National Film Day News National Film Day News
मनोरंजन

National Film Day : शुक्रवारी चित्रपट स्वस्त दरात पाहण्याची संधी; ७५ रुपये तिकीट

सिनेमागृहांमध्ये कोणताही चित्रपट अवघ्या ७५ रुपयांमध्ये पाहता येणार आहे

सकाळ डिजिटल टीम

National Film Day News राष्ट्रीय चित्रपट दिन (National Film Day) शुक्रवारी (ता. २३) साजरा केला जाणार आहे. या दिवशी चित्रपटांच्या तिकिटांची किंमत ७५ रुपये ठेवण्यात आली आहे. यामुळे ३०० ते १००० रुपयांचे तिकीट काढून चित्रपट पाहणाऱ्या प्रेक्षकांना अवघ्या ७५ रुपयांमध्ये चित्रपट पाहता येणार आहे. केवळ ॲमॅझॉन (Amazon) व फ्लिपकार्टवरच (Flipkart) नाही तर सिनेमागृहातही बंपर सेल आहे. प्रेक्षकांना मल्टिप्लेक्समध्ये चित्रपट स्वस्त दरात पाहण्याची सुवर्णसंधी मिळाली आहे.

अनेक दिवसांपासून बॉलिवूडला नुकसान सहन करावे लागत आहे. मोठ्या अभिनेत्यांचेही चित्रपट फ्लॉप झाले आहेत. यानंतर ब्रह्मास्त्र चित्रपट आला आणि बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली. ४५० कोटी खर्चून बनलेल्या या चित्रपटाने (Movie) सुमारे दोनशे कोटींचा व्यवसाय केला आहे. या आठवड्यात म्हणजेच २३ सप्टेंबरला दोन चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. एक धोका आणि दुसरा चूप.

मात्र, २३ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय चित्रपट दिन (National Film Day) साजरा करण्यात येणार आहे. त्यानिमित्ताने प्रेक्षकांना भेटवस्तू देताना चित्रपटांच्या तिकिटांची किंमत केवळ ७५ रुपये ठेवण्यात आली आहे. मल्टिप्लेक्स असोसिएशन ऑफ इंडियाने राष्ट्रीय चित्रपट दिनानिमित्त ट्विट केले आहे की, भारताच्या पहिल्या राष्ट्रीय चित्रपट दिनानिमित्त भारतभरातील सर्व सहयोगी सिनेमागृहांमध्ये (Theaters) फक्त ७५ रुपयांमध्ये चित्रपटांचा आनंद घ्या.

२३ सप्टेंबर रोजी देशातील ४,००० सिनेमागृहांमध्ये कोणताही चित्रपट अवघ्या ७५ रुपयांमध्ये पाहता येणार आहे. यापूर्वी १६ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय चित्रपट दिन साजरा करण्याची तारीख निश्चित करण्यात आली होती. ब्रह्मास्त्र चित्रपट हिट झाल्यानंतर चित्रपटगृह मालकांनी नुकसान भरून काढण्यासाठी थोडा वेळ मागितला होता. यामुळे नंतर २३ सप्टेंबर हा दिवस निश्चित करण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT