namrata sambherao special birthday post on her mother maharashtrachi hasyajatra SAKAL
मनोरंजन

Namrata Sambherao: कशी आहे नम्रता संभेरावची आई, एका पोस्टमध्ये सगळंच सांगून टाकलं

आज नम्रताच्या आईचा वाढदिवस आहे.

Devendra Jadhav

Namrata Sambherao Post About Mother News: नम्रता संभेराव सोशल मिडियावर चर्चेत असलेली आहे. नम्रता संभेराव हास्यजत्रेतली सगळ्यात लोकप्रिय अभिनेत्री. नम्रताने आजवर विविध भूमिका साकारून प्रेक्षकांचं मनोरंजन केलंय.

नम्रताचं सोशल मीडियावर प्रचंड चाहते आहेत. नम्रताने नुकतीच सोशल मीडियावर एक पोस्ट केलीय. त्या पोस्टमध्ये नम्रताने तिच्या आईबद्दल भावना व्यक्त केल्यात. आज नम्रताच्या आईचा वाढदिवस आहे.

नम्रता लिहिते.. Happy birthday young lady माझ्या आयुष्यातली माझी सगळ्यात मोठी support system.. माझी मम्मी बालवाडीत असताना नृत्य स्पर्धेत भाग घेतला होता तेव्हा मम्मीने मला सनईचा सूर ह्या गाण्यावर dance बसवून दिला.

अजूनही मी नाही विसरू शकत मला मम्मी steps शिकवत होती तेव्हा मम्मी ज्या तालात नाचत होती त्याच तालात तिची लांबसडक केस वेणी डुलत होती सुंदर दिसायची तेव्हाही.

नम्रता पुढे लिहिते.."माझ्या मम्मी मुळे मी ह्या क्षेत्रात येऊ शकले हे तितकच खरं.. सगळे मला विचारतात आप क्या खाते हो त्याचं गूढ माझी मम्मी तिला हि सगळं येत डान्स, गाणं, अभिनय, स्वयंपाक तिच्यातला भावनिक भाव कट टू कट उचललाय..

पूर्वी जेव्हा छोटे मोठे रोल करायचे ह्या क्षेत्रात अगदी पासिंग वगरे तेव्हा माझ्यासोबत प्रवास करायची दिवसभर थांबायची माझ्या इतकाच तिचा struggle ही मोठा आहे,

नम्रता आईच्या स्वभावाबद्दल म्हणते.. "जिद्द, महत्वाकांक्षा, उत्साह, आशा, मेहनत, माया मम्मीकडून मिळाली आणि मी ती कायम जपून ठेवीन माझ्या आयुष्यातलं तुझं स्थान अव्वल नंबर वर आहे..

एक सांगू माझी मम्मी पण जरा मस्तीखोर आहे कधी गप्पा मारताना मला भानच रहात नाही मम्मी शी गप्पा मारतेय कि मैत्रिणी सोबत, स्वतःचे निर्णय अपेक्षा कधीच लादल्या नाहीत,

आम्ही जे करू त्यात सपोर्ट करणारी माझी मम्मी किती आणि काय सांगू, एवढ्याश्या शब्दा त तीच वर्णन नाही होऊ शकत पण आज काही मोजक्या जुन्या आठवणींना उजाळा द्यावासा वाटला.

नम्रता शेवटी लिहीते.. "I LOVE YOU MY MOMMY तर अशी माझी मम्मी लाखात एक आहे ती best आई बायको सासू मैत्रीण आणि आज्जी आहे आणि आत्ता जसं वर्ष वय पुढे सरकतंय तशी ती दिवसेंदिवस तरुण होत चालली आहे मनाने आणि मला ते खूप आवडतंय.

मम्मी तुझ्यामुळे माझं अस्तित्व आहे मला तुझ्या पोटी जन्म दिलास आणि इतकं मेहनती बनवलंस मी आयुष्यभर ऋणी तुझी मान अशीच उंचावत ठेविन promise" अशी पोस्ट नम्रताने लिहिली आहे. नम्रताच्या आईला अनेकांनी कमेंटमध्ये वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT