Mika Singh  esakal
मनोरंजन

Mika Di Vohti Video: मिकाला पाहिलं तिचं भान सुटलं! सगळ्यासमोर तिनं...

बॉलीवूडमध्ये आपल्या हटकेपणासाठी ओळखला जाणारा सेलिब्रेटी गायक मिका सिंग सध्या चर्चेत आहे.

युगंधर ताजणे

Entertainment News: बॉलीवूडमध्ये आपल्या हटकेपणासाठी ओळखला जाणारा सेलिब्रेटी गायक मिका सिंग सध्या चर्चेत आहे. त्याचे कारण मिका दी वोटी हा (Bollywood News) कार्यक्रम. मिकाला लग्न करायचे आहे. त्यामुळे तो एका मुलीच्या शोधात आहे. आपल्याला पसंत होणारी मुलीची निवड स्वयंवरातून करायचं असं त्यानं ठरवलं आहे. त्यामुळे त्यानं त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून (Bollywood celebrity) नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. गेल्या काही दिवसांपासून मिकाचा हा शो भलताच चर्चेत आला आहे. त्याचं झालं असं की, मिकाचा एक व्हिडिओ नेटकऱ्यांच्या चर्चेचा विषय ठरल्याचे दिसून आले आहे.

मिका आणि त्या मुलीचा व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. मिका दी (Social Media Viral News) वोटी नावाचा शो अजुन सुरु झालेला नाही. तो येणार आहे. मात्र त्याचे प्रमोशन जोरदारपणे सुरु आहे. वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर त्याचे (OTT News) प्रमोशन होत आहे. मिकाशी लग्न करण्यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून मुली येत आहे. त्यातीलच एक व्हिडिओ समोर आला आहे. एका मुलीनं मिका सिंगला पाहताच ती एवढी एक्सायटेड होती की, तिनं त्याला सगळ्यांसमोर किस केलं. मिकानं तिला अनेकदा सांगुनही ती काही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हती.

19 जुनपासून मिका दी वोटी नावाचा कार्यक्रम सुरु होणार आहे. या कार्यक्रमाची गेल्या काही दिवसांपासून चर्चा होती. त्या मुलीच्या इंट्रीनं मात्र नेटकऱ्यांना प्रतिक्रिया देण्यास भाग पाडले आहे. तिनं मिकाला सुरुवातीला फ्लाईंग किस करत ग्रीट केलं. मिकाला तेव्हाच तिच्या उत्साहीपणाचा अंदाज आल्यानं त्यानं तिला सावध करण्याचा प्रयत्न केला. तिला शांत राहण्यास सांगितलं. मात्र त्या मुलीनं पुढे येत त्याला किस केलं. आणि त्याच्याप्रती आपल्या प्रेमाची कबुलीही देऊन टाकली.

यापूर्वी देखील मिकाचा अशाच प्रकारचा एक व्हिडिओ समोर आला होता. त्यामध्ये त्या मुलीनं मिकाला काही करुन आपल्याशीच लग्न कर असा हट्ट धरला होता. मिकानं मोठ्या प्रयत्नानं त्या मुलीला विनंती करुन आपला बचाव करुन घेतला होता. काही दिवसांपूर्वी मिकाला सिद्धु मुसेवाला प्रकरणातील आरोपींनी धमकी दिल्याची बातमीही सोशल मीडियावर व्हायरल झाली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai-Goa Highway : ठेकेदार कंपनीचा १८ कोटींचा दंड थकीत विनापरवानगी नदीत खोदाई; एकाचा बळी गेल्यानंतर कारवाईला वेग

Indrayani River Pollution : ‘इंद्रायणी’वर पुन्हा एकदा विषारी फेसाची चादर ; प्रशासकीय निष्क्रियतेमुळे लाखो वारकऱ्यांच्या श्रद्धेचा, आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर

अळीवाचे लाडू कधी खाल्लेत का? पाहा ही झटपट रेसिपी; Aliv Ladoo Recipe

Marathi News Live Updates : पक्ष फोडणाऱ्या टोळीचे प्रमुख ज्ञानेश कुमार , त्यांना तातडीने तुरुंगात टाका: उद्धव ठाकरे घणाघात

Bijwadi Rain Shortage : उत्तर माणमधील बिजवडी अजूनही पावसाच्या प्रतीक्षेत; खरीपानंतर रब्बी हंगामही धोक्यात

SCROLL FOR NEXT