OTT platforms esakal
मनोरंजन

OTT platforms : 'खबरदार जर यापुढे...' Netflix, Amazon Prime, Disney Hotstar, Zee5 ला गंभीर इशारा!

संसदेमध्ये देखील ओटीटी आणि त्यावरील कंटेट यावर चर्चा झाली असून आता त्याबाबत एक धोरणात्मक निर्णय जाहीर केला जाणार आहे. अशी माहिती सुत्रांनी दिली आहे.

युगंधर ताजणे

Netflix Amazon Prime Disney Hotstar other OTT platforms : मनोरंजन विश्वामध्ये ओटीटी प्लॅटफॉर्म्सची इंट्री झाली आणि वेगळाच बदल दिसून आला. अनेकांना थिएटर्समध्ये न जाता घरबसल्या वेगवेगळे चित्रपट पाहण्याची संधी मिळाली. कित्येक नवीन विविध भाषांमधील चित्रपट ओटीटीवर पाहता येऊ लागले. मात्र जो कंटेट ओटीटीवर दाखवला जातोय त्यावर कोणतेही निर्बंध नसल्यानं त्याविषयी अनेकांनी चिंता व्यक्त केली आहे.

संसदेमध्ये देखील ओटीटी आणि त्यावरील कंटेट यावर चर्चा झाली असून आता त्याबाबत एक धोरणात्मक निर्णय जाहीर केला जाणार आहे. अशी माहिती सुत्रांनी दिली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून ओटीटीवरील आक्षेपार्ह कंटेटवर कोणताच निर्बंध नसल्यानं त्यामुळे वेगळेच प्रश्न समोर येत असल्याचे दिसून आले होते. अनेक धर्म, भाषा, व्यक्ती, हिंसा, लैंगिकता यावरील चित्रपट, मालिका ओटीटीवर प्रदर्शित झाल्या आहेत. त्यावरुन झालेल्या वादांनी लक्ष वेधून घेतले आहे.

Also Read - Fatty Liver Disease: संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

माहिती व तंत्रज्ञानच्या एका कमिटीनं आता ओटीटी प्लॅटफॉर्म्सवरील नेटफ्लिक्स, डिझ्ने हॉटस्टार, सोनी लिव, झी ५ आणि अॅमेझॉन प्राईम याशिवाय इतरही काही ओटीटी चॅनेल्सला कंटेटबाबत समज दिली आहे. भारताची सांस्कृतिक विविधता, सामाजिकता, संस्कृती लक्षात घेऊन त्याच्याविषयी कोणत्याही प्रकारची आक्षेपार्ह माहिती आपल्या ओटीटीच्या माध्यमातून प्रेक्षकांपर्यत जाणार नाही, याची काळजी संबंधित ओटीटी चॅनेल्सला घेण्यास सांगितली आहे. इकॉनॉमिक टाईम्सनं यासंदर्भातील वृत्त दिले आहे.

संसदेतील अनेक सदस्यांनी सध्याच्या ओटीटीवरील कंटेटबाबत नाराजी व्यक्त केली आहे. यामध्ये त्यांनी ओटीटीवरील मालिकांमध्ये असणारी भाषा, त्यातील अश्लील शब्द, आणि चित्रिकरण यावर आक्षेप नोंदवला आहे. कॉग्रेसचे खासदार कार्ती चिदंबरम यांनी सांगितले आहे की, या माध्यमावर जी पायरसी होते आहे ती देखील चिंतेची बाब आहे. तसेच या माध्यमातून जे उत्पन्न मिळते आहे ते संबंधित देशाचे जे ओटीटी मालक आहेत त्यांना ते मिळत आहे.

यासगळ्यावर संबंधित ओटीटी प्लॅटफॉर्म्सकडून लेखी उत्तरंही मागवण्यात आली आहेत. गेल्या आठवड्यात माहिती व प्रसारण खात्याच्या अपूर्वा चंद्रा यांनी म्हटले होते की, आपल्याला येत्या काळात ओटीटीबाबत एक धोरणात्मक निर्णय घेण्याची गरज आहे. त्यात काही अंशी बदल व्हायला हवेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nationwide strike : मोठी बातमी! देशभरात तब्बल २५ कोटी कर्मचारी संपावर जाणार; सर्वसामान्यांना कोणत्या कामांमध्ये फटका बसणार?

ENG vs IND, 3rd Test: लॉर्ड्स कसोटीसाठी भारताच्या प्लेइंग-११ मध्ये बदल निश्चित! बुमराहसाठी 'या' खेळाडूला डच्चू मिळणार?

Maharashtra Politics: महाराष्ट्रातील ऊस दराच्या स्पर्धाला माळेगावच्या निकालामुळे गालबोट - चंद्रराव तावरे

बिहार हादरलं! एकाच कुटुंबातील पाच जणांना जिवंत जाळलं; १६ वर्षांच्या मुलाने डोळ्यांनी बघितलं, धक्कादायक कारण?

Guru Purnima Remedies 2025: गुरु पौर्णिमेच्या रात्री करा 'हे' उपाय, माता लक्ष्मी प्रसन्न होतील

SCROLL FOR NEXT