Mumbai police fir against Bollywood actor vivek oberoi drive without mask and helmet
Mumbai police fir against Bollywood actor vivek oberoi drive without mask and helmet  
मनोरंजन

अभिनेता विवेक ऑबेरायवर गुन्हा दाखल; कोरोना नियमांचा केला भंग

सकाळ ऑनलाईन टीम

मुंबई -  कोरोनाचे सावट अद्याप दूर झालेले नाही. त्यात दररोज त्यासंबंधीची माहिती समोर येत आहे. अशावेळी नागरिकांनी योग्य ती काळजी घेण्याचे आवाहन सातत्यानं राज्य शासनानं केलं आहे. सार्वजनिक ठिकाणी वावरताना मास्कचा वापर करणे बंधनकारक करण्यात आले आहे. या नियमाचे उल्लंघन केल्यास त्याच्यावर फौजदारी कारवाई होणार असल्याचे यापूर्वी सांगण्यात आले आहे. असे असतानाही काहीजण त्या नियमांना डावलत आहेत.

प्रख्यात अभिनेता विवेक ऑबेरायकडून कोविडच्या सुरक्षेच्या संबंधित नियमांचे उल्लंघन झाल्याचे दिसुन आले आहे. याप्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. मुंबई पोलिसांनी आयपीसीच्या कलम 188, 269, मोटार वाहन कायद्याच्या कलम 129,177 नुसार साथी रोगपसरण्यापासून प्रतिबंधक कायद्याच्या कलमांखाली विवेकवर गुन्हा दाखल केला आहे. जुहू पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला असून एका वरिष्ठ अधिका-यानं या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार,  गुरुवारी विवेक ओबेरॉयचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यात तो विनामास्क आणि हेल्मेटशिवाय दुचाकी चालवत असल्याचे दिसून आले होते. याचे सोशल मीडियावर तीव्र पडसाद उमटल्याचे दिसून आले. त्यानंतर पोलिसांनी त्या घटनेची दखल घेऊन त्याच्यावर गुन्हा दाखल केल्याचे सांगण्यात आले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election : PM मोदींबद्दलच्या टिप्पणीनंतर भाजपमधून हकालपट्टी, आता पोलिसांनी केली अटक; जाणून घ्या प्रकरण

Aaditya Thackeray : आदित्य ठाकरे कोल्हापुरात; म्हणाले, खोके सरकारने एकही नवा उद्योग आणला नाही

Mumbai Indians : भारी खेळतोय मात्र तिलक वर्मा मुंबई इंडियन्ससाठी 'अनलकी' ठरतोय? पाहा आकडेवारी काय सांगते

NCB अन् ATS ची मोठी कारवाई! गुजरातच्या सीमेवर 80 किलो ड्रग्ससह 14 पाकिस्तानी अटकेत

Lok Sabha Election : AAPने निवडणूक प्रचारासाठी तयार केलेले 'ते' गाणे वापरण्यास निवडणूक आयोगाची मनाई; नेमकं काय आहे प्रकरण?

SCROLL FOR NEXT