोनाली खरे काम करतोय. तर या वेब शो चं दिग्दर्शन संजय जाधव करीत आहेत. यामध्ये 'लिपस्टिक' ही व्यक्तिरेखा महत्त्वाची आहे. 'प्लॅनेट मराठी' या मराठी ओटीटी प्लॅटफॉर्मवर हा वेब शो प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे असंही तिनं नमूद केलं होतं.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar : सत्ता नसतानाही विकास करता येतो

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 9 मे 2024

Loksabha Election 2024 : मतदानासाठी परदेशातील पुणेकर शहरात दाखल

Loksabha Election 2024 : बारामतीत वाढलेली लाखभर मते ठरविणार खासदार ; एकूण ५९.५० टक्के मतदान,पुरुषांचा टक्का वाढला, महिलांचा प्रतिसाद कमी

Latest Marathi News Live Update : महिला अपहरणप्रकरणी रेवण्णा यांना सात दिवसांची न्यायालयीन कोठडी

SCROLL FOR NEXT