Masoom Sawaal movie poster stirs controversy for depicting Lord Krishna on a sanitary pad Google
मनोरंजन

पोस्टरवर सॅनिटरी पॅड,त्यावर छापला देवाचा फोटो; दिग्दर्शक म्हणतोय,'उगाचच...'

५ ऑगस्टला 'मासूम सवाल' हा सिनेमा रिलीज होतोय,पण त्याआधीच या सिनेमाच्या पोस्टरमुळे मोठा वाद निर्माण झाला आहे

प्रणाली मोरे

५ ऑगस्टला मासूम सवाल(Masoom Sawal) हा सिनेमा रिलीज होतोय,पण त्याआधीच या सिनेमाच्या पोस्टरमुळे(Poster) मोठा वाद (Controversy)निर्माण झाला आहे,अन् सिनेमाच्या प्रदर्शनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सिनेमाचे जे पोस्टर आहे त्यावर सॅनिटरी पॅड आहे आणि त्यावरच भगवान कृष्णाचा फोटो दाखवला गेला आहे. आता यामुळे निर्माण झालेल्या वादावर सिनेमाचा दिग्दर्शक संतोष उपाध्याय आणि अभिनेत्री एकावली खन्नानं प्रतिक्रिया दिली आहे.(Masoom Sawaal movie poster stirs controversy for depicting Lord Krishna on a sanitary pad)

एका न्यूज पोर्टलला दिलेल्या मुलाखतीत अभिनेत्री एकावली खन्ना म्हणाली आहे की, ''मला पहिल्यांदा या पोस्टरवरुन निर्माण झालेल्या वादाविषयी काहीच माहित नव्हतं. याप्रकरणात मी इतकंच बोलू शकते की आमच्या मेकर्सना कोणाच्या भावना दुखवायच्या नव्हत्या. आमचा फक्त समाजात लोकांचा याविषयी असलेला चुकीचा दृष्टिकोन बदलण्याचा विचार होता. आजच्या काळात अंधश्रद्धेला काहीच जागा नाही. महिलांवर ज्या काही पुर्वपारंपार चालत आलेल्या चुकीच्या प्रथा आहेत त्यांना थांबवता यावं यासाठीचा हा प्रयत्न आहे''.

तर याच सिनेमाच्या दिग्दर्शकाचं म्हणणं आहे की,''गोष्टींकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन चुकीचा आहे, आणि त्यामुळे गैरसमज निर्माण होतात. सिनेमाचं कथानक हे संपूर्णपणे मासिकधर्म याभोवती फिरतं. आणि त्यामुळेच पोस्टरवर सॅनिटरी पॅड दाखवणं गरजेचं होतं. पोस्टरवर पॅड आहे पण भगवान कृष्णाचा फोटो पॅडवर नाही आहेत. पण उगाचच चुकीचा गैरसमज घेऊन निर्माण केलेल्या वादाने आमच्या सिनेमाला पाठिंबा मिळताना दिसत नाही.''

सिनेमाचा ट्रेलर १८ जुलै रोज रिलीज झाला होता. यामध्ये दाखवलं गेलं होतं की एक छोटी मुलगी अगदी लहानपणापासून कृष्णाच्या मूर्तीला आपल्या कायम जवळ ठेवत असते. कृष्णाला ती भाऊ मानत असते. थोडं मोठं झाल्यावर जेव्हा तिला मासिक पाळी येऊ लागले तेव्हा तिच्यापासून त्या कृष्णाच्या मूर्तीला दूर केलं जातं. तिला म्हटलं जातं की,४ ते ५ दिवस जेव्हा तिला पाळी येईल तेव्हा ती कृष्णापासून लांब राहिल,कारण ते अशुद्ध असतं. हे ऐकून ती मुलगी मात्र हैराण होते,आणि याविरोधात ती कोर्टात पोहोचते. आणि मग यावर खटला सुरु होतो. पाळी आली की स्त्री अशुद्ध कशी? तिचा हा एक प्रश्न समाजात मोठा गोंधळ निर्माण करतो. कोणी तिला पाठिंबा देत तिच्या पाठीशी उभं राहतं तर कुणी तिच्या विरोधात जातं. सिनेमाची संपूर्ण कथा यावर बेतलेली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather Alert : कुठे पाऊस तर कुठे उष्णतेची लाट ! हवामान खात्याचा मोठा इशारा, जाणून घ्या राज्यात आज कसे असेल हवामान?

Krishna Sugar Factory: कृष्णा कारखान्यासाठी आजपासुन धुमशान; उमेदवारी अर्ज आजपासुन २२ मे पर्यंत दाखल करता येणार, भोसले विरुद्ध मोहिते पुन्हा संघर्ष..

Satara Politics: सातारा पालिकेतील वादावर शिवेंद्रसिंहराजेंचा दणका; उदयनराजेंनंतर शिवेंद्रसिंहराजेंचीही बैठक, 'निवडून आणलं, पाडूही शकतो'..

मोठी बातमी! ग्रामीणमधील नववी-दहावीच्या 20 विद्यार्थ्यांसाठी 3 शिक्षक; शहरांमधील 300 शाळांना लावावे लागणार कुलूप; प्रत्येक वर्गात 20 पटसंख्येची अट

Panchang 18 May 2026 : पंचांग! शुभ मुहूर्त, राहुकाळ, चंद्रदर्शन आणि सर्वार्थसिद्धी योग माहिती

SCROLL FOR NEXT