Multiplex New Concept Esakal
मनोरंजन

Multiplex Update: फक्त 1 रुपयात थिएटर्स देतायत 30 मिनिटांचं निखळ मनोरंजन..काय आहे हे नवं प्रकरण?

मल्टिप्लेक्स चेन पीव्हीआर आयनॉक्सनं केलेली घोषणा सध्या जोरदार चर्चेत आहे.

प्रणाली मोरे

Multiplex Update: मल्टिप्लेक्स चेन पीव्हीआर आयनॉक्सनं एक घोषणा केली आहे ज्याची जोरदार चर्चा सध्या रंगली आहे. या घोषणे अंतर्गत ३० मिनिटाचा ट्रेलर स्क्रीनिंग शो केला गेला. या नव्या संकल्पनेला प्रतिसाद मिळाला तेव्हा ५० दिवसांत २.५० लाखाहून अधिक तिकिटांची विक्री झाली.

३० मिनिटांचे हे मनोरंजन प्रेक्षकांसाठी एक सुंदर अनुभव देतं,जिथे बहुप्रतिक्षित सिनेमांचे १० ते १२ ट्रेलर एक रुपयांच्या किंमतीत पाहायला मिळतात. मुंबईतील प्रेक्षकांनी याला अधिक पसंत केलं,त्यानंतर दिल्ली आणि बंगळुरू इथे या नव्या संकल्पनेला प्रतिसाद मिळालेला दिसला.

प्रेक्षकां व्यतिरिक्त प्रॉडक्शन हाऊस आणि फिल्म निर्मात्यांनी देखील या नव्या संकल्पनेची प्रशंसा केली आहे. देशभरातील सिनेप्रेमिकांसाठी ही जणू मेजवानी ठरत आहे. ३० मिनिटांचे हे एंटरटेन्मेंट पॅकेज लोकांना खूप आवडत आहे. (Multiplex update: enjoy 10 to 12 movies trailer in only 1 rupee.. Read details)

या नव्या संकल्पनेला मिळणारा प्रतिसाद पाहता पीव्हीआर आयनॉक्सचे को-सीईओ गौतम दत्ता म्हणाले,''ट्रेलर स्क्रीनिंग शो ला मिळणाऱ्या प्रतिसादानं आम्हाला खूप छान वाटत आहे. देशभरातील सिनेप्रेमिकांचा उत्साह पाहून आम्हाला देखील काहीतरी नवीन करण्याची उर्जा मिळते. ट्रेलरचं स्क्रीनिंग केल्यामुळे एकप्रकारे सिनेमाला देखील चांगला प्रतिसाद मिळण्यास सहाय्य होऊ शकतं. आम्हाला आनंद आहे की आमच्या प्लॅटफॉर्मवर आम्ही हे पहिलं पाऊल उचललं''.

वॉर्नर ब्रदर्स डिस्कव्हरीमधील इंडिया थिएट्रिकलचे व्हाइस प्रेसिडेंट आणि मॅनेजिंग डायरेक्टर डेन्जिल डायस यांचे या नव्या संकल्पने संदर्भात म्हणणे आहे की,''आमच्या सिनेमांना मोठ्या पडद्यावर पाहणं प्रेक्षकांसाठी खूप सुंदर अनुभव असतो,त्यामुळे नक्कीच आमच्या चाहत्यांना मोठ्या पडद्यावर त्या आगामी सिनेमांचे ट्रेलर देखील पहायला हवेत. आता प्रेक्षक एका चांगल्या फॉर्मॅट मध्ये सिनेमांचे ट्रेलर पाहू शकतात..या संकल्पनेमुळे सिनेमांना देखील पुढे जाऊन बॉक्सऑफिसवर फायदा होऊ शकतो. कारण ट्रेलरचं सादरीकरण जर प्रेक्षकांना आवडलं तर नक्कीच तो प्रेक्षक थिएटरमध्ये सिनेमा पहायला येऊ शकतो''.

तेव्हा प्रेक्षकहो,तुमच्या जवळ जर पीव्हीआर आयनॉक्स असेल तर नक्की जाऊन 1 रुपयांत आगामी सिनेमांचे ट्रेलर एन्जॉय करा..

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gujarat HC: Zoom मीटिंग नाही कोर्ट आहे! शौचालयातू सुनावणीला हजर राहून फसला, कोर्टाने ठोठावली शिक्षा... पोटासह खिसाही रिकामा

Pune Railway Station: पुणे स्थानकावर ‘ब्लॅक बॉक्स’ सारखी यंत्रणा; व्यवस्थापक, चालक यांच्या संभाषणाचे होणार रेकॉर्डिंग

Satara Fraud:'साताऱ्यातील एकाची ४३ लाखांची फसवणूक'; पाच जणांवर गुन्हा दाखल,वाळू ठेका देण्याचे दाखवले आमिष

Ashadhi Wari:'माउलींच्या पालखीचे लोणंदमध्ये स्वागत'; दर्शनासाठी भाविकांची गर्दी; निरोप देताना अनेकांचे पाणावले डोळे

Fauja Singh : जगप्रसिद्ध धावपटू फौजा सिंग यांचे वयाच्या ११४ व्या वर्षी अपघाती निधन, रस्ता ओलांडताना अज्ञात वाहनाची धडक

SCROLL FOR NEXT