MIka Singh(Singer) Google
मनोरंजन

गाण्याचे व्ह्यूज खरेदी करणाऱ्यांच्या रॅकेटविषयी मिकाने दिली Inside News

२०२१ सालात गायक-रॅपर बादशहाने ७४ लाख रुपये मोजून गाण्याचे व्ह्यूज खरेदी केल्याचं प्रकरण खूप गाजलं होतं.

प्रणाली मोरे

2021 मध्ये बॉलीवूड(Bollywood) इंडस्ट्रीतलं एक प्रकरण चांगलंच गाजलं होतं. म्युझिक व्हिडीओज व्ह्यूज आणि इन्स्टाग्राम फॉलोअर्स लाखो रुपये देऊन खरेदी केल्याची बातमी समोर आली अन् सगळ्यांचेच धाबे दणाणले होते. या प्रकरणात मुंबई पोलिसांनी अनेक मोठ्या सेलिब्रिटींची चौकशी केली होती. बॉलीवूडचा प्रसिद्ध गायक बादशहाला(Badshah) यासाठी पोलिस स्टेशनच्या खूप फेऱ्या माराव्या लागल्या होत्या. बादशहानं तब्बल ७४ लाख रुपये मोजून आपल्या गाण्याचे व्ह्यूज(Song Views) वाढवण्यासाठी मोठी डील केली केल्याचं म्हणणं मुंबई क्राईम ब्रांचचं होतं.

मुबंई पोलिसांनी तर बॉलीवूडच्या खूप मोठ्या अभिनेत्रींनी इन्स्टाग्राम अकाऊंटवरील फॉलोअर्स खरेदी केल्याचं म्हटलं होतं. या प्रकरणाची मोठी चर्चा झाली होती. आता बॉलीवूडचा प्रसिद्ध गायक मिका सिंगने(Mika SIngh) या प्रकरणावर मोठं भाष्य केलं आहे. तो म्हणाला आहे,''आजकाल गायक स्वतःला कमी वेळात मोठं सिद्ध करण्याच्या नादात अशा चुकीच्या मार्गाचा अवलंब करतात,पण याने साध्य काहीच होत नाही''.

तो पुढे म्हणाला,''मी अनेकदा हॉलीवूड(Hollywood) आणि इंटरनॅशनल आर्टिस्टच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर जाऊन त्यांचे व्हिडीओज पाहतो. त्यांना मिलियन्स व्ह्यूज मिळालेले दिसतात. हे सत्य आहे. पण भारतात एखाद्या सोशल मीडिया इन्फ्लूएन्सरच्या अकाऊंटवरही तुम्हला तेवढेच व्ह्यूज पहायला मिळतील. आणि सत्य हे आहे की जेव्हा हा सोशल मीडियावर प्रसिद्ध असलेला इन्फलूएन्सर प्रत्यक्षात समोर आला की तुम्ही ओळखूही शकणार नाही. हे एक मोठं रॅकेट आहे आणि कमी वेळात ज्यांना लवकर गडगंज पैसा कमवायचा आहे ते या रॅकेटचा भाग लवकर बनतात. मी सुद्धा माझ्या एका व्हिडीओचे व्ह्यूज वाढवण्यासाठी या फंदात पडलो होतो पण त्यात मी यशस्वी नाही झालो. व्ह्यूज तर वाढले नाहीतच,पैसे गेले ते गेलेच,मोठं नुकसान झालं. तेव्हा मी शहाणा झालो अन् चांगल्या मार्गाने माझ्या चाहत्यांचे खरे प्रेम मिळवत मोठं होण्यात खरं सुख आहे याची वेळीच मला जाण झाली''.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: पुण्यात 'जय गुजरात'ची घोषणा; मुंबईत सारवासारव, अमित शहांसमोर दिलेल्या नाऱ्यावर एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया

MP Naresh Mhaske : अर्बन नक्षल घुसखोरीवरून पुरोगामी नेत्यांची कोल्हेकुई; नरेश म्हस्केंची घणाघाती टीका

Loan Penalty: आरबीआयकडून मोठा दिलासा! आता कर्जाच्या प्री-पेमेंटवर दंड भरावा लागणार नाही, नियम कधीपासून लागू होणार?

Georai Crime : गायरान जमिन का कसता? असे म्हणून अदिवासी कुटुंबीयाना कु-हाडीने मारहाण; वडिलांसह माय-लेकी गंभीर जखमी

Latest Maharashtra News Updates : ज्वेलर्सचे सुरक्षा रक्षक भटक्या कुत्र्यांनी केलेल्या हल्ल्यात गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT