Neha Kakkars ex boyfriend Himansh Kohli shares a post amidst her wedding rumours with Aditya Narayan 
मनोरंजन

नेहा-आदित्यच्या लग्नाची तयारी सुरु अन्, एक्स बॉयफ्रेंडची पोस्ट व्हायरल !

वृत्तसंस्था

मुंबई : बॉलिवूडची लाडकी गायिका नेहा कक्कर नेहमीच तिच्या लव्हअफेअर्समुळे चर्चेत असते. सोशल मीडियावर तर तीच्याविषयी चर्चांना उधाण येते. सध्या इंडियन आयडॉलच्या सेटवर असे काही किस्से घडतायत की पुन्हा एकदा ती चर्चेत आलीय. या सेटवर चक्क तिचं लग्नच ठरविण्यात आलंय आणि तेही एका ज्येष्ठ गायकाने त्यांच्या मुलासाठीच तिला लग्नाची मागणी घातली आहे. दुसरं तिसरं कोणी नाही तर, उदित नारायण यांनी त्यांचा मुलगा आदित्यसाठी नेहाला मागणी घातली आहे. आता लवकरच हे कपल लग्नबेडीत अडकणार आहे. एकीकडे ही तयार सुरु असतानाच दुसरीकडे मात्र नेहाच्या एक्स बॉयफ्रेंडची पोस्ट व्हायरल होत आहे.

नेहा आणि आदित्यच्या लग्नाची चर्चा गेले अनेक दिवस सुरु आहे. 14 फेब्रुवारी म्हणजेच 'व्हॅलेनटाइन डे' च्या दिवशी हे दोघं लग्न करणार असल्याची माहिती समोर आली. हे सर्व सुरु असतानाच दरम्यान चर्चा आहे ती नेहाच्या एक्स बॉयफ्रेंडची. नेहाच्या एक्स बॉयफ्रेंडचं नाव आहे हिमांश कोहली. 

हिमांश हा बॉलिवूडचा अभिनेता आहे. हिमांश आणि नेहा एकमेकांना डेट करत होते. एका टीव्ही शोच्यादरम्यान या दोघांनी त्यांच्या रिलेशनशिपची कबुली दिली होती. सोशल मीडियावर ते दोघंही एकमेकांसोबतचे फोटो शेअर करत असत. पण, काही कारणाने त्यांचा ब्रेकअप झाला. त्यानंतर नेहा डिप्रेशनमध्येही गेली होती. एका शो दरम्यान ती रडलीही होती. अखेर या सर्वावर मात करत नेहा यातून बाहेर आली.

त्यानंतर आता नेहा आणि आदित्यचं नाव जोडलं जात आहे. पण त्याआधी या दोघांचं 'गोवा बीच' हे गाणं रिलीज होतं आहे. नेहाचा भाऊ टोनी कक्करचं हे गाणं आहे.

हिमांशने शेअर केलेल्या पोस्टचं कॅप्शन इमोशनल आहे. त्याचा थेट संबंध नेटकऱ्यांनी नेहा-आदित्यच्या लग्नाशी जोडला आहे. हिमांशनं त्याच्या इन्स्टाग्राम त्याचा एक फोटो शेअर करत लिहिलं, ‘हे सर्व तुमच्या मेंदूत सुरू होतं आणि तिथेच संपतं. काहीही झालं तरीही आनंदी राहायला शिका.’ हिमांश कोहलीने यारियां, इत्तेफाक अशा सिनेमातू काम केलं आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BCCI Women Cricketers Salary: नववर्षाआधी ‘BCCI’कडून महिला खेळाडूंना मोठी भेट; वेतनात केली दुप्पट वाढ

BJP Candidate List : भाजप उमेदवारांच्या यादीला शुक्रवारचा मुहूर्त; शिवसेनेसोबत जागावाटप अजूनही अनिश्चित!

धक्कादायक! पहिल्या पतीला सोडून २८ वर्षीय विवाहिता ४४ वर्षांच्या दुसऱ्यासोबत राहिली, त्याने दारुच्या नशेत केला तीन वर्षांच्या चिमुकल्याचा खून, नातेवाईकांच्या संशयानंतर उलगडली कहाणी

Silent Call Scam Alert : फोन वाजतो, पण आवाजच नाही? सावध राहा, तुमचं बँक खातं रिकामं होऊ शकतं!

Bandu Andekar Arrest : जमिनीवर बेकायदा ताबा घेऊन ५.४० कोटींची खंडणी; आंदेकर टोळीचा प्रमुख बंडू आंदेकर अटकेत!

SCROLL FOR NEXT