Monica Dogra reveals 'I was ashamed of my gender' she is pansexual Google
मनोरंजन

'मी pansexual आहे ,स्वतःच्याच शरीराची लाज वाटायची', मोनिका डोग्राचा खुलासा

गायक-अभिनेत्री असलेल्या मोनिका डोग्रानं एका मुलाखतीत आपल्या सीक्रेट लग्नाविषयी देखील सांगितले आहे.

प्रणाली मोरे

गायक आणि अभिनेत्री मोनिका डोग्रा(Monica Dogra) हिनं काही दिवसांपूर्वीच आपण Pansexual असल्याचा खुलासा केला होता. तिनं आपल्या लग्नाची बातमीही खूप दिवस मीडियापासूनही लपवून ठेवली होती. जेव्हा तिला पहिल्यांदा आपण Pansexual असल्याचं समजलं,त्याविषयी बोलताना ती एका न्यूज पोर्टलला म्हणाली,''मला मी Pansexual आहे हे कळण्याआधी, केवळ पाच-सहा वर्षापूर्वीच मी या शब्दाविषयी ऐकलं होतं. आणि तेव्हा लगेच मला वाटलं मी सुद्धा त्यापैकी एक आहे. माझ्यासोबत खूप विचित्र घडतंय असं वाटत होतं. एकतर तुम्ही समलैंगिक असता किंवा नसता. जर मी समलैंगिक आहे किंवा गे आहे असं सांगितलं असतं तर कुणीच माझा स्विकार केला नसता. 'गे' देखील असा शब्द होता ज्याच्याविषयी समाजात फार काही चांगलं बोललं जात नाही''.(Monica Dogra reveals 'I was ashamed of my gender' she is pansexual)

अभिनेत्री म्हणाली, ''शाळेत असताना मी अगदी टॉमबॉय सारखे वागायचे. आणि जसजशी मी मोठी होत गेले तेव्हा मी स्त्रीत्वाचा देखील आनंद घेतला,अगदी जरा जास्तच. मला दोन्ही लिंगांच्या व्यक्तींसमोर स्वतःला एक्सप्रेस करायला,त्यांना माझ्याकडे आकर्षित करून घ्यायला आवडायचं''. पुढे मोनिका असंही म्हणाली की,''कॉलेजमध्ये असताना मी कधी कुठल्या मुलीला किस वगैरे केलं नाही. तोपर्यंत मी माझ्यातील स्त्रीत्वाचा आनंद घेत होते''.

''पण नंतर अचानक माझ्यात बदल होऊ लागले, मी नक्की कोण आहे याविषयी मनातला संभ्रम वाढत गेला. मग मला वाटलं कदाचित मी bisexual आहे, मला पुरुष आणि स्त्रीया दोन्ही आवडतात.आणि तोपर्यंत मला खरंच माहित नव्हतं की Pansexual म्हणजे नक्की काय आहे. पण मला एक मात्र कळालं होतं की मला स्त्री आकर्षण असलेले पुरुष आणि पुरुषांचे आकर्षण असलेल्या स्त्रिया हे दोघंही आवडत आहेत. Pansexuality चे खूप शब्द माहित झाल्यावर आता मात्र आपण कशात फिट बसतोय याविषयीची आपली आवड मी पक्की केली असल्याचं मोनिका म्हणाली''.

आपल्या लग्नाविषयी खुलासा करताना मोनिका म्हणाली आहे,''मी एका अशा पुरुषाशी लग्न केलं होतं जो खुप समजूतदार,हुशार,प्रेमळ आणि चांगला माणूस आहे. मी जेव्हा त्याला सांगितलं की माझ्या सिनेमात काम करणाऱ्या महिला सहकाराविषयी मला आकर्षण निर्माण झालं आहे. जिनं सिनेमात ट्रान्स वूमनची व्यक्तिरेखा देखील साकारली आहे. त्यावेळी त्यानं मला झिडकारलं नाही उलट अधिक प्रेम दिलं''.

पुढे सांगताना मोनिका म्हणाली,''आता आमचे रस्ते वेगळे झाले आहेत. आम्ही खूप विचार करुन एकमेकांपासून विभक्त होण्याचा निर्णय घेतला. हेच एक कारण होतं की माझं लग्न मी नेहमी मीडियापासून लपवून ठेवलं''.

''मी अनेक वर्षांपासून माझ्या सेक्शु्अॅलिटीविषयी खरंच बोलत आल्याचं मोनिका म्हणते. पण लोकांनी हे तेव्हा नोटिस केलं जेव्हा माझी सिरीज 'द मॅरिड वूमन' रिलीज झाली. यामध्ये एक बॉयफ्रेंड असताना देखील एका लग्न झालेल्या मुलीच्या प्रेमात मी पडते असं दाखविलं आहे. मी जसजशी मोठी होत गेले तसतशी मला माझीच लाज वाटायला लागली. माझ्या शरीराच्या काही भागांची मला लाज वाटायची. पण आता मी हे सगळं स्विकारलं आहे''.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar Chairman : माळेगाव कारखाना चेअरमनपदी अखेर अजितदादाचं! , विरोधकांच्या आक्षेपावर निवडणूक अधिकारी म्हणाले, आता...

ENGU19 vs INDU19 : १३ चौकार, १० षटकार! वैभव सूर्यवंशीचे विक्रमी शतक; फक्त २३ चेंडूंत चोपल्या ११२ धावा, निघाली इंग्लंडची हवा

Mumbai News: मुंबईत पावसामुळे रस्त्यांची दैना, खड्ड्यांची आकडेवारी समोर, पण पालिकेचा वेगळाच दावा

Cyber Fraud : जळगावात सायबर फसवणुकीचा धक्कादायक प्रकार: 'सीबीआय'च्या नावाने निवृत्त डॉक्टरला ३१ लाखांना गंडवले

Top 5 Government Schemes: सरकारच्या तिजोरीतून तुमच्यासाठी खास! ‘पीएम किसान’सारख्या 'या' 5 योजना ठरतील तुमचं आर्थिक कवच

SCROLL FOR NEXT