alia bhatt and ranbir kapoor sakal
मनोरंजन

आलियाच्या हाती कारभार, कपूर कुटुंबात सूनेचेच राज्य, नीतू कपूर म्हणाल्या..

रणबीर कपूर आणि आलिया भट यांचा नुकताच विवाह झाला. त्यामुळे आता घरात कुणाचे चालणार असा प्रश्न नीतू यांना विचारल्यावर त्या म्हणाल्या...

नीलेश अडसूळ

Ranbir Alia Wedding : बॉलीवूडचा चॉकलेट बॉय रणबीर कपूर (ranbir kapoor) आणि बॉलीवूडची चुलबुली गर्ल आलिया भट्ट (alia bhatt ) यांच्या लग्नाच्या चर्चा गेले अनेक दिवस बी टाऊनमध्ये रंगल्या होत्या. अखेर आता दोघांनीही एकमेकांचे जीवनसाथी झाले आहेत. १४ एप्रिल रोजी रणबीरच्या पाली हिल येथील वास्तू या निवासस्थानी दोघांनीही लग्नगाठ बांधली. आलिया आणि रणबीरमध्ये गेले अनेक वर्षांची मैत्री होती. २०१५ पासून ते एकमेकांना डेट करत आहेत. पण दोघांनीही आपल्या नात्याची कबुली दिली नव्हती. मात्र सोनम कपूरच्या लग्नात दोघेही उघडपणे मीडियासमोर आले. आणि तेव्हापासून यांच्या रेलशनशिपच्या चर्चा बी टाऊनमध्ये सुरु झाल्या. आणि अखेर हे दोघे सप्तपदी घेऊन एकमेकांचे जीवनसाथी बनले.

सध्या या लग्नाचे फोटो सर्वत्र व्हायरल होत आहे. बॉलीवूड मधील अनेक कलाकारांनाही त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. विशेष म्हणजे आलिया भट आता कपूर झाली आहे. त्यामुळे कपूर यांच्या घरात नव्या सुनबाईंचे थाटामाटात स्वागत केले गेले. रणबीरची आई नीतू कपूर यांचे आलिया वर विशेष प्रेम आहे. मध्यंतरी लग्नाआधी एका माध्यमाशी बोलतानाही सुनबाई फार गोड आहेत, असे उत्तर दिले होते. पण आता सुनबाई घरात आल्याने काही बदलणार आहे का? याविषयी नीतू कपूर बोलल्या आहेत. (neet kapoor says about daughter in law)

नीतू कपूर या 'डान्स दिवाने' या रिअॅलिटी शोच्या परिक्षक आहेत. (dance deewane) या कार्यक्रमाचा एक प्रोमो नुकताच समोर आला आहे. यात नीतू कपूर आपल्या सुनेविषयी म्हणजे आलीय भट विषयी बोलल्या आहेत.यामध्ये नीतू कपूर (neetu kapoor) सासू झाल्याने अनेकजण त्यांची खिल्ली उडवताना दिसत आहेत. हे चित्रीकरण रणबीर आलियाच्या लग्नाआधीचे आहे. त्यामुळे कार्यक्रमाचा होस्ट करण कुंद्रा हा म्हणतो की 'नीतू आता सासू होणार आहे, कारण लवकरच त्यांची सून घरी येणार आहे.' त्यावर करण जौहर (karan johar) विचारतो, ‘घरी सर्वात जास्त कोणाची मर्जी चालते? सासूची की सूनेची’. त्यावर नीतू कपूर म्हणतात, “फक्त सूनेचीच….” आणि ‘मला वाटतं की फक्त सूनेचीच चालावी.’ नीतू कपूर यांच्या उत्तराने सर्वांना धक्का बसतो पण कौतुकही वाटतं.

नीतून कपूर यांच्या या उत्तराची सर्वत्र चर्चा आहे. कारण साधारण घरांमध्ये नेहमी सासुचेच वर्चस्व असते. सुनेला फारसे महत्व दिले जात आहे. पण नॅशनल टेलिव्हिजन वर नीतू कपूर यांनी हे विधान केल्याने अनेकांचे डोळे उघडले आहे. घरात सासू इतकेच सूनेचेही महत्व आहे. त्यामुळे सासूनेही तिच्या हातात अधिकार द्यायला हवे,अशी चर्चा रंगली आहे. मात्र या प्रमोवरून एक गोष्ट स्पष्ट होते ती म्हणजे कपूर कुटुंबात आता आलियाचे राज्य चालणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Record: साई सुदर्शनचा विश्वविक्रम! IPL 2026 मध्ये ऑरेंज कॅपही मिळवली अन् T20 मध्ये भल्याभल्यांना जे जमलं नाही, ते करून दाखवलं

KKR vs GT, IPL Points Table: शुभमन गिलचं शतक हुकलं अन् कोलकाताने रोखला गुजरातचा विजयरथ! KKR चं प्लेऑफचं आव्हान जिवंत

NEET पेपर लीकनंतर NTAमध्ये मोठा प्रशासकीय फेरबदल! दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती; सरकारचं निर्णायक पाऊल

१० संघ अन् १३ शतकं... IPL च्या १९ वर्षांच्या इतिहासात याआधी जे कधीच घडलं नव्हतं ते यंदा घडलंय!

केंद्रीय मंत्र्याच्या मुलाला पोक्सो अंतर्गत दाखल गुन्ह्यात अटक; १७ वर्षीय मुलीला लग्नाचं आमिष दाखवून ठेवले संबंध

SCROLL FOR NEXT