new movie radhe shyam teaser out prabhas and actress pooja hegde film 
मनोरंजन

प्रभासच्या राधे श्यामचा टीझर आला; व्ह्यूज,लाईक्सचा पाऊस

सकाळ ऑनलाईन टीम

मुंबई -  बहुचर्चित अशा राधे श्याम या चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला आहे. गेल्या वर्षभरापासून त्याच्याविषयी चर्चा सुरु आहे. या चित्रपटात बाहुबली फेम प्रभास मुख्य भूमिकेत दिसणार आहे. त्यानं सोशल मीडियावर राधेश्यामचा टीझर प्रदर्शित झाल्याची एक पोस्ट व्हायरल केली आहे. प्रभासच्या चाहत्यांनाही त्याच्या नव्या चित्रपटाच्या टीझरची उत्सुकता होती. त्या चित्रपटाच्या पोस्टरनंतर आता टीजर प्रदर्शित झाल्यानं चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

राधे श्याम मध्ये प्रभासच्या जोडीला पूजा हेगडे दिसणार आहे. त्या टीझरमध्ये ती कमालीची सुंदर दिसते आहे. बाहुबलीनंतर प्रभासच्या फॅन फॉलोअर्समध्ये वाढ झाली होती. त्याचा प्रभाव सोशल मीडियावरही दिसून आला आहे. आता व्हँलेटाईन डे च्या निमित्तानं प्रभासनं या चित्रपटाविषयी आनंदाची बातमी दिली आहे. आजच्या दिवशी चित्रपटाचा टीझर प्रदर्शित होतो आहे ही एक समाधानाची बाब आहे. सध्या सोशल मीडियावर #ValentinesWithRS असा ट्रेंडही सुरु झाला आहे. त्या टीझरमध्ये राधे श्यामच्या प्रदर्शनाची तारीखही सांगण्यात आली आहे.

प्रभासनं राधे श्यामचे पोस्टर प्रदर्शित केल्यानंतर टीझरचे सगळ्यांना वेध लागले होते. हा चित्रपट आता 30 जुलै 2021 रोजी प्रदर्शित होणार आहे. टीझर पाहून हा एक रोमँटिक चित्रपट आहे असे सांगितले जात आहे. मात्र प्रभासनं सांगितले की, मी काही तो रोमिओ नाही की जो ज्युलिएटसाठी आपला जीव देईल. एकीकडे प्रभासचा डँशिंग लूक दुसरीकडे पूजाचा सुंदर लूक समोर आला आहे. राधे श्यामच्या टीझरची सुरुवात एका रेल्वे स्थानकापासून होते. त्यानंतर पूजा प्रभासला विचारते, तु स्वतला काही रोमिओ समजतो का, त्यावर प्रभास उत्तर देतो त्यानं प्रेमासाठी जीव दिला होता मी त्या टाईपचा नाहीये, फॅन्सला हा टीझर कमालीचा आवडला आहे.

राधेशामचे चित्रिकरण हे हैद्राबाद शिवाय युरोपातील काही ठिकाणी झाले आहे. तसेच काही प्रसंग हे जॉर्जियामध्येही चित्रित करण्यात आले आहे. हा चित्रपट हिंदी, तमिळ, तेलगू आणि मल्याळम, कन्नड भाषेत प्रदर्शित होणार आहे. प्रभास आणि पूजाशिवाय या चित्रपटात सचिन खेडेकर, भाग्यश्री, प्रियदर्शी, मुरली शर्मा, साशा छेत्री, कुणाल रॉय कपूर यांच्यासह आणखी काही कलाकार आहेत. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Praniti Shinde: भाजप सरकारचा स्मार्ट मीटर कायदा अदानींचा फायदा : खासदार प्रणिती शिंदे; जनतेसाठी रस्त्यावर उतरावे लागणार

Satara Crime: सातारा हादरला! 'चिकन 65 फुकट न दिल्याने दगडफेक'; 10 जणांवर गुन्हा, दोन हल्‍लेखोर ताब्‍यात

ऑनर किलिंगने हादरलं सूर्यापेट! आंतरजातीय प्रेमविवाहामुळे युवकाची क्रूरपणे हत्या; पत्नी म्हणाली, 'मी स्वप्नातही देखील..'

Latest Marathi News Updates : जयशंकर यांनी सिंगापूर दौऱ्यात विवान बालकृष्ण यांची भेट घेतली, दोन्ही नेत्यांमध्ये आर्थिक संबंधावर चर्चा

Satara Crime: 'वेळेनजीक सोन्या-चांदीच्या व्यापाऱ्याला लुटले; वीस लाख लंपास, अपहरण करून पाय बांधले अन्..

SCROLL FOR NEXT