Alia Bhatt and Ranbir Kapoor will tie the knot today.  Google
मनोरंजन

खास अंदाजात ऋषी कपूर यांची मुलाच्या लग्नात उपस्थिती; चाहतेही पाहून भारावले

अखेर बॉलीवूडचं मोस्ट लव्हेबल कपल रणबीर कपूर आणि आलिया भट्ट लग्नबंधनात अडकले आहेत.

प्रणाली मोरे

अखेर बॉलीवूडचं मोस्ट लव्हेबल कपल रणबीर कपूर(Ranbir Kapoor) आणि आलिया भट्ट (Alia Bhatt) लग्नबंधनात अडकले आहेत. अयान मुखर्जी दिग्दर्शित 'ब्रह्मास्त्र'च्या सेटवर २०१७ साली या दोघांचं प्रेम फुललं त्यानंतर गेल्या चार वर्षात एकमेकांना व्यवस्थित समजून घेतल्यानंतर दोघांनी लग्नाचा निर्णय घेतला. आज १४ एप्रिल २०२२ रोजी कपूरांचा प्रीन्स चार्मिंग रणबीर आणि भट्ट कुटुंबाची क्यूट प्रिन्सेस आलिया आता मिस्टर अॅन्ड मिसेस कपूर्स म्हणून आपल्यासमोर येतील . या लग्नसोहळ्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून रंगल्यानंतर आता चर्चा होतेय ती लग्नासंबंधित सोहळ्यातले फोटो जसजसे समोर येत आहेत त्याविषयी.

या सोहळ्यात प्रत्येकजण आज मिस करतोय तो दिवंगत ऋषी कपूर(Rishi Kapoor) यांना. गेल्याच वर्षी त्याचं कॅन्सरनं निधन झालं. रणबीर आलियाचं लग्न आज पार पडल्यानं ऋषी कपूर यांचं स्वप्न पूर्ण होत आहे अशी भावूक भावना सगळ्या कपूर कुटुंबाच्या आणि मित्रपरिवाराच्या मनात जागली होती. त्यातच मेहेंदी सोहोळ्यातला एक फोटो व्हायरल झाला अन् सगळ्यांनाच अगदी चाहत्यांनाही वाटलं की या रुपात जणू ऋषी कपूर यांनी मुलाच्या लग्नात उपस्थिती दर्शवली आहे.

Neetu Kapoor’s mehendi has Rishi Kapoor’s name written.

मेहेंदी सेरीमनीच्या दरम्यान कपूर कुटुंब भावूक होताना पाहिलं जेव्हा नीतू कपूर(Neetu kapoor) यांनी दिवंगत पती ऋषी कपूर यांच्या आठवणीत आपल्या हातावरील मेहेंदीत त्यांचे नाव लिहिले. नीतू कपूर यांनी आपल्या मेहेंदीचा ,ज्यात त्यांनी ऋषी कपूर यांचं नाव लिहिलं आहे तो फोट सोशल मीडियावर शेअर केला आहे. रिद्धिमा कपूर आणि करिष्मा कपूर यांनी देखील मेहेंदी सेरेमनीचे फोटो शेअर केले आहेत.

Karisma Kapoor and Riddhima Kapoor showed their mehendi designs.

नीतू कपूर यांनी संगीत सोहोळ्यासाठी डान्सचा सराव करतानाचा फोटो देखील शेअर केला आहे. करिना कपूर खान,करिष्मा कपूर,अयान मुखर्जी, महेश भट्ट,पुजा भट्ट,राहुल भट्ट यांनी मेहेंदी सोहोळ्याला उपस्थिती दर्शवली होतीच,तसंच खूप सारे फोटो काढत धम्मालही केली. पण अधिक चर्चा रंगली ती नीतू कपूर यांच्या हातावरील मेहेंदीच्या फोटोची,कारण त्यानिमित्तानं ऋषी कपूर यांना त्यांच्या मुलाच्या लग्न सोहळ्यात अनुभवल्याच्या भावना प्रत्येकाच्या मनात जागल्या. अगदी चाहत्यांनीही नीतू कपूर यांच्या खास फोटोवर अशाच काहीशा प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: उद्धव ठाकरे आणि शिवसेनेपासून राज ठाकरे दूर का होत गेले? वाद ते मनोमिलन timeline

IND vs ENG 2nd Test: शुभमन गिलच्या ३००+ धावा! मोडला विराट कोहलीचा ११ वर्षांपूर्वीचा विक्रम, रिषभ पंतचीही फिफ्टी

Sushil Kedia: माज उतरला, पण गुर्मी कायम; माफीनंतरही नवं ट्विट करत सुशील केडिया पुन्हा बरळले, शहांची स्तुती तर ठाकरेंना...

Divyang Students Demand : दिव्यांग विद्यार्थ्यांची होतेय कुचंबना! ३० जुलैपर्यंत वसतिगृहाचा प्रश्न मार्गी लावा अन्यथा...; विद्यार्थ्यांचा सरकारला इशारा

Raigad News: अलिबाग मार्गावरील कोंडी सुटणार, प्रवाशांचा आरामदायी प्रवास होणार; सरकारचा प्लॅन सत्यात उतरणार

SCROLL FOR NEXT