Mouni Roy Alia Bhatt esakal
मनोरंजन

Bollywood :आलियाशी झालेल्या तुलने बाबत 'हे' बोलली मौनी रॉय.....

‘जुनून’ ही भूमिका माझ्यासाठी महत्वाची पण....

सकाळ डिजिटल टीम

 ‘ब्रह्मास्त्र’ ह्या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांनी  समिंश्र प्रतिक्रीया दिल्या आहेत. ह्या चित्रपटातील गाणे असो वा संवाद फारसे कमाल करु शकत नसले चित्रपटातील VFX ने सर्वांची मने जिंकली. चित्रपटातील बरेच पात्र त्याच्या भूमिकेमुळे ट्रोलही झाले. त्यातच आलियाची भूमिकाही फारशी महत्वाची नसल्याचेही बोलले गेले. आलियापेक्षा मौनीने महत्वाची भूमिकाही साकारली आहे असं म्हणत दोघींची तुलना होत होती. याबाबत मौनीला विचारले असता तिने तिची बाजू मांडली.

ती म्हणाली,“मला यात काहीही जास्त किंवा कमी महत्त्वाचे वाटत नाही, मला एवढंच वाटतं जुनूनकडे  आत्मविश्वास आणि शक्ती असल्यामुळे  प्रेक्षकांना तसे वाटले असावे. चित्रपटातील माझी भूमिका ही केवळ माझीच होती. चित्रपटात मला विरोधी भुमिका करायची होती आणि ती माझी जबाबदारी होती.मी फक्त माझ्या भूमिकेवरच लक्ष केंद्रित केलं. प्रेक्षकांचा प्रतिसाद ऐकल्यानतंर खूप छान वाटतं...मला माझ्या इतक्या वर्षांच्या मेहनतीच फळ मिळालयं असं मला वाटतं आणि मी हे प्रामाणिकपणे सांगू शकते. ब्रह्मास्त्र हा सर्वांचा चित्रपट आहे. अयानने एक जग निर्माण केले आहे. या गोष्टीत हिरोज् आणि VFX आहे. यात सर्वच कलाकारांचे पात्र खूप महत्वाचे आहे”. 'ब्रह्मस्त्र’ मध्ये तिने ‘जुनून’ची भूमिका पार पाडली. तिच्या अभिनयाचे खुप कौतुक  झाले.

'ब्रह्मास्त्र'चा हा पहिला भाग आहे. या भागाचं नाव 'ब्रह्मास्त्र भाग 1- शिवा'  आहे. तर या चित्रपटाच्या दुसऱ्या भागाचं नाव 'ब्रह्मास्त्र भाग 2- देव' असं आहे. चित्रपटाच्या पहिल्या भागात शिवा आणि जुनूनचा संघर्ष दाखविण्यात आला आहे. त्याच्याकडे काही दैवी शक्ती असतात. चित्रपटात अमिताभ बच्चन आणि नागार्जुन यांच्याही भूमिका आहेत आणि त्यात शाहरुख खानचा कॅमिओ आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Commonwealth Games 2026: नीरज चोप्राचे 'सुवर्ण' हुकले, Rumesh Pathirage ने मारली बाजी; पाकड्या अर्शद नदीमची लाज गेली, वाचा काय झालं...

TEJASWIN SHANKAR HISTORICAL MEDAL: तेजस्विन शंकरने इतिहास घडवला! खडतर अशा डेकॅथलॉन स्पर्धेत भारताला जिंकून दिले पहिले पदक

रशियन तेल खरेदी करणाऱ्यांवर अमेरिकेकडून शंभर टक्के टॅरिफ; ट्रम्प यांच्या प्लॅनवर भारताची पहिली प्रतिक्रिया

Koyna Dam: कोयना धरणाचा मध्यरात्री मोठा विसर्ग! 23,520 क्युसेक पाणी नदीत; कृष्णा-कोयना काठावरील गावांना अलर्ट

Commonwealth Games 2026: भारताची 'ज्युदो'त पदक हॅटट्रिक! LIC एजंटच्या लेकीच्या जिद्दीला सलाम; कोण आहे यामिनी मौर्य?

SCROLL FOR NEXT