nawazuddin siddiqui google
मनोरंजन

nawazuddin siddiqui : नवाझुद्दीन सिद्दीकीवर का आली लोकलने फिरण्याची वेळ..

अभिनेता नवाझुद्दीन सिद्दीकी याने चक्क मास्क लावून लोकल प्रवास केला असून त्याच्यावर ही वेळ का आली असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे.

नीलेश अडसूळ

entertainment news : कलाकारांच्या स्ट्रगल पिरियड मध्ये ऑडिशनपासून ते एखादी भूमिका मिळेपर्यंत त्यांच्या प्रवासाची माध्यम बनणारी मुंबईची लोकल चक्क एका बड्या कलाकारासाठी प्रवासाचे महत्वाचे साधन बनली आहे. अभिनय क्षेत्रात येण्यासाठी अविरत झटलेला आणि सध्या लाखो चाहत्यांचा शिरस्थानी असलेला अभिनेता नवाझुद्दीन सिद्दीकी (nawazuddin siddiqui) लोकलने फिरतो आहे. आज अनेक आलीशान गाड्यांचा मालक असलेला हा अभिनेता लोकल ट्रेनने फिरत असेल का, यावर कुणाचाच विश्वास बसणार नाही. पण त्याच्या एका चाहत्याने त्याला अचूक ओळख एक व्हिडीओ तयार केली सध्या हा व्हिडीओ वाऱ्यासारखी पसरत आहे.

नवाझने लोकल प्रवास केला तरी या गर्दीत त्याला कुणी ओळखले कसे नाही असा प्रश्न आपल्याला पडू शकतो. पण त्याने केलेला अवतार असा होता की त्याला सहज कुणीही ओळखले नसते. पण हे काम एका चाहत्याने केले आहे. समाज माध्यमांवर व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये नवाझ मास्क आणि गॉगल लावून स्टेशनवर येताना दिसत आहे.

navazuddin siddiqui

एक व्यक्ती येतो, स्टेशनवर उभा राहतो आणि ट्रेन आल्यावर लोकल प्रवासही करतो. या प्रवासात त्याला कोणीही ओळखत नाही. अखेर एक व्हिडीओ व्हायरल होतो आणि त्यावर या अभिनेत्याला ओळखले का? असे कॅप्शन दिले जाते. ही व्हिडीओ वेगात पसरते आणि तेव्हा जगाला समजते हा व्यक्ती दुसरा तिसरा कोणी नसून अभिनेता नवाझुद्दीन सिद्दीकी आहे .

मिळालेल्या माहितीनुसार, नवाझुद्दीन सिद्दीकी मीरा रोड येथे त्याच्या आगामी चित्रपटाचे शूटिंग करत होता. मात्र त्यानंतर त्याला लगेचच आणखी एका इव्हेंटसाठी जायचे होते. त्यामुळे त्या ठिकाणी वेळेत पोहोचण्यासाठी त्याने स्वतःची गाडी न वापरता लोकलने प्रवास केला. त्याच्या या प्रवासाचा व्हिडीओ व्हायरल होत असून चाहते त्याचे कौतुक करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

U19 World Cup: मुंबईचा आयुष म्हात्रे आता विश्वविजेता कर्णधार! मोहम्मद कैफ, विराट कोहलीच्या पंक्तीत मिळवलं स्थान

U19 World Cup: सचिन तेंडुलकर ते विराट कोहली... आयुष म्हात्रेच्या चॅम्पियन टीमबद्दल अन् वैभव सूर्यवंशीबद्दल कोण काय म्हणालं? पाहा

U19 World Cup: आयुष म्हात्रेच्या टीम इंडियाने जगज्जेतेपद जिंकताच कसं केलं सेलिब्रेशन; Video Viral

आज मतदान! मोबाईल घेऊन जाऊ नका, फोटो-व्हिडिओ काढल्यास दाखल होईल गुन्हा; एकच बॅलेटवर दोन्ही उमेदवार, मतदान कसे करायचे? ‘हे’ ओळखपत्र असेल तरी करता येईल मतदान

बापरे! दिव्या शिंदेला बिग बॉसने काढलं घराबाहेर, जीवे मारण्याची दिली धमकी, नक्की काय घडलं?

SCROLL FOR NEXT