bombay day 
मनोरंजन

मुंबईतील अंडरवर्ल्डचे जग पुन्हा वेबमालिकेतून उलगडणार; 'बॉम्बे डे' वेबसीरीज लवकरच भेटीला...

सकाळन्यूजनेटवर्क

मुंबई ः महाराष्ट्र सरकारने कोरोना प्रतिबंधासाठी घालून दिलेल्या सर्व नियमांचे आणि अटींचे पालन करून आज 'बॉम्बे डे' या वेबसीरीजचा मुहूर्त आज एन. डी. स्टुडिओत झाला. प्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. सरकारची परवानगी मिळाल्यानंतर पुढील आठवड्यात चित्रीकरणाला सुरुवात होणार आहे.

भरत सुनंदा लिखित आणि दिग्दर्शित ही वेबसीरीज आहे. ती मराठी आणि हिंदी अशा दोन्ही भाषांमध्ये येणार आहे. एकूण चौदा भाग असलेल्या या वेबसीरीजमध्ये अनेक नामवंत कलाकार काम करणार आहेत. ही वेबसीरीज गुन्हेगारी विश्वावर बेतलेली आहे. मुंबईतील एका अंडरवर्ल्ड डॉनची कहाणी यामध्ये मांडण्यात आली आहे. या अंडरवर्ल्ड डॉनचा एन्काऊंटर एका बड्या पोलिस अधिकाऱ्याने केला होता. हा एन्काउंटर मुंबईतील सर्वात मोठा एन्काउंटर मानला जातो. त्याबद्दलची ही थ्रिलिंग कथा आहे. 

याबाबत दिग्दर्शक भरत सुनंदा म्हणाले, की आम्ही काही मोजक्याच मंडळींच्या उपस्थितीत या वेबसीरीजचा मुहूर्त आज केला. सरकारचे सगळे नियम पाळून तो करण्यात आला. मात्र चित्रीकरणाला सुरुवात करण्यात आलेली नाही. सरकारकडे आम्ही परवानगी मागितली आहे. सरकारचे जे नियम असतील ते पाळून चित्रीकरण करण्यात येईल. सेटवरील सगळ्यांनी मास्क घालणे, हात वारंवार सॅनिटायरने धुणे, सेटवर डॉक्टर्स ठेवणे, तसेच तापमान तपासणे वगैरे गोष्टींचे पालन करून चित्रीकरण करणार आहोत. पुढील आठवड्यात ते सुरू होईल असे वाटते. 

या वेबसीरीजमध्ये किशोरी शहाणे आणि त्यांचे पती दीपक बलराज वीज हे काम करणार असल्याचे निश्चित झाले आहे. अनुपम खेर, जॅकी भगननी, अनिकेत विश्वासराव या कलाकारांशी बोलणी सुरू आहेत. ही वेबसीरीज पोलिस अधिकारी विजय साळसकर यांच्या कारकिर्दीवर प्रेरित आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India Pakistan Conflict: पाकिस्तान खरंच अणुचाचण्या करतंय का? संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी मांडली भारताची भूमिका

Pune Traffic : सिंहगड रस्त्यावरील उड्डाण पुलावर रिक्षा-कारचा तिहेरी अपघात! मोठी वाहतूक कोंडी, नागरिक हैराण

Pune News : जेवणात झुरळ, पिन! COEP च्या मुलींच्या वसतिगृहात मनविसेचे तीव्र आंदोलन; विद्यापीठाला ७२ तासांचे अल्टिमेटम

Latest Marathi News Live Update: देश-विदेशासह राज्यात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Railway Ticket Booking : रेल्वेने ऑनलाइन तिकीट बुकिंग सिस्टीममध्ये केला मोठा बदल!

SCROLL FOR NEXT