Hansal Mehta Netflix Web Series Deal esakal
मनोरंजन

Scoop नंतर हंसल मेहता यांचा मोठा धमाका, नव्या मालिकेची केली घोषणा

यापूर्वी मेहता यांच्या स्कॅम १९९२ या हर्षद मेहतावरील मालिकेला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळाला होता.

युगंधर ताजणे

Hansal Mehta Netflix Web Series Deal : बॉलीवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक हंसल मेहता हे त्यांच्या वेगवेगळ्या क्रिएटिव्ह मालिकांसाठी ओळखले जातात. काही दिवसांपूर्वी त्यांची स्कूप नावाची मालिका प्रदर्शित झाली होती. नेटफ्लिक्सवरील या मालिकेनं अनेकांचे लक्ष वेधून घेतले होते.

हंसल मेहता यांच्याविषयी एक नवी बातमी आता समोर आली आहे.त्यांच्या स्कूपच्या प्रोजेक्टनंतर ते आणखी धक्कादायक विषयांवरील मालिका प्रेक्षकांसमोर घेऊन येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. यापूर्वी मेहता यांच्या स्कॅम १९९२ या हर्षद मेहतावरील मालिकेला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळाला होता. भारतात सर्वाधिक पाहिल्या गेलेल्या मालिकांमध्ये या मालिकेचा समावेश होतो.

Also Read - Internet shutdown : खरोखरच इंटरनेट बंद केल्याने दंगली थांबतात का?

त्यानंतर आलेल्या स्कूप नावाच्या मालिकेतून मेहता यांनी लक्ष वेधून घेतले. सत्य घटनेवर आधारित या मालिकेची सोशल मीडियावर देखील मोठ्या प्रमाणात चर्चा होती. मुंबईतील अंडरवर्ल्ड आणि पत्रकारिता जगत यांच्या आपसातील संघर्षाचे कथन करणाऱ्या ‘नेटफ्लिक्स’वरील ‘स्कुप’ वेबसीरिजची सध्या मोठी चर्चा होत आहे.

ही वेबसीरिज स्कुप पत्रकार जिग्ना व्होरा यांच्या ‘बिहाइंड द बार्स इन भायखळा : माय डेज इन प्रिझन’ या चरित्रात्मक पुस्तकातून प्रेरित आहे. जिग्नावर प्रतिस्पर्धी पत्रकार ज्योतिर्मय डे ऊर्फ जे. डे यांच्या हत्येत सहभाग घेतल्याचा आरोप करण्यात आला होता.

आता न्यायालयाने जिग्ना यांची सर्व आरोपांतून मुक्तता केली आहे. मेहता यांनी नेटफ्लिक्स सोबत मल्टि इयर सीरीज भागीदारी केली आहे. त्याच्या अंतर्गत मेहता हे वेगवेगळ्या प्रोजेक्टसची निर्मिती करणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. मेहता यांनी देखील त्यांच्या या नव्या प्रोजेक्टसबाबत कमालीची उत्सुकता आहे.

स्कॅम २००३ ही मालिका देखील येत्या सप्टेंबर मध्ये प्रदर्शित होणार आहे. ती तेलगीवर आधारित आहे. पत्रकार संजय सिंह यांच्या रिपोर्टरची डायरी या पुस्तकावर आधारित ही मालिका आहे. स्टॅम्प घोटाळ्यातील मास्टरमाईंड म्हणून अब्दूल करीम तेलगीचे नाव घेतले जाते. त्यात गगन देव दिसणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : सन्माननीय उद्धव ठाकरे...म्हणत राज ठाकरेंची भाषणाला सुरुवात...

मोठी बातमी! राज ठाकरेंना आव्हान देणाऱ्या सुशिल केडियांचं ऑफीस मनसैनिकांनी फोडलं, पाहा VIDEO

Video : "वारी चुकली, पण विठ्ठल भेटला" हॉस्पिटलमध्ये घडली हृदयस्पर्शी घटना; व्हायरल व्हिडीओ पाहून डोळे पाणावतील..

Mumbai : आमचं नातं शरीर संबंधाच्या पलिकडचं, आजही...; विद्यार्थ्याचं लैंगिक शोषण करणाऱ्या शिक्षिकेचा खळबळजनक दावा

ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यात भरत जाधव आणि सिद्धार्थ जाधव सहभागी; "झेंडा नाही अजेंडा बघून लोक एकत्र"

SCROLL FOR NEXT