Nawazuddin Siddiqui on the kerala story know what he said Esakal
मनोरंजन

Nawazuddin Siddiqui: 'प्रेक्षकांना मानसिक त्रास देण्यासाठी..', 'द केरळ स्टोरी'वर नवाझुद्दिन स्पष्टच बोलला..

'द केरळ स्टोरी' सिनेमावर सर्वसामान्यांसोबतच बॉलीवूडमधूनही वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटलेल्या दिसल्या.

प्रणाली मोरे

Nawazuddin Siddiqui on the kerala story: सुदिप्तो सेन दिग्दर्शित 'द केरळ स्टोरी' सिनेमाच्या रिलीजनंतर संमिश्र प्रतिक्रिया ऐकायला मिळत आहेत. काहींनी सिनेमाचं समर्थन केलंय तर काहींनी सिनेमावर बंदी आणण्याची मागणी केला होती.

यादरम्यान काही सिनेक्षेत्रातील मंडळींनीही आपल्या प्रतिक्रिया या सिनेमावर दिल्या आहेत. यामध्ये एक नाव अनुराग कश्यपचं देखील आहे.(Nawazuddin Siddiqui on the kerala story know what he said)

अनुराग कश्यपनं 'द केरळ स्टोरी' च्या बंदी विरोधात भाष्य केल्याचं दिसून आलं. त्याचं म्हणणं होतं की, असं कोणत्याही सिनेमावर बंदी आणायला नको. आता बॉलीवूड अभिनेता नवाझुद्दिन सिद्दिकीनं अनुराग कश्यपच्या विधानाचं समर्थन केलं आहे. नुकतीच त्यानं एका दूरचित्रवाहिनीला मुलाखत दिली,ज्यात तो म्हणाला आहे,''अनुराग कश्यपच्या वक्तव्याचं मी समर्थन करतो''.

अनुराग कश्यपच्या वक्तव्याचं समर्थन करण्यासोबत त्यानं असं देखील म्हटलं की, ''जर कोणता सिनेमा किंवा पुस्तक कुणाच्या भावना दुखावत असेल तर ते मात्र चुकीचं आहे. आम्ही सिनेमा प्रेक्षकांना मानसिक त्रास व्हावा म्हणून किंवा त्यांच्या भावना दुखावल्या जाव्यात यासाठी बनवत नाही''.

नवाझुद्दिन सिद्दिकीनं पुढे म्हटलं की,''समाजाला एकत्रित बांधण्यासाठी आणि लोकांमध्ये प्रेम भावनेचा प्रसार करण्यासाठी आम्ही सिनेमे बनवतो. सिनेमा यासाठीच बनवावा ही आमची जबाबदारी आहे, पण जर का सिनेमा लोकांमध्ये द्वेषभावना निर्माण करत असेल तर ते पूर्णपणे चुकीचं आहे. सिनेमानं जगाला जोडायचं आहे,तोडायचं नाही''.

वादानं घेरलेलं असतानाही 'द केरळ स्टोरी' बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करताना दिसत आहे. हा सिनेमा ५ मे,२०२३ रोजी थिएटरमध्ये रिलीज झाला होता. आणि १९ दिवसाच्या आत या सिनेमानं २०६ करोडहून अधिक कमाई केली आहे.

नवाझुद्दिन सिद्दिकी विषयी बोलायचं झालं तर सध्या तो त्याच्या 'जोगिरा सारा रा रा..' मुळे चर्चेत आहे. हा सिनेमा २६ मे रोजी रिलीज होत आहे. या सिनेमात त्याच्यासोबत नेहा शर्मा देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cough Syrup: नऊ चिमुकल्यांचा मृत्यू पण एकही पोस्टमार्टेम का नाही? कफ सीरप प्रकरणात धक्कादायक खुलासा, नेमकं काय घडलं?

Shakti Cyclone: चक्रीवादळ ‘शक्ती’चा तडाखा बसणार! नेमकं काय आहे हे आणि किती घातक असेल? याचं नाव कुणी ठेवलं? वाचा...

IND vs AUS Full Schedule: भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याचे संपूर्ण वेळापत्रक ! वाचा कधी, कुठे, केव्हा खेळणार; वेळ व Live Telecast

Madhya Pradesh : मध्य प्रदेशातील शेतकऱ्यांना दसऱ्यालाच मिळालं दिवळीचं सुपर गिफ्ट; CM यादवांनी शेतकऱ्यांना दिले 653.34 कोटी

मोठी बातमी : भारतीय संघात राहायचा असेल तर... Rohit Sharma, विराट कोहली यांच्यासमोर अजित आगरकरने ठेवली अट

SCROLL FOR NEXT