MP student sent money order of Rs 5-5 to Bollywood stars Shahrukh and Ajay Devgan, Google
मनोरंजन

शाहरुख-अजयला कुणी पाठवली 5-5 रुपयाची मनी ऑर्डर? कारणही ऐकाल तर व्हाल थक्क

सोशल मीडियावर ज्यानं कुणी शाहरुख-अजयला मनीऑर्डरची प्रत आणि पोस्ट टॅग केलीय त्याच्या नावाचा नुसता बोलबाला सुरु झाला आहे.

प्रणाली मोरे

बॉलीवूड सेलिब्रिटींसाठी चाहते काय करतील याचा नेम नाही. कधी त्यांच्या प्रेमात तर कधी त्यांच्यावरील रागात चाहते अनेकदा हटके काहीतरी करताना दिसतात. आता एका मध्यप्रदेशमध्ये राहणाऱ्या मुलीनं शाहरुख(Shahrukh Khan) आणि अजय देवगणला(Ajay Devgan) भेट म्हणून चक्क पाच-पाच रुपयांच्या मनीऑर्डर पाठवल्या आहेत.(MP student sent money order of Rs 5-5 to Bollywood stars Shahrukh and Ajay Devgan)

आता आपल्या सगळ्यांना आश्चर्य नक्कीच वाटेल की एवढ्या मोठ्या कलाकारांना कुणी पाच रुपयाची मनीऑर्डर(Money Order) का पाठवावी? खरतंर,ज्या मुलीनं अजय देवगण आणि शाहरुखला पाच रुपयाची मनीऑर्डर पाठवली आहे तिनं या दोघांना पानमसाल्याची(Panmasala) जाहिरात करू नका अशी मागणी केली आहे. या मुलीचं नाव आहे धडकन जैन. तिनं या दोन्ही स्टार्सच्या ट्वीटर अकाऊंटला आपली पोस्ट टॅग केली आहे.

धडकनचं म्हणणं आहे की पानमसाल्याचा वाईट परिणाम तरुणांच्या आरोग्यावर होत आहे. त्यामुळं तिनं पानमसाल्याची जाहिरात करणाऱ्या या बड्या कलाकारांना पाच-पाच रुपयांची मनी ऑर्डर पाठवली आहे,जेणेकरुन त्यांनी पानमसाल्याची जाहिरात करणं बंद करावं.

धडकन जैननं ही मनीऑर्डर २४ मे रोजी केली आहे,याचंही एक कारण आहे. २४ मे हा दिवस 'ब्रदर्स डे' म्हणून साजरा केला जातो. तिनं अजय देवगण,शाहरुखला भाऊ मानून त्यांना ही विनंती केली आहे. ती आपल्या आई-वडिलांची एकुलती एक मुलगी आहे, तिला कुणीही भाऊ नाही. आणि या 'ब्रदर्स डे' चं निमित्त साधून धडकन जैननं मोठ्या भावूकतेनं मनीऑर्डर करुन पोस्टही केली आहे.

धडकन जैनच्या मते २८ मार्च २०२१ पासून ती या कलाकारांना ट्वीट करुन आपलं म्हणणं सांगत आहे. तिनं पहिलं ट्वीट अजय देवगण,शाहरुख आणि अक्षय कुमारला मध्ये केलं होतं. या ट्वीटमध्ये धडकनने या कलाकारांना पानमसाल्याची जाहिरात करणं बंद करायचा सल्ला दिला होता. शाहरुख,अजयला पाच रुपयाचं मनीऑर्डर का पाठवलं यामागे आपला एक हेतू होता असं धडकन जैन म्हणाली. पानमसाल्याचं पाकिट हे पाच रुपयालाच मिळतं. मला वाटतं त्यांनी ते पाकिट मला गिफ्ट म्हणून पाठवावं. मी त्याला खाणार नाही पण यामागे माझा हेतू आहे की ते चुकीचं वागत आहेत याची त्यांना जाणीव व्हावी. आणि त्यांनी पानमसाल्याची जाहिरात बंद करावी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT