Ranbir Alia Wedding | Neetu and Ridhhima kapoor sakal
मनोरंजन

Ranbir Alia Wedding: सासू म्हणतेय सुनबाई गोड आहे, तर नणंद म्हणतेय..

बॉलिवूड मधील सर्वाधिक चर्चिला गेलेला रणबीर कपूर आणि आलिया भट यांचा विवाह आज होणार अशी खात्रीशीर माहिती रणबीर कपूरची आई नीतू कपूर यांनी दिली. यावेळी त्यांनी सुनेचे भरभरून कौतुक केले.

नीलेश अडसूळ

रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि आलिया भट(Alia Bhatt) यांचे लग्न कधी होणार याकडे लाखो चाहत्यांचे लक्ष लागले होते. हा एखादा जागतिक सोहळा असावा अशी त्यांच्या लग्नाची चर्चा झाली आहे. हे लग्न एप्रिल मध्ये होणार या अंदाजापासून ते १५ ला होणार, १६ ला होणार, १७ ला होणार असे अनेक अंदाज चाहत्यांनी बांधले. याबाबत कोणीतही अधिकृत माहिती कुटुंबीयांनी दिली नव्हती. कपूर आणि भट परिवाराला तारीख सांगण्यावरून अक्षरशः भंडावून सोडले. अशाच एका प्रसंगी काल रणबीर कपूरची आई नीतू कपूर यांनी आज १४ एप्रिल रोजी लग्ना लग्न असल्याचे स्पष्ट केले. यावेळी सुनबाई विषयी बोलताना त्यांनी भरभरुन कौतुक केले.

गेल्या दोन दिवसांपासून रणबीर आणि आलियाच्या लग्नाची जोरदार तयारी सुरु आहे. राहत्या घरी, चेंबूर येथील आर के स्टिडिओ, वांद्रे येथील 'वास्तू' बंगलामी आलियाचे घर इथे रोषणाई, सजावट, खानपान यांची जय्यत व्यवस्था करण्यात आली आहे. या लग्नात सुरक्षिततेचीही तितकीच काळजी घेतली जात आहे. लग्नाची पूर्वतयारी साठी आता अनेक कामगार, कर्मचारी, सुरक्षारक्षक येऊ लागले आहेत. तर पाहुण्यांची ये-जा ही वाढली आहे. कोणत्याही क्षणी हे लग्न लागू शकते.

कपूर घराण्याला आलिया भट सून म्हणून चालेल की नाही याबाबत अनेक चर्चा सुरु होत्या, नीतू कपूर यांची परवानगी आहे का, घरच्यांना याबाबत माहिती आहे का अशा अनेक अफवा होत्या. गेली कित्येक दिवस त्यांच्या नात्याविषयी कुणीही बोलायला तयार नव्हते, घरच्यांकडूनही योग्य माहिती मिळत नव्हती. पण अखेरी हे सगळे ग्रह बाजूला सारून रणबीर आणि आलीया यांच्या विवाह सोहळ्याला कालपासून सुरवात झाली. (ranbir alia wedding starts) बुधवारी सकाळी ११ वाजता रणबीर आणि आलियाचा लग्नाआधीचा गणेशपूजन विधी पार पडला. तर दुपारी २ नंतर मेहंदीचा कार्यक्रम सुरु झाला. दिवसभर पाहुण्यांची रीघ सुरूच होती. ही सर्व गडबड आटपून रात्री घरी परतताना रणबीर कपूरची आई नीतू कपूर (neetu kapoor) यांना माध्यमांनी अडवलं.

गेले काही दिवस त्यांना एकच प्रश्न विचारला जात होता. रणबीरचे लग्न कधी आहे. परंतु त्यांनी कधीही उत्तर दिले नाही. काल मात्र त्यांनी या प्रश्नाला उत्तर दिले आहे. रणबीर आणि आलियाचे लग्न आज, गुरुवारी १४ एप्रिल रोजी होणार असल्याची आनंदवार्ता त्यांनी दिली. हे लग्न वांद्रे येथील 'वास्तू' या रणबीर कपूरच्या निवासस्थानी होणार असल्याचेही त्या म्हणाल्या. (ranbir alia wedding in vaastu at bandra) हे बोलताना त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद स्पष्ट दिसत होता.

तुम्ही आनंदी आहात का, असा प्रश्न काहींनी नीतू कपूर यांना विचारला त्यावर मी खूप आनंदी आहे असे उत्तर नीतू यांनी दिले. त्यावेळी त्यांच्यासोबत त्यांची मुलगी आणि रणबीरची बहीण रिधिमा कपूर पण उपस्थित होती. तेव्हा काहींनी पुन्हा प्रश्न विचारला.. 'सुनबाई कशी आहे..' त्यावर नीतू कपूर म्हणाल्या... 'she is the best' ती खूप चांगली आहे. पुढे त्या म्हणाल्या ती प्रचंड गोड आहे. त्यावेळी रिधिमा हिनेही आलियाचे कौतुक केले. आलिया खूप क्युट असल्याचे रिधिमा म्हणाली. (neetun kapoor says alia is best) (riddhima says alia is cute ) यावेळी दोघींच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडूनवाहत होता. त्यांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलंच व्हायरलन होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Air Ambulance Crash: भीषण विमान दुर्घटना!,रांचीहून दिल्लीला निघालेली 'एअर अ‍ॅम्ब्यूलन्स' घनदाट जंगलात कोसळली

Team India Semi Final Scenario : टीम इंडियाला नेट रन रेट रडवणार! झिम्बाब्वेविरुद्ध ११ षटकं अन् विंडीजविरुद्ध १८३ धावांनी विजय... तिसरं समीकरणही लैय अवघड

Onion Rate Issue : कांदा उत्पादकांना एकरी ५० हजारांचा तोटा; शेतकऱ्यांत बाजारभावाअभावी चिंता, उत्पादन खर्च भागविण्याचाही प्रश्न

Bangladesh Politics : पंतप्रधान तारिक रहमान यांचा मोहम्मद युनूस यांना मोठा धक्का!

Yavatmal News : जिल्हा परिषद कर्मचार्‍यांच्या बदल्या एप्रिलमध्ये होणार; सीईओंचे गटविकास अधिकार्‍यांना पत्र

SCROLL FOR NEXT