Nagraj Manjule, Amitabh Bachchan's 'Jhund' Movie poster Google
मनोरंजन

Good News:नागराज मंजुळेचा 'झुंड' सिनेमागृहात;या तारखेला प्रदर्शित

अमिताभ बच्चन यांनी सोशल मीडियावर प्नेक्षकांना सिनेमासाठी तयार राहण्याचं आवाहन केलं आहे.

प्रणाली मोरे

नागराज मंजुळेचे(Nagraj Manjule) सिनेमे म्हणजे समाजमनाचं टिपलेलं सुरेख चित्रण. त्याच्या सिनेमानं नेहमीच खऱ्याची बाजू मांडली. 'सिनेमॅटिक लिबर्टी' म्हणून जो काही शब्द मनोरंजन क्षेत्रात प्रचलित आहे तो त्यानं तसा फारसा आपल्या सिनेमातील कथानकासाठी वापरला नाहीच मुळी. त्याच्या 'पिस्तुल्या' या शॉर्ट फिल्मपासून सैराट,फॅन्ड्री,नाळ अशा अनेक सिनेमांनी प्रेक्षकांच्या काळजाला हात घातला असं म्हटलं तर अतिश्योक्ती ठरू नये. आता याच नागराज मंजुळेचा 'झुंड' सिनेमा बहुप्रतिक्षेनंतर अखेर भेटीला येत आहे. महानायक अमिताभ बच्चन(Amitabh Bachchan) आणि दिग्दर्शनातील महानुभव असलेला नागराज यांचं बेस्ट कॉम्बिनेशन घेऊन 'झुंड' भेटीस येणार म्हणजे मनोरंजनाची चविष्ट मेजवानी असणार यात शंकाच नाही. या सिनेमाची सारेच आतुरतेने वाट पहात होते.

दीर्घकाळापासून रखडलेला हा सिनेमा कधी प्रदर्शित होणार हे जाणून घेण्यासाठी आपण सारेच प्रेक्षक उत्सुक असाल. तर नागराज मंजुळे दिग्दर्शित 'झुंड' हा सिनेमा येत्या ४ मार्चला प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या सिनेमात बिग बी मुख्य भुमिकेत दिसणार आहेत. नागराज मंजुळेनं त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर झुंड चे पोस्टर शेअर करीत प्रदर्शनाची तारीख जाहिर केली आहे. अमिताभ बच्चन यांनीही याबाबत पोस्ट शेअर केली आहे. ''इस टोली से मुकाबला करने के लिए रहो तैयार. हमारी टीम आ रही है'', अशा कॅप्शनसह त्यांनी झुंड ची प्रदर्शनाची तारीखही निश्चित झाल्याचं सांगितलं आहे.

कोरोनाच्या(Corona) संकटात या सिनेमाचं प्रदर्शन रखडलं होतं. पण पुढे लॉकडाऊन उठल्यानंतरही 'झुंड' कायद्याच्या कचाट्यात अडकल्यामुळे प्रदर्शन पुन्हा रखडलं. अर्थात आता सगळे अडथळे पार केल्यानंतर झुंडची प्रदर्शनाची तारीख निश्चित झाली आहे. सिनेमागृहात 'झुं'ड भेटीला येतोय ही प्रेक्षकांसाठी मोठी गूड न्यूज आहे. हा सिनेमा विजय बारसे या फुटबॉल प्रशिक्षकाच्या जीवनावर आधारित आहे. विजय बारसे यांनी गरीब वस्तीत राहणाऱ्या मुलांची फुटबॉल टीम बनवली होती. याच कथेवर आधारित हा सिनेमा आहे. हा एक स्पोर्ट ड्रामा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

8th Pay Commission: फिटमेंट फॅक्टर 3.83? आठव्या वेतन आयोगाच्या बैठकीत विवाद! ..तर पगार किती वाढणार?

Pune Crime : मैत्रिणीशी बोलत असल्याच्या रागातून स्पर्धा परिक्षेच्या विद्यार्थ्याचे अपहरण करणाऱ्या आरोपींना १५ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी

Beed Scam : बीडमध्ये ७ कोटींचा महाघोटाळा! २० वर्षांच्या भाडेपट्ट्यावरील जमिनीवर डल्ला; एसबीआयचे व्यवस्थापक, सरपंचासह ६ जणांवर गुन्हा दाखल

Maratha Reservation: अभिजित दीपके घेणार मनोज जरांगेंची भेट; तारीख अन् वेळही ठरली

Marathi News Live Updates : राजकारण ते हवामान...; एका क्लिकवर वाचा दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

SCROLL FOR NEXT