Mika Singh Birthday celebration  esakal
मनोरंजन

Mika Singh: 'बर्थ डे पार्टी नको रे बाबा!' मिकानं सांगितलं कारण...

बॉलीवूडमधील प्रसिद्ध गायक मिका सिंग हा गेल्या दिवसांपासून सोशल मीडियावर ट्रेंडिंगचा विषय आहे.

युगंधर ताजणे

Mika Singh Birthday: बॉलीवूडमधील प्रसिद्ध गायक मिका सिंग हा गेल्या दिवसांपासून सोशल मीडियावर ट्रेंडिंगचा विषय आहे. प्रख्य़ात पंजाबी गायक सिद्धु मुसेवाला याची हत्या झाल्यानंतर त्यावर सातत्यानं सोशल मीडियातून प्रतिक्रिया (Bollywood Singer Mika Singh) देणारा सेलिब्रेटी म्हणून मिका सिंगचे नाव घेता येईल. आज त्याचा जन्मदिवस आहे. दरवर्षी मिका सिंग हा त्याच्या बर्थ डे निमित्तानं मोठ्या पार्टीचे आयोजन करत असतो. मात्र यंदा त्यानं ही पार्टी (Bollywood News) आयोजित करण्यासाठी नकार दिला आहे. बॉलीवूडमधील वेगवेगळे सेलिब्रेटी मिकाच्या पार्टीसाठी हजेरी लावत असताता. यावेळी त्यानं पार्टी आयोजित करण्यासच नकार दिल्यानं त्याच्या चाहत्यांनी त्याला याविषयी विचारणाही केली आहे.

काही दिवसांपासून मिका हा त्याच्या लग्नावरुनही चर्चेत आहे. त्यानं लग्नासाठी (entertainment news) एका स्वयंवराचे आयोजनही केले होते. त्यालाही सोशल मीडियातून चांगलीच प्रसिद्धी मिळाली होती. आज मिकाचा 45 वा वाढदिवस आहे. 10 जुन 1977 मध्ये जन्म झालेल्या मिकानं अल्पावधीत बॉलीवूडमध्ये मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी मिळवल्याचे दिसून आले. तो आता मिका दी वोटी या (Bollywood celebrity) कार्यक्रमाच्या माध्यमतातून प्रेक्षकासमोर येणार आहे. सोशल मीडियावर त्याच्या या नव्या कार्यक्रमाची चर्चा आहे. बऱ्याच दिवसांपासून तो हा शो होस्ट करणार असल्याच्या बातम्या व्हायरल झाल्या होत्या. यावेळी मिकानं आपला जन्मदिवस साधेपणानं साजरा करणार असल्याचे सांगितले आहे. दरवर्षी मोठ्या जल्लोषात साजरा होणारा त्याचा जन्मदिवस एका कारणामुळे जास्त गाजावाजा न होता साजरा होईल.

मिकानं बॉलीवूडमधील दिवंगत गायक केके आणि पंजाबी गायक सिद्धु मुसेवाला यांना आदरांजली वाहिली आहे. त्यांच्यासाठी त्यानं यावेळी जन्मदिवस साधेपणानं साजरा करणार असल्याचे सांगितले आहे. या दोन्ही गायकांना श्रद्धांजली वाहत बर्थ डे सेलिब्रेशन साधेपणानं साजरं होईल. सध्या बॉलीवूडच्या संगीत क्षेत्रात ज्याप्रकारचे वातावरण आहे त्याचा विचार करुन आपण हा निर्णय घेतल्याचे मिकानं सांगितलं आहे. 29 मे रोजी प्रसिद्ध पंजाबी गायक सिद्धु मुसेवाला यांची काही अज्ञात हल्लेखोरांनी हत्या केली. या घटनेवर मिका सिंगनं वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या होत्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray Eknath Shinde : वसंत डावखरे मानहानी प्रकरणाचा १७ वर्षांनी निकाल; उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदेंबाबत कल्याण न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल

Cigarette Price Hike: सिगारेट पुन्हा महाग! तब्बल 51% वाढली किंमत; नवीन दर काय?

Uddhav Thackeray on Gyanesh Kumar : "ज्ञानेश कुमार पक्ष फोडणाऱ्या टोळीचे प्रमुख, त्यांनी लोकशाहीची हत्या केली", उद्धव ठाकरेंचा घणाघात

Marathi News Live Updates : SIR वादावर निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण: सर्व निर्णय एकमताने घेतले

Kolhapur District Bank : जिल्हा बँकेच्या खिद्रापूर शाखेत ४० लाखांचा अपहार शिपायाचा कारनामा; शाखाधिकारी, लिपिकाचा यूजर वापरून काढले पैसे

SCROLL FOR NEXT