Details of Nawazuddin Siddiqui-Irrfan Khan's war REVEALED Google
मनोरंजन

Bollywood: 'एका मुलीवरनं..', 2013 साली झालेल्या नवाझुद्दीन आणि इरफान मधील वादावर नवाझच्या भावाचा मोठा खुलासा

'लंच बॉक्स' सिनेमाच्या शूटिंग दरम्यान इरफान आणि नवाझुद्दीन मध्ये वाद झाल्याच्या बातम्या पसरल्या होत्या.

प्रणाली मोरे

Nawazuddin Siddiqui-Irrfan Khan's war REVEALED: नवाझुद्दीन सिद्दीकीच्या वैयक्तिक आयुष्यात सध्या मोठी उलथा-पालथ होताना दिसत आहे. त्याची पत्नी आलियानं त्याच्यावर अनेक गंभीर आरोप लावले आहेत. यादरम्यान त्याचा भाऊ शमासची मुलाखत देखील चर्चेत आली आहे.

या मुलाखतीत शमासनं एक जुना वाद पुन्हा चर्चेत आणला आहे. त्यानं अनेक वर्ष आधी नवाजुद्दीन सिद्दिकी आणि इरफान खान मध्ये झालेल्या वादाचा आणि त्यामागील कारणाचा खुलासा केला आहे.

शमासचं म्हणणं आहे की 'लंच बॉक्स' सिनेमाच्या दरम्यान इरफान आणि नवाझुद्दीन दरम्यान वाद झाल्याच्या बातम्या पसरल्या होत्या. तो वाद झाला होता आणि त्या बातम्यात तथ्य होतं असं शमासनं म्हटलं आहे.

दोघांमध्ये एका मुलीवरनं भांडण झालं होतं. इरफान आणि नवाजचं मन एकाच मुलीवर आलं होतं. अर्थात त्यावेळी दोघांनी या बातम्यांना अफवा म्हणत आपल्याकडनं नकार दिला होता.(Nawazuddin siddiqui brother shamas reveals reason of clash between his brother and irrfan khan was girl )

शमासनं एका इंग्रजी वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत आपल्या कौटुंबिक भांडणांवर भाष्य केलं. भाऊ नवाझुद्दीनला पैशासाठी लालची म्हटलं. जेव्हापासून त्याचे सिनेमे चालायला लागले तो बदललाय असं शमासनं म्हटलं.

शमास म्हणाला, ''नवाझुद्दीन घरातला मोठा आहे. आणि तो आपल्या भावांसोबत कधीच चांगला वागला नाही''.

एवढंच नाही तर तो चांगला वडीलही बनला नाही असा आरोप त्याच्यावर आहे. शमास एका जुन्या वादाविषयी देखील बोलला. नवाझ आणि इरफानमध्ये २०१३ मध्ये वाद का झाला होता यावर देखील मोठा खुलासा केला आहे.

हेही वाचा: कॅशबॅक किंवा खरेदीवर सूट मिळणारंच कार्ड निवडा...

नवाझुद्दीन सिद्दीकी आणि इरफान खाननं एकत्र अनेक सिनेमे केले होते. 'लंच बॉक्स' देखील यापैकी एक होता. सिनेमाचं शूटिंग संपल्यानंतर नवाझुद्दीन प्रमोशन दरम्यान कुठेच दिसला नाही.

त्यावेळी नवाझ आणि इरफान मध्ये वाजलं होतं. आता नवाझनं शमासला सांगितलं की इरफान खान ज्या मुलीला डेट करत होता तिला नवाझनं देखील डेट करणं सुरु केलं होतं. गोष्ट एवढी वाढली की दोघंजण सेटवर एकमेकांचा चेहरा देखील पहायचे नाहीत. नंतर अनुराग कश्यपनं दोघांमध्ये मध्यस्थी केली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Price: परदेशातून येतोय भारताचा खजिना; 64 टन सोनं देशात, नेमकं काय घडलं?

World Cup 2025: W,W,W... सेमीफायनलमध्ये ड्रामा! इंग्लंडने शून्यावर गमावल्या तीन विकेट्स, द. आफ्रिकेची धारदार गोलंदाजी; पाहा Video

Mumbai Local Train: लोकल ट्रेनमधील मृत्यू रोखण्यासाठी रेल्वे प्रशासनाचा महत्त्वाचा निर्णय, प्रवाशांना मोठा दिलासा

Crime: धक्कादायक! आपच्या बड्या नेत्यावर बेछूट गोळीबार; माजी डीएसपींनी घडवलं कृत्य, काय घडलं?

Latest Marathi News Live Update : कर्जमाफीवरुन मंत्र्यांनी केली मुख्यमंत्र्यांशी चर्चा

SCROLL FOR NEXT