Mumtaz Workout Video Google
मनोरंजन

Mumtaz: म्हातारपणात मुमताज इन्स्टाग्रामवर! वयाच्या ७५ व्या वर्षी वर्कआऊट व्हिडीओ पाहून भल्या-भल्यांंची...

गेली अनेक वर्ष ग्लॅमर इंडस्ट्रीपासून दूर राहिलेल्या मुमताज पुन्हा एकदा मनोरंजन सृष्टीतही सक्रिय झालेल्या दिसून येत आहेत.

प्रणाली मोरे

Mumtaz Workout Video: साठ आणि सत्तरच्या दशकात आपल्या अभिनयासोबत सौंदर्यामुळेही लोकांच्या मनावर राज्य करणाऱ्या मुमताज सध्या सोशल मीडियावर भलत्याच सक्रिय पहायला मिळत आहे.

वयाच्या ७५ व्या वर्षी त्यांनी इन्स्टाग्रामवर पदार्पण केलं आहे. पदार्पणानंतर लागलीच मुमताजनी आपल्या वैयक्तिक आयुष्यातील काही सुंदर झलक चाहत्यांसोबत शेअर केल्या आहेत. मुमताजनं मुलगी नताशा माधवानी सोबत वर्कआऊट करतानाचा व्हिडीओ शेअर केला आहे.

मुमताजनं इन्स्टाग्रामवर सिंगिंग रिअॅलिटी शो इंडियन आयडल चा एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये ती स्टेजवर धडाकेबाज डान्स करताना दिसत आहे. ७५ वर्षाच्या वयात मुमताजच्या एनर्जेटिक डान्स मूव्ह्ज पाहण्यासारख्या आहेत.

मुमताजची ही झलक पाहून चाहते भलतेच एक्सायटेड आहेत आणि अभिनेत्रीवर प्रेमाचा वर्षाव करताना दिसत आहेत.

मुमताजनं काही असे व्हिडीओ शेअर केले आहेत,ज्यात ती वर्कआऊट करताना नजरेस पडत आहे. वयाच्या या टप्प्यावर अभिनेत्रीची जिद्द सगळ्यांनाच हैराण करताना दिसत आहे. चाहते मुमताजच्या या वर्कआऊटला पाहून हैराण होताना दिसत आहेत.

मुमताज यांच्या करिअर विषयी बोलायचं झालं तर त्यांनी ११ व्या वर्षी बालकलाकार म्हणून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. त्यानंतर तिनं ६० च्या दशकात मुख्य अभिनेत्रीच्या भूमिका साकारायला सुरुवात केली.

मुमताजनी सगळ्यात जास्त सिनेमे दारा सिंगसोबत केले. 'फौलाद','डाकू मंगल सिंग' सारख्या अॅक्शन सिनेमांत मुमताज आणि दारा सिंग एकत्र दिसले होते. पण या सिनेमांमुळे मुमताज एकाच पठडीतल्या भूमिकांमध्ये टाइपकास्ट झाल्या होत्या. त्यांच्यावर स्टंट फिल्म हिरोईन हा ठपका बसला होता. आणि यामुळे मुमताजच्या करिअरवर ब्रेक लागला होता.

पण १९६९ मध्ये आलेल्या 'दो रास्ते' सिनेमानं मुमताजच्या करिअरला योग्य दिशा दिली आणि मग 'आप की कसम','चोर मचाए शोर', 'रोटी', 'प्रेम कहानी', 'तेरे मेरे सपने','हरे राम हरे कृष्णा' आणि 'नागिन' सारखे सिनेमे त्यांनी केले.

त्यानंतर मुमताजनी मध्येच १३ वर्षांचा ब्रेक घेतला. आणि १९९० मध्ये त्यांनी 'आंधिया' सिनेमातून कमबॅक केलं. मुमताजनं हिट सिनेमा देत कमबॅक केलं तरी देखील त्यांनी सिनेइंडस्ट्रीला रामराम ठोकला.

त्यानंतर त्यांनी ग्लॅमर इंडस्ट्रीपासून कायमची दूरी बनवली. काही दिवस आधी पुन्हा मुमताजनी इंडस्ट्रीत एन्ट्री केली आहे. त्या अनेक कार्यक्रमात दिसू लागल्या आहेत. आणि काही आठवडे आधीच त्या धर्मेंद्र यांच्यासोबत 'इंडियन आयडल १३' मध्ये दिसल्या होत्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

City Disfigurement Award : ‘शहर विद्रूपीकरण पुरस्कार’ भाजप नगरसेवकांना; स्थायी समिती अध्यक्ष भिमालेंना प्रथम, सुतारांना द्वितीय, तर पांडेंना तृतीय

Pune Shivajinagar Court Firing Health Update : "पुढचे ७२ तास अत्यंत महत्त्वाचे!" शिवाजीनगर कोर्टाबाहेर हल्ला झालेल्या मंदार किवळेची प्रकृती चिंताजनक; ससूनच्या अधिष्ठात्यांकडून महत्त्वाची माहिती

Online Gaming: PUBG मधून जुळली मैत्री; मग प्रेमाचे नाटक! गेमिंग पार्टनरनेच तरुणीचा गळा आवळला

26/11 Mumbai Attack 18th Anniversary : लाठी घेऊन कसाबच्या गोळ्या अंगावर झेलणारे तुकाराम ओंबळे अन् 'ती' ६० तासांची काळी रात्र! १८ वर्षांनंतरही मुंबईच्या जखमा ताज्या; तहव्वुर राणाच्या प्रत्यार्पणानंतर कुठवर पोहोचला न्याय?

Meta Congress Meeting Controversy : 'मेटा भाजप का बेटा', मेटा-काँग्रेस बैठकीत जोरदार खडाजंगी! राहुल गांधींच्या पोस्टवर निर्बंध येत असल्याचा काँग्रेसचा आरोप; भारतीय कायद्यांचे पालन करत असल्याचे मेटाचे स्पष्टीकरण

SCROLL FOR NEXT