Myra Vaikul Esakal
मनोरंजन

Myra Vaikul: 'तिला तिचं बालपण जगू द्या..', मायरा वैकूळचा व्हिडीओ वादात..नेटकऱ्यांनी आई श्वेताला केलं ट्रोल

मायरा वैकूळ म्हणजेच 'माझी तुझी रेशीमगाठ' मालिकेतील 'परी' हिचा पहिलाच व्हिडीओ आहे ज्याला सोशल मीडियावर ट्रोल केलं गेलं आहे.

प्रणाली मोरे

Myra Vaikul: 'माझी तुझी रेशीमगाठ' या मालिकेत परी ही व्यक्तीरेखा साकारणाऱ्या मायरा वैकूळचा चाहता वर्ग मोठा आहे. मायरा मालिकेत काम करण्याआधीच सोशल मीडियावर तिच्या व्हिडीओ, रील्सच्या माध्यमातून प्रसिद्ध होती.

पण मालिकेत परी साकारल्यानंतर तिच्या अभिनयची जादू देखील प्रेक्षकांवर चालली अन् तिचा करिअरचा ग्राफ अवघ्या वयाच्या पाचव्या वर्षीच धावू लागला. आजच्या घडीला तिनं हिंदी मालिकाविश्वातही आपली घोडदौड सुरु केल्याचं समोर आलं आहे.

मायराच्या नावानं स्वतंत्र अकाऊंट इन्स्टाग्रामवर आहे जे तिची आई श्वेता वैकूळ हॅंडल करते. अनेकदा मायराच्या व्हिडीओवर चाहत्यांच्या प्रशंसा करणाऱ्या प्रतिक्रिया पहायला मिळतात पण नुकतंच असं काही घडलं आहे की ज्यामुळे मायराच्या व्हिडीओवर नेटकऱ्यांच्या तिखट प्रतिक्रिया वाचायला मिळत आहेत.

चला जाणून घेऊया नेमका कोणता व्हिडीओ आहे ज्यावरनं नेटकऱ्यांनी मायराच्या आईला धारेवर धरलं आहे.(Myra Vaikul controversy video mother shweta vaikul troll)

मायरा वैकूळच्या आईचं नाव श्वेता वैकूळ. श्वेता वैकूळ यांनी नुकताच मायरा आणि त्यांचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये त्या दोघी माय लेकी वटपौर्णिमा साजरी करताना दिसत आहेत. ट्रेडिशन पेहराव करत दोघींनी पारपंरिक पद्धतीनं वटपौर्णिमा साजरी केलेली दिसत आहे. आता कदाचित आपण विचार कराल की यात गैर काय आहे..वटपौर्णिमा सण साजरा केला हे चांगलंच केलंय की.

पण लोकांना या व्हिडीओत खटकलं ते आईसोबत मायराचं वडाच्या झाडाला धागा गुंडाळून फेऱ्या मारणं. कारण व्हिडीओत मायरा देखील आईसोबत वडाच्या झाडाला धागा गुंडाळून फेऱ्या मारताना दिसत आहे. जे लोकांना मुळीच आवडलेलं नाही. यावरनं नेटकऱ्यांनी मायराच्या आईला धारेवर धरत तिखट प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत.

मायराच्या त्या वटपौर्णिमेच्या व्हिडीओवर एका नेटकऱ्यानं प्रतिक्रिया देत लिहिलं आहे,'श्वेता ताई मायरानं धागा बांधून प्रदक्षिणा का मारली तिला फक्त नमस्कार करायला सांगायचं नं...', आणखी एकानं लिहिलं आहे की,'संस्कृती शिकवायचं इथपर्यंत ठीक आहे पण हातात धागा का द्यायचा..' तर आणखी एकानं लिहिलं,'संस्कृती शिकवण्याच्या नादात तिचं बालपण हरवू देऊ नका..' काहींनी मायराच्या व्हिडीओचं मात्र कौतूक केलं आहे.

मायरानं आता हिंदी मालिकाविश्नात पदार्पण केलं आहे. ती आता कलर्स वाहिनीवरच्या 'नीरजा..एक नई पहचान' या हिंदी मालिकेत दिसणार आहे. या मालिकेतील तिचा लूक एकदम वेगळा आहे. लांब केस आणि पंजाबी ड्रेस अशा पेहरावाता मायरा वैकूळ दिसणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Who is Sushil Kedia: राज ठाकरेंना चॅलेंज देणारा सुशील केडिया कोण आहे? कसे कमावले कोट्यवधी रुपये?

IND vs ENG 2nd Test: Ohhh NO! शुभमन गिलच्या डोक्यावर चेंडू जोरात आदळला, डॉक्टरांची मैदानावर धाव अन्...

VIRAL VIDEO: यांना 'महाराष्ट्र केसरी' म्हणावं की दुसरं काही! दोन घोरपडीमध्ये रंगली दंगल, व्हिडिओ पाहून तुम्हालाही धक्का बसेल

Alternative Careers: 9 ते 5 च्या ठराविक नोकरीला कंटाळला आहात? मग 'हे' 8 करिअर पर्याय तुमच्यासाठी ठरू शकतात योग्य पर्याय!

Viral: पैसे उधार घेणाऱ्यांनो लक्ष द्या...! उसने घेतलेली रक्कम वेळेत परत केली नाही तर होणार जेल अन्..., न्यायालयाचा निर्णय

SCROLL FOR NEXT